सोलापूर : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा गुढीपाडवा सण (Gudipadwa) तोंडावर असताना गॅस टंचाईचा (India Gas Shortage) फटका आता या सणालाही बसताना दिसत आहे. गुढीला घालण्यात येणाऱ्या साखर हारांच्या किमती तब्बल 40 टक्क्यांनी वाढल्या असून यामुळे ग्राहकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. गॅसच्या कमतरतेमुळे साखर हार तयार करणारे दोन कारखाने बंद पडल्याची माहिती समोर आली आहे, तर इतर ठिकाणी उत्पादन सुरू असले तरी खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

Sakhar Haar Price Hike : 70 रुपयांवरून 120 रुपयांपर्यंत दर

व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, गेल्या वर्षी 70 रुपये किलोने मिळणारा साखर हार यंदा 120 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. युद्धजन्य परिस्थिती आणि इंधन दरवाढीमुळे या किमती आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. 

Gas Shortage Impact India : डिझेल भट्ट्यांवर सुरू उत्पादन

गॅस टंचाईमुळे साखर हार निर्मितीसाठी डिझेल भट्ट्यांचा वापर करावा लागत आहे. साखरेचा पाक तयार करण्यासाठी डिझेलवर आधारित भट्टी वापरल्याने उत्पादन खर्च वाढत आहे. याच कारणामुळे साखर हारांच्या किमतीत सुमारे 40 टक्क्यांची वाढ झाली असल्याचं व्यापारी सांगत आहेत.

Pandharpur Production : पंढरपूरमध्ये चार कारखान्यांत उत्पादन

पंढरपूरमध्ये सध्या सुमारे चार कारखान्यांमधून साखर हार निर्मिती सुरू आहे. गुढीपाडवा जवळ येत असल्याने मागणी वाढली असली तरी गॅस टंचाईमुळे उत्पादनावर परिणाम होत आहे. 

Gujarat Supply : गुजरातमधूनही महाराष्ट्रात पुरवठा

पंढरपूरसोबतच गुजरातमधूनही महाराष्ट्रात साखर हारांचा पुरवठा होत आहे. मात्र गॅस टंचाईचा परिणाम देशभर जाणवत असल्याने साखर हारांच्या किमती वाढल्याचे दिसत आहे. यामुळे गुढीपाडव्याच्या सणावरही युद्धजन्य परिस्थिती आणि इंधन संकटाची झळ बसत असल्याचे स्पष्ट होत आहे.

Beed Protest Gas Shortage : बीडमध्ये गॅस टंचाईच्या विरोधात आंदोलन

बीड जिल्ह्यात गॅस टंचाईचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. त्यामुळे गॅस टंचाईविरोधात अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आलं आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नाल्यातून निघणाऱ्या गॅसवर चहा बनवत “नाल्याच्या गॅसवरील चाय पे चर्चा” आंदोलन छेडलं. घरगुती आणि व्यावसायिक गॅसचा तुटवडा वाढल्याने शहरातील हॉटेल, खानावळी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. या गॅस टंचाईमुळे विद्यार्थ्यांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा प्रतीकात्मक निषेध करण्यात आला.

ही बातमी वाचा: