एक्स्प्लोर

Solapur Crime News : डॉ. शिरीष वळसंगकरांनी म्युच्युअल फंडात गुंतवले होते तब्बल 160 कोटी? मृत्युपत्रानुसार वारसांना मिळणार 'इतके' कोटी

Solapur Crime News : डॉक्टरांनी म्युच्युअल फंडात गेल्या 15 वर्षांत तब्बल 160 कोटी रुपये गुंतवणूक केल्याची माहिती आहे.

सोलापूर : सोलापुरमधील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर (Shirish Valsangkar) यांनी शुक्रवारी (18 एप्रिल) रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास स्वत:वर गोळी झाडून आपलं जीवन संपवलं. या गोळीबारात गंभीररित्या जखमी झालेल्या डॉ. शिरीष वळसंगकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला. डॉ. शिरीष वळसंगकर हे अत्यंत प्रसिद्ध न्युरोफिजिशियन होते. त्यांनी केवळ सोलापूरच नव्हे तर महाराष्ट्रासह जगभरात आपली वैद्यकीय सेवा दिली होती. दरम्यान या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.  डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेली मनीषा मुसळे मानेची चौकशी झाली, घरातील सदस्यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. दरम्यान एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, डॉक्टरांनी म्युच्युअल फंडात गेल्या 15 वर्षांत तब्बल 160 कोटी रुपये गुंतवणूक केल्याचे समोर आले आहे. डॉ. वळसंगकरांच्या निकटवर्तीयांनी ही बाब सांगितल्याची माहिती आहे.

न्युरोफिजिशियन डॉ.शिरीष वळसंगकर यांच्या या टोकाचं पाऊल उचलण्यामागचं ठोस कारण तपासात पुढे आलेलं नाही. मात्र, त्यांच्या आर्थिक व्यवहाराच्या संदर्भातील माहिती समोर आली आहे. सकाळने दिलेल्या वृत्तानुसार, डॉक्टरांनी गेल्या पंधरा वर्षांत एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात सुमारे 160 कोटी रुपये गुंतवल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयाने दिली आहे. म्युच्युअल फंडात एखाद्याने सुमारे 15 वर्षांपूर्वी 160 कोटी रुपये गुंतवले आहेत. तर त्याचा किमान 300 कोटी किंवा त्याहून अधिक रक्कम वारसाला मिळणार असल्याचे गुंतवणूक तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

डॉक्टर शिरीष वळसंगकरांनी ही गुंतवणूक करत असताना वारस म्हणून कोणाच्या नावाची नोंद केली आहे, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, डॉ. वळसंगकर यांचे मृत्युपत्र आणि वारसा असलेली कागदपत्रे दाखल केल्यानंतर संबंधितांना ती रक्कम मिळू शकणार आहे. पण, डॉ.शिरीष वळसंगकरांनी नॉमिनी म्हणून कोणाच्या नावाची नोंदणी केलेली आहे, याबाबत उत्सुकता असणार आहे. म्युच्युअल फंडात डॉ. वळसंगकर यांनी गुंतवलेली रक्कम ही त्यांच्या वारसांना मिळणार आहे. 

कोण होते डॉ. शिरीष पद्माकर वळसंगकर? 

डॉ. शिरीष वळसंगकर हे सोलापुरातील न्युरोफिजिशियन होते. त्यांचे वय 69 वर्ष होते. त्यांच्या नेतृत्वाखाली S P Institute of Neurosciences हे अत्याधुनिक सुविधांसह रुग्णालय त्यांनी उभारलं आहे. डॉ. वळसंगकर यांनी सोलापूरमधील दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स येथून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी डॉ. व्ही.एम. मेडिकल कॉलेज, सोलापूर येथून MBBS, MD चे शिक्षण घेतले. 

लंडनमधील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्समधून MRCP (UK) ही पदवीही मिळवली आहे. देशभरातील नामांकित मेंदूविकार तज्ञांमध्ये त्यांचा नावलौकिक होता. 1999 मध्ये हॉस्पिटल रुग्ण सेवेत आले. कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असे त्यांचे एसपीएम न्यूरो हॉस्पिटल आहे. न्यूरोलॉजी संबंधी निदान, उपचार, गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, संशोधनासाठी त्यांचे हॉस्पिटल मानांकित होते. 

