Sharad Pawar Ncp Pandharpur News : राज्यातील बहुतांश भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं करपू लागली आहेत. त्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकरी करताना दिसत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं (Sharad Pawar Ncp )पंढरपुरात आक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारला सदबुद्धी मिळवी, असे विठ्ठलाला साकडे घालण्यासाठी शरद पवारांच्या पक्षाचे आमदार खासदार आणि शेतकरी मोर्चापूर्वी विठ्ठल मंदिरात जाणार आहेत. याबाबतची माहिती माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिली. दरम्यान, आजच्या या बैठकीला शरद पवार गटाचे आमदार अभिजीत पाटील आणि उत्तर जानकर यांनी दांडी मारल्याचं पाहायला मिळालं. 

Continues below advertisement

सरकारनं दुष्काळ जाहीर करावा यासाठी आक्रोश मोर्चा काढणार

पंढरपुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सरकारनं दुष्काळ जाहीर करावा यासाठी आक्रोश मोर्चा काढणार आहे. शरद पवारांच्या नेतृत्वात पंढरपुरात हा दुष्काळ मोर्चा काढण्यात येणार आहे. 26 सप्टेंबर रोजी पंढरपुरात मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिली. दुष्काळ मोर्चाच्या नियोजनाची पंढरपुरात बैठक झाली. यानंतर ते बोलत होते. पवारांच्या मोर्चाच्या नियोजनाच्या बैठकीला आमदार उत्तम जानकर आणि आमदार नारायण पाटील यांनी दांडी मारल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, या मोर्चात राज्यातील महत्वाचे नेते देखील सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे. 

सरकारला जाग येत नाही म्हणून आम्ही हा मोर्चा काढणार : धैर्यशील मोहिते पाटील 

पंढरपुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकातून तहसील कार्यालयापर्यं तकाढण्यात येणार असल्याची माहिती खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिली. शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात आम्ही सगळे सुप्रिया सुळे जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे जिल्ह्यातील सगळे आमदार खासदार या मोर्चाबाबत आम्ही नियोजन करु असेही मोहिते पाटील म्हणाले. गेल्या महिन्याभरापासून आम्ही दुष्काळ झाहीर क रण्याची मागणी करत आहोत. सरकार कशीची वाट पाहत आहे हे माहित नाही? सा सवाल मोहिते पाटील यांनी केला. मागेच दुष्काळ जाहीर करणं गरजेचं होतं असेही मोहिते पाटील म्हणाले. सरकारला जाग येत नाही म्हणून आम्ही हा मोर्चा काढणार असल्याची माहिती मोहिते पाटील यांनी दिली आहे. 

Continues below advertisement