Pandharpur News: ...अन् शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील पोलिसांवरच भडकले; मतदार केंद्रावर नेमकं काय घडलं?
Pandharpur News: भाजप कार्यकर्त्यांवर पोलीस कारवाई करीत नसल्याचे पाहून खासदार मोहिते पाटील चांगले संतापल्याचे दिसत होते.

पंढरपूर: पंढरपूर शहरातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते झेडपी मतदान केंद्रावर 100 मीटरच्या आत फिरू लागल्याने मतदानाला आलेले शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील (MP Dhairyashil Mohite Patil) यांनी पोलिसांनी प्रशासनाला कडक शब्दात सुनावले. भाजप कार्यकर्त्यांवर पोलीस कारवाई करीत नसल्याचे पाहून खासदार मोहिते पाटील (MP Dhairyashil Mohite Patil)चांगले संतापल्याचे दिसत होते. त्यानंतर पोलिसांनी शंभर मीटरच्या परिसरात करणाऱ्यांना बाहेर काढण्यास सुरुवात केली.
खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी घेतला आक्षेप
ग्रामीण भागात लॅपटॉप व छोट्या मशीनद्वारे मतदारांचे वेगवेगळे संशयास्पद सर्वे केले जात असल्याचा आक्षेपही खासदार मोहिते पाटील यांनी घेतला आहे. माळशिरस तालुक्यात अशा पद्धतीने लहान मशीन घेऊन मतदारांचे मतदाना दिवशी सर्वे सुरू असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर मोहिते पाटील चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. (MP Dhairyashil Mohite Patil)
नेमकं काय म्हणालेत खासदार धैर्यशील मोहिते पाटील
तुम्ही पाहिलं तर हा 100 मीटरचा परिसर आहे आणि या तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक चालू आहे. भाजपचे अकलूज नगरपालिका हद्दीतील लोकांचा या मतदार केंद्राशी काही संबंध नाही, कायदा कसा धाब्यावर बसवावा, कायद्याची आणि सत्तेचा गैरवापर कसा करावा, अशी दहशत निर्माण करण्यासाठी अकलूज शहराध्यक्ष येथे येऊन थांबले आहेत. शंभर मीटरच्या हद्दीत जिल्हा कार्यकारणी सदस्य येथे आलेले आहेत. पोलीस प्रशासन कोणतीच कारवाई त्यांच्यावर करत नाहीये. वास्तविक ते इथले मतदारच नाहीत. त्यामुळे त्यांनी कुठल्याही परिस्थितीत येथे दहशत पसरवण्याचा संबंध येत नाही. पण ते इथे का आलेले आहेत. ते मला समजत नाही. जर स्वतःवर इतका कॉन्फिडन्स असेल तर घरी बसून सगळं बघावं त्यांनी असंही पुढे धैर्यशील मोहिते पाटील यांनी म्हटलं आहे.
पुढे ते लोक म्हणाले, यांचे लोक सगळीकडे लॅपटॉप घेऊन बसलेले आहेत, आणि एक वेगळा प्रकार करण्याचं काम या तालुक्यांमध्ये चाललेला आहे, इतका कॉन्फिडन्स आहे, जर आपलं काम बोलतं, काम जर केलं असेल, विकास कामे केले असतील, तर हे कोणत्या पातळीला हे सगळं काम करायला लागले आहेत, हे लक्षात येत, तिथेच त्यांची हार समजून येते, आमच्या लोकांनी काही ठिकाणी पहिला पकडलेला आहे, पोलीस प्रशासन आणि निवडणूक आयोग काही विशेष कारवाई करताना दिसत नाही, तरी पण आम्ही आमचा लढा शेवटपर्यंत लढणार आहे, असंही पुढे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी म्हटलं आहे.
उत्तमराव जानकर यांनी बजावला मतदानाचा हक्क
माळशिरसचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर यांनी धानोरे या ठिकाणी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत उत्तमराव जानकर यांच्या पत्नी विमलताई जानकर या वेळापूर पंचायत समितीतून आणि त्यांचे पुत्र जीवन जानकर हे दहिगाव जिल्हा परिषद गटातून निवडणूक रिंगणात आहेत.
























