सोलापूर: अकलूज येथील प्रतापसिंह चौकामध्ये एका भीषण अपघातात दोघाजणांचा जीव गेल्याची घटना घडली. ट्रॅव्हल्सने स्कुटीला दिलेल्या जोरदार धडकेत विकास अरूण रिसवडकर (वय 29 वर्षे, रा. मसुदमळा-अकलूज) आणि शुभम शिवाजी पांढरे, (वय 29 वर्षे, रा. संयुक्तानगर-शंकरनगर) या दोन तरुणांचा दुर्दैवी  मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत राहुल दत्तात्रय जगताप यांनी बस चालक अक्षय शिवाजी ननवरे (रा. खुडूस, ता. माळशिरस) याच्या विरोधात अकलूज पोलीस ठाण्यात पिर्याद दाखल केली आहे.


अकलूज पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विकास रिसवडकर आणि शुभम पांढरे हे दोघे आपल्या स्कुटीवरून संध्याकाळी सदुभाऊ चौकातून प्रतापसिंह चौकाकडे पेट्रोल भरण्यासाठी जात होते. वेळापूरहून इंदापूरकडे निघालेल्या निखिल ट्रॅव्हल्सच्या बसने (बस क्र. एनएल 01 बी 3013) स्कुटीला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने स्कुटीवरील विकास आणि शुभम यांच्या डोक्याला जबर मार लागला.या दोघांना उपचारासाठी उपजिल्हा रूग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी दोघेही मयत झाल्याचे सांगितले. पुढील तपास एपीआय गणेश चौधरी करत आहेत.


पालघरमध्ये अपघातांची मालिका सुरुच


पालघर जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरूच असल्याचं चित्र आहे. मागील तