सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील माढ्याचे शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार अभिजीत पाटील यांनी शरद पवार यांचा विचार संपवला असून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मॅनेज झाले आहेत असा गंभीर आरो शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते संजय पाटील घाटणेकर (Solapur News) यांनी केला आहे. माढा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत निष्ठावंतांना डावलल्यानंतर घाटणेकर आक्रमक झाले आहेत. मोहिते पाटील (Solapur News) आणि अभिजीत पाटील हे खासदार आमदार पवारांचा विचार संपवत असून ते आता पक्षाचे राहिले नाहीत. ते वरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहून आतून भाजपाला मदत करीत आहेत. हे देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे असून हे सर्व आपण शरद पवार यांच्या कानावर घातलं असल्याचे संजय पाटील घाटणेकर यांनी सांगितलं आहे.(Solapur News)

Continues below advertisement

शिवरत्न बंगला आणि पंढरपूरच्या पाटलांच्या बंगल्यावरून निष्ठावंतांचे खच्चीकरण

 माढ्याची जनता स्वाभिमानी असून हा स्वाभिमान काय हा लोकसभेला आणि विधानसभेला दाखवून दिला होता, म्हणूनच मोहिते पाटील भाजपमधून येऊन सुद्धा मोठ्या फरकाने खासदार झाले तर अभिजीत पाटील आमदार झाले होते. मात्र निवडून आल्यानंतर यांनी निष्ठावांतांना डावलून आपल्या जवळच्यांना तिकिटे वाटल्याने ते काम राष्ट्रवादीचे करतात की भाजपचे असा सवाल घाटणेकर यांनी केला आहे. मोहिते पाटलांचा शिवरत्न बंगला आणि पंढरपूरच्या पाटलांच्या बंगल्यावरून निष्ठावंतांचे खच्चीकरण करणे सुरू असून उमेदवार हे बळीचे बकरे केले जात आहेत असाही गंभीर आरोप घाटणेकर यांनी केला आहे. माढ्याच्या जनतेला अकलूजच्या आणि पंढरपूरच्या पाटलांची गुलामगिरी करायची वेळ आली असल्याचेही घाटणेकर यांनी यावेळी टीका करताना म्हटलं आहे. हे सर्व सात तारखेला निकालाच्या वेळी समोर येईल असे सांगताना माढ्याची स्वाभिमानी जनता आक्रमक असून मतदानातून यांची जागा दाखवील असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

नेमकं काय म्हणालेत संजय पाटील घाटणेकर?

माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माढ्याचे ज्येष्ठ नेते संजय पाटील घाटणेकर यांनी म्हटलं की, शरद पवार यांचे विचार संपवण्याचं काम खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार अभिजीत पाटील करत आहेत. एका बाजुला ते पक्षाचं कां करत आहेत की भाजपच्या दबावाखाली जाऊन भाजपचं काम करत आहेत हे मतदारांना आणि कार्यकर्त्यांना कळत नाहीये, हे दोघे देवेंद्र फडणवीसांना जिल्ह्याचे पालकमंत्री गोरे यांना ते शंभर टक्के मॅनेज झाले आहे, हे आपले राहिलेले नाहीत, ते मी शरद पवारांच्या कानावर घातलं आहे, जास्तीत जास्त आमचं खच्चीकरण कसं करायचं ते पाहिलं जातंय, माढ्याच्या जनतेला अकलूजच्या आणि पंढरपूरच्या पाटलांची गुलामगिरी करायची वेळ आली आहे, असंही संजय पाटील घाटणेकर यांनी म्हटलं आहे.

Continues below advertisement