एक्स्प्लोर

Harshwardhan Sapkal : हर्षवर्धन सपकाळांच्या तोंडाला काळे फासणाऱ्याला एक लाखाचे बक्षीस, मराठा ठोक मोर्चा आक्रमक

Harshwardhan Sapkal On Tipu Sultan : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत केल्यानंतर त्यांच्यावर टीका केली जात आहे. 

सोलापूर : टिपू सुलतान याची छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांच्यासमोरील अडचणी अधिक वाढण्याची शक्यता आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात मराठा ठोक मोर्चा (Maratha Thok Morcha) आक्रमक झाल्याचं दिसून आलं. हर्षवर्धन सपकाळ यांच्या तोंडाला काळे फासणाऱ्यास एक लाख रुपयाचे बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. मराठा ठोक मोर्चाचे सोलापुरातील समन्वयक महेश डोंगरे यांनी हे जाहीर केलं.

सोलापूर मराठा ठोक मोर्चाच्या वतीने हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. हर्षवर्धन सपकाळ यांच्यामुळेच काँग्रेस संपली असं महेश डोंगरे म्हणाले. त्यांच्या तोंडाला जो कुणी काळे फासेल त्याला एक लाखाचं बक्षीस देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. तसेच हर्षवर्धन सपकाळ यांना मराठा समाज रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशाराही देण्यात आला. 

नेमकं प्रकरण काय? 

मालेगाव महापालिकेतील उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावण्यात आला होता. त्यावर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर अखेर हटवण्यात आला. मात्र, याच वादानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यासंदर्भात एक वक्तव्य केलं. 'टिपू सुलतानला छत्रपती शिवरायांच्य़ा समकक्ष बघितलं पाहिजे, असं सपकाळ यांनी म्हटलं. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य आणि स्वराज्य असा विचार दिला, अगदी त्याचप्रमाणे टिपू सुलतान यांनी त्याच समकक्ष काम केलं, असं सपकाळ म्हणाले. सपकाळ यांच्या या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड फुटलं. भाजप आणि शिवसेनेने सपकाळ यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. 

छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतान यांच्यासोबत केल्याच्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात पुण्यातील पर्वती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपल्या वक्तव्याची मोडतोड केली

टिपू सुलतानाच्या वक्तव्यासंदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी अखेर मौन सोडलं आहे. माझ्या वक्तव्याची मोडतोड करून "ध" चा "मा" करून  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत, असा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये केला. तसेच पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली. 

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अवैध वाळू उपसा प्रकरण! कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकावर प्राणघातक हल्ला, आरोपीच्या अटकेसाठी बेमुदत आंदोलन सुरु
अवैध वाळू उपसा प्रकरण! कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकावर प्राणघातक हल्ला, आरोपीच्या अटकेसाठी बेमुदत आंदोलन सुरु
Pandharpur Viral Video : पंढरपुरात ट्रक चालकाला पोलिसांकडून बेदम मारहाण, नो एन्ट्री कारवाईचा पोलिसांचा दावा, व्हिडीओने खळबळ
पंढरपुरात ट्रक चालकाला पोलिसांकडून बेदम मारहाण, नो एन्ट्री कारवाईचा पोलिसांचा दावा, व्हिडीओने खळबळ
सोलापुरात रंगणार 4 थी 'महिला महाराष्ट्र केसरी'; तारीख ठरली, मानाची गदा अन् बक्षीस देऊन गौरव
सोलापुरात रंगणार 4 थी 'महिला महाराष्ट्र केसरी'; तारीख ठरली, मानाची गदा अन् बक्षीस देऊन गौरव
Manoj Jarange Patil : मला रोज धमक्या, कधी कोण येऊन घात करून मला संपवतील; मनोज जरांगे पाटलांचा खबळजनक आरोप, वर्षभर दौरे थांबवणार
मला रोज धमक्या, कधी कोण येऊन घात करून मला संपवतील; मनोज जरांगे पाटलांचा खबळजनक आरोप, वर्षभर दौरे थांबवणार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा
Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका
Ajit Pawar plane crash spot Baramati : AIB च्या अहवालात विमान झाडाला धडकल्याचा उल्लेख, फॅक्ट काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना,वानखेडेवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून प्रेक्षकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी 
भारत- इंग्लंड सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून सूचना जारी
तामिळनाडूत द्रमुक आणि काँग्रेसचं जमलं, राज्यसभेची एक जागा काँग्रेसला मिळणार, विधानसभेसाठी द्रमुकनं किती जागा सोडल्या?
तामिळनाडूमध्ये काँग्रेस-द्रमुकमधील जागा वाटपाचा तिढा सुटला, काँग्रेसला विधानसभेच्या किती जागा?
Iran vs America : भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू, व्हिडीओ जारी  
भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
Iran Israel Conflict : पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
Embed widget