सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे गेल्या तीन दिवसांपासून पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही अटी शर्ती न लावता कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला विविध संघटनांकडून, राजकीय पक्षांकडून पाठिंबा मिळत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्यासह मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर सत्तेतील आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने देखील रोहित यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
रोहित पवारांच्या आंदोलनाला शेतकरी म्हणून आपण पाठिंबा दिला पाहिजे : मनोज जरांगे पाटील
शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. रोहित पवारांच्या आंदोलनाला शेतकरी म्हणून आपण पाठिंबा दिला पाहिजे असे मत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले. मी ज्याला भेटतो मला त्याचाच माणूस म्हणतात. उद्या भाजपने आंदोलन केले तर त्यांना देखील भेटणार असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. रोहित पवार तुम्हाला उपोषणाला बसण्याची वेळच आली नाही पाहिजे. पवार सांहेबांना सांगा मोदींना एक फोन फिरवा असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
शेतकरी वाचला तर आपण वाचू
शेतकरी वाचला तर आपण वाचू असे मनोज जरांगे म्हणाले. रोहित पवार तुम्ही आमच्या पार्टीत या असे जरांगे पाटील म्हणाले. सरकार बोलवत असेल तर तुम्ही चर्चा करावी, मार्ग निघत असेल तर काढावाशेतकऱ्याला न्याय द्यायचा असेल तर आणच्या पार्टीत या तुम्हाला हे आंदोलन राजकीयच म्हटणार असे जरांगे पाटील म्हणाले.
कर्जमाफीच्या मागणीसाठी सुरु असलेल्या अन्नत्याग आंदोलनास प्रहार संघटनेचा जाहीर पाठिंबा
प्रहार संघटनेच्या वतीनं एक पत्रक काढण्यात आले आहे. यावर शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनास प्रहार संघटनेचा जाहीर पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, रोहित पवारांच्या आंदोलानाला मोठा पाठिंबा मळत असल्याचे दिसत आहे. पंढरपुरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. आज मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनस्थळी उपस्थिती लावली. शेतकऱ्यांना न्या मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांच्या मुद्यावर रोहित पवारांच्या आंदोलनाला त्यांना पाठिंबा दिला.