पंढरपूर : कार्तिकी एकादशीला (Kartiki Ekadashi 2023)  देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) की अजित  पवार (Ajit Pawar)  कोण विठ्ठल रखुमाईची पूजा कोण  करणार अशा चर्चांना  उधाणा आले होते.  अखेर आज या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. मराठा समाजाचा प्रक्षोभ पाहता मंदिर समिती कार्तिकी पूजेसाठी कोणत्याही उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण देणार नाही, अशी भूमिका मंदिर समितीने घेतला  आहे. मराठा समाजाच्या भावना शासनाला कळवण्यात येणार असून  विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची सह अध्यक्ष   गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी बैठकीनंतर ही माहिती दिली आहे. 


महाराष्ट्राच्या राजकारणामुळे कार्तिकी एकादशीला नेमक्या कोणत्या उपमुख्यमंत्र्यांनी शासकीय पूजेला बोलावयाचे यावर मंदिर समितीच्या बैठकीत चर्चा झाली.  मराठा आरक्षणासाठी सुरु असलेलं आंदोलन आता अधिक तीव्र होत आहे. त्याचे पडसाद आता राज्यभर उमटू लागले आहेत. पंढरपुरातही  हे आंदोलन अधिक आक्रमक होत आहे. मराठा समाजाच्या या आंदोलनाचा कार्तिकी एकादशीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण सकल मराठा समाजाने उपमुख्यमंत्र्यांना इशारा दिला होता. मराठा समाजाला आरक्षण द्या. नाहीतर कार्तिक एकादशीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करू दिली जाणार नाही, असा इशारा देण्यात आला  होता. मराठा समाजाचा प्रक्षोभ पाहता मंदिर समितीने अखेर हा निर्णय घेतला आहे.   कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मानाचा वारकरी दाम्पत्याच्या हस्ते करण्याचा प्रघात आहे.


मराठा समाजाच्या भावना पाहता घेतला निर्णय


राज्यात घडणाऱ्या घडामोडींमुळे  कार्तिकी एकादशीला विठ्ठल रखुमाईची पूजा कोण करणार अशी शक्यता निर्माण झाली होती. पण, अखेरीस मराठा समाजाच्या भावना पाहता हा मान  कोणत्याच उपमुख्यमंत्र्यांना न देण्याचा निर्णय घेण्यात आल आहे. या पूजेचा मान कोणाला मिळणार या विषयी अद्याप काही सांगण्यात आलेले नाही. 


मराठा समाजाने दिला होता इशारा


कार्तिकीच्या पूजेला एकाच उपमुख्यमंत्र्यांनी बोलवावे लागणार असून गेल्या कार्तिकी यात्रेची पूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाली होती. यावर्षी दोन उपमुख्यमंत्री असल्याने नेमके हा मान कोणाला द्यायचा या पेचात मंदिर समिती सापडली असून एकाला बोलावल्यास दुसऱ्याची नाराजी समितीला परवडणारी नव्हती. त्याच ही पूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाली तर त्यांना काळे फासण्यात येईल असा इशाराही सकल मराठा समाजाने दिला होता. 


हे ही वाचा :


कार्तिकी एकादशीला 15 लाख भाविक दर्शनासाठी येण्याचा अंदाज, प्रशासन सज्ज