मेंदू विकारासंदर्भातील शस्त्रक्रियावरील उपचाराचे शोधनिबंध त्यांनी देश, विदेशातून सादर केले आहेत. कोल्हापूरच्या सीपीआर हॉस्पिटल, कुर्डुवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे इंटर्नशीप तर डॉ. व्हीएम मेडिकल कॉलेजमधून पदव्यूत्तर प्रशिक्षण पूर्ण केले. लंडनमधील मैदा वेल न्यूरोलॉजिकल हॉस्पिटल येथे त्यांनी काहीकाळ प्रशिक्षण घेतले. बॉम्बे हॉस्पिटलमधून त्यांनी रुग्णसेवेला सुरुवात केली. वैद्यकीय सेवेशिवाय देखील ते प्रचंड हौशी होते. भारतभर प्रवास करण्यासाठी त्यांनी स्वतःचे विमान देखील खरेदी केले होते. देशातील विविध भागात ते याचं विमानाने फिरत होते. इतकंच नाही तर अनेक शिकाऊ वैमानिकांना देखील त्यांनी मार्गदर्शन केले आहे. 

डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्येपूर्वीचा घटनाक्रम 

शुक्रवारी (18 एप्रिल) रात्री 8 वा. एस.पी ऑफ न्युरो सायन्सेस येथे रुग्णांची तपासणी करून घरी परतले. रात्री 8:30 बेडरूमच्या बाथरूममधून बंदुकीच्या गोळीचा आवाज आला.  त्यानंतर दुसरी राउंड फायर झाल्यावर कुटुंबीयांनी बेडरूममध्ये धाव घेतली. यावेळी डॉ. शिरीष वळसंगकर हे रक्ताच्या थारोळ्यात माखलेले दिसले.  रात्री 9 वा. त्यांच्याच रुग्णालयामध्ये डॉ. शिरीष वळसंगकर यांना दाखल करण्यात आले.  मुलगा डॉ. अश्विन आणि सून डॉ. शोनाली यांच्यासह 5 तज्ञ डॉक्टरांनी जवळपास पाऊण तास त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. रात्री 10:20 मिनिटांनी डॉक्टर शिरीष वळसंगकर यांना मृत घोषित करण्यात आले. रात्री 10:30 वा. पोलीस उपायुक्त विजय कबाडे हे घटनास्थळी दाखल झाले आणि बेडरूम सील केले. रात्री 10 : 45 वा. फॉरेन्सिकची टीम दाखल झाली आणि बेडरूममधील बंदूक काडतूस, रक्ताचे नमुने घेतले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

डोळ्यावर गॉगल, डोक्यावर देवानंदसारखी कॅप; शरद पवारांचे साथीदार 82 व्या वर्षी ZP निवडणुकांच्या प्रचारात
डोळ्यावर गॉगल, डोक्यावर देवानंदसारखी कॅप; शरद पवारांचे साथीदार 82 व्या वर्षी ZP निवडणुकांच्या प्रचारात
Sanjay Raut : मुंबईचा भूमिपुत्र ठाकरेंसोबत राहिला, विरोधी बाकावर 100 पेक्षा जास्त नगरसेवक असणं सत्ताधाऱ्यांना आव्हान : संजय राऊत
भाजपची प्रवृत्ती सहकाऱ्यांवर तलवार चालवण्याची, आम्ही त्यातून कसे बसे निसटलो : संजय राऊत
America : भारतावर रशियन तेल खरेदीमुळं लादलेलं 25 टक्के टॅरिफ रद्द होण्याची शक्यता, अमेरिकेकडून मोठे संकेत
भारतावर रशियन तेल खरेदीमुळं लादलेलं 25 टक्के टॅरिफ रद्द होण्याची शक्यता, अमेरिकेकडून मोठे संकेत
ठाकरेंना जय महाराष्ट्र, कट्टर शिवसैनिक अन् माजी आमदाराचा भाजप प्रवेश; सांगलीत राजू शेट्टींनाही 'दे धक्का'
ठाकरेंना जय महाराष्ट्र, कट्टर शिवसैनिक अन् माजी आमदाराचा भाजप प्रवेश; सांगलीत राजू शेट्टींनाही 'दे धक्का'

