Abhijeet Patil : जनतेनं माढ्याचा खासदार बदललाय, आता आमदार बदलायचाय असे म्हणत अभिजीत पाटील (Abhijeet Patil) यांना आमदार बबनदादा शिंदे (MLA Babandada shinde) यांच्यासह त्याचे पुत्र रणजित शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. माझी समोरचे उमेदवार रणजित शिंदे यांना विनंती आहे की, तुम्ही जर कारखान्यावर बोलाल तर नट बोलटं आवळल्याशिवाय राहणार नाही, मला सगळं माहित आहे, असं म्हणत पाटील यांनी इशारा दिला. नादी लागायच्या भानगडीत पडू नका, आपली निवडणूक आमदारकीची आहे, त्यावर बोला असे अभिजीत पाटील म्हणाले. कारखान्याचं बोलायला गेलात तर कुठं? कसं? काय खाल्ल? याचा सगळा हिशोब असल्याचे पाटील म्हणाले.
अभिजीत पाटील यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत शरद पवार गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांनी जाहीर सभा घेतली. यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील उपस्थित होते. तुम्ही विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर असलेल्या कर्जावर बोलता आणि दुसरीकडं तुम्ही काटा हानता, शेतकऱ्यांची सीबील खराब करता अशी टीका देखील अभिजीत पाटील यांनी आमदार शिंदे यांच्यावर केली.
काटा न हानता 3503 रुपये दर देऊ
माढा मतदारसंघातील अनेक गावं पाण्यावाचून वंचित आहेत. त्या भागात पाणी पोहोचवण्याचे काम करणार असल्याचे अभिजीत पाटील म्हणाले. सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करेल. शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता होऊ देणारप नसल्याचे पाटील म्हणाले. ऊसाचं टेन्शन घेऊ नका. 8000 चा कारखाना 14000 वर नेला आहे. काटा न हानता 3503 रुपये दर देऊ असेही पाटील म्हणाले.
कोणाचाही नाद करा पण पवारसाहेबांचा नाद करु नका
शरद पवार यांनी 30 वर्ष ज्यांना मोठं केलं त्यांनीचं पवारसाहेबांना चॅलेंज केल्याचे अभिजीत पाटील म्हणाले. जयंत पाटील सांगतात कोणाचाही नाद करा पण पवारसाहेबांचा नाद करु नका असेही अभिजीत पाटील म्हणाले. मला 15 दिवसाखालीच शरद पवारसाहेबांनी मला तिकीटाबद्दल सांगितलं होतं. पण यांची आबदा बघत होतो असे अभिजीत पाटील म्हणाले. रणजित भैय्या म्हणाले, की लोक सांगत होते म्हणून आम्ही शरद पवार साहेबांना भेटत होतो. पक्षांतर केलं ते विकासकामासाठी केलं. पण पक्षांतर करताना तुम्ही जनतेला का विचारलं नाही? असा सवाल देखील अभिजीत पाटील यांनी केला. तुम्ही विकासासाठी नाही तर ईडी सीबीआयसाठी गेलात, टक्केवारी घ्यायची होती, रस्त्यांसाठी चार वेळा नारळ फोडून पाच वेळा बिलं घ्यायची होती अशी टीका अभिजीत पाटील यांनी केली.
माढ्यात इंजिनीयरींग कॉलेज काढू
माढ्यात शिक्षणाच्या सुविधा अपुऱ्या आहेत. पुढच्या काळात इंजिनीयरींग कॉलेज काढू असे मला रोंगे सरांनी सांगितल्याचे अभिजीत पाटील म्हणाले. त्यामुळं कोणालाही शिक्षणासाठी बाहेर जाण्याची वेळ येणार नाही अशी सोय करु असे पाटील म्हणाले. आरोग्याच्या चांगल्या सुविधा पाच वर्षात करु असेही पाटील म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: