Ladki Bahin Yojana: राज्यात सध्या लाडकी बहीण योजनेची आणि मिळणाऱ्या पैशांची सध्या (Ladki Bahin Yojana) जोरदार चर्चा सुरु आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केले आहेत. अनेक महिलांना या योजनांचा लाभ देखील महिलांना मिळाला आहे. दरम्यान, अशातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 
बार्शीत लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली खोटी कागदपत्रे वापरून 22 बोगस अर्ज भरण्यात आले आहेत. लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळण्याच्या उद्देशाने अज्ञात व्यक्तीने बनावट कागदपत्र वापरून 22 अर्ज भरल्याचे निष्पन्न झाले आहे.  


शासनाच्या पोर्टलवर अर्जाची शहानिशा करताना बार्शी प्रशासनाच्या लक्षात हा प्रकार आला आहे. बनावट कागदपत्रे वापरलेल्या 22 अर्जांची तपासणी केली असता बँक अकाउंट हे उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, इतर राज्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे, तर ज्या लॉगिन आयडीवरून हे अर्ज भरण्यात आलेत ते लॉग इन आयडी देखील सोलापूर जिल्ह्यातील नसून परजिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी बार्शी तालुक्यातील महिला बाल विकास अधिकारी रेश्मा पठाण यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद देण्यात आली आहे. एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.


लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी पठ्ठ्यानं बायकोचे भरले 26 फॉर्म


योजनेचा लाभ घेण्यासाठी एका पठ्ठ्यानं आपल्या पत्नीच्या नावे तब्बल 26 फॉर्म भरले आहेत. ही घटना सातारा जिल्ह्यात घडली आहे. गणेश घाडगे असं या व्यक्तीचं नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी फसवणुकीच्या आरोपाखाली पती-पत्नीला अटक करण्यात आली आहे.  खारघरमध्ये राहणाऱ्या पूजा महामुनीचा फॉर्म पुन्हा फेटाळला जात असताना फसवणुकीचे प्रकरण समोर आले. यानंतर भाजपचे माजी नगरसेवक नीलेश बाविस्कर यांनी याबाबत तक्रार केली होती. दरम्यान, या योजनेचा लाभ घेण्यासाठी सातारा येथील गणेश घाडगे या व्यक्तीने संपूर्ण नियोजन करून त्याची पत्नी प्रतीक्षा पोपट जाधव उर्फ ​​प्रतीक्षा गणेश गावडे हिच्या नावे 26 फॉर्म भरले. लाडली बहिण योजनेचे फॉर्म भरताना नातेवाइकांना न कळवता त्यांचे आधारकार्ड वापरुन फसवणूक केली.


एका महिलेच्या नावाने वेगवेगळ्या आधार क्रमांकाद्वारे सुमारे 30 अर्ज 


सातारा जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेसाठी (Ladki Bahin Yojana) एकाच महिलेने वेगवेगळ्या प्रकारे अनेक अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली होती. साताऱ्यातील एका महिलेच्या नावे वेगवेगळ्या आधार क्रमांकाद्वारे सुमारे 30 अर्ज दाखल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी केली.