व्हिडीओ

Special Report Greenland : ग्रीनलँडवर अमेरिकेची वक्रदृष्टी का? काय आहे ग्रीनलँडचा इतिहास?
Ladki bahin Yojana : लाडकी बहीण योजनेशी संबंधित तक्रारीचे निवारण करण्यासाठी हेल्पलाईन
Sanjay Raut PC :  राजकारणात गुलामांचा बाजार, अजितदादांना महायुतीतून बाहेर पडावं लागणार- संजय राऊत
Kamal Khan News : ओशिवरा गोळीबारप्रकरणी अभिनेता कमाल खान अटकेत, नेमकं प्रकरण काय?
Nashik Currency : खळबळजनक! 2 हजारांच्या नोटांनी भरलेला 400 कोटींचा कंटेनर लूटला!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
डोळ्यावर गॉगल, डोक्यावर देवानंदसारखी कॅप; शरद पवारांचे साथीदार 82 व्या वर्षी ZP निवडणुकांच्या प्रचारात
डोळ्यावर गॉगल, डोक्यावर देवानंदसारखी कॅप; शरद पवारांचे साथीदार 82 व्या वर्षी ZP निवडणुकांच्या प्रचारात
Sanjay Raut : मुंबईचा भूमिपुत्र ठाकरेंसोबत राहिला, विरोधी बाकावर 100 पेक्षा जास्त नगरसेवक असणं सत्ताधाऱ्यांना आव्हान : संजय राऊत
भाजपची प्रवृत्ती सहकाऱ्यांवर तलवार चालवण्याची, आम्ही त्यातून कसे बसे निसटलो : संजय राऊत
America : भारतावर रशियन तेल खरेदीमुळं लादलेलं 25 टक्के टॅरिफ रद्द होण्याची शक्यता, अमेरिकेकडून मोठे संकेत
भारतावर रशियन तेल खरेदीमुळं लादलेलं 25 टक्के टॅरिफ रद्द होण्याची शक्यता, अमेरिकेकडून मोठे संकेत
ठाकरेंना जय महाराष्ट्र, कट्टर शिवसैनिक अन् माजी आमदाराचा भाजप प्रवेश; सांगलीत राजू शेट्टींनाही 'दे धक्का'
ठाकरेंना जय महाराष्ट्र, कट्टर शिवसैनिक अन् माजी आमदाराचा भाजप प्रवेश; सांगलीत राजू शेट्टींनाही 'दे धक्का'
'सरकारविरुद्ध निर्णय दिल्याबद्दल न्यायमूर्तींची बदली योग्य नाही,' न्यायमूर्तीं उज्ज्वल भुयान यांची कॉलेजियम व्यवस्थेतील कार्यकारी यंत्रणेच्या हस्तक्षेपावर उघड टीका
'सरकारविरुद्ध निर्णय दिल्याबद्दल न्यायमूर्तींची बदली योग्य नाही,' न्यायमूर्तीं उज्ज्वल भुयान यांची कॉलेजियम व्यवस्थेतील कार्यकारी यंत्रणेच्या हस्तक्षेपावर उघड टीका
महायुतीचा ZP लाही बिनविरोध पॅटर्न जोरात; जिल्हा परिषदेत 5 अन् पं. समितीला 6 उमेदवार विजयी, भाजपचे किती?
महायुतीचा ZP लाही बिनविरोध पॅटर्न जोरात; जिल्हा परिषदेत 5 अन् पं. समितीला 6 उमेदवार विजयी, भाजपचे किती?
सहरच्या 'हरा कर देंगे' वक्तव्यावरुन आम्ही मागे हटणार नाही; जलील यांचा मुंब्य्रातून फुल सपोर्ट, राणे, सोमय्यांवरही टीका
सहरच्या 'हरा कर देंगे' वक्तव्यावरुन आम्ही मागे हटणार नाही; जलील यांचा मुंब्य्रातून फुल सपोर्ट, राणे, सोमय्यांवरही टीका
Pakistan : आयसीसीनं बांगलादेशवर अन्याय केला, ...तर आम्ही देखील टी 20 वर्ल्ड कप खेळणार नाही, मोहसीन नक्वींचं वक्तव्य
बांगलादेशवर अन्याय होतोय, पाकिस्तान सरकारनं आदेश दिल्यास वर्ल्ड कप खेळणार नाही : मोहसीन नक्वी
Embed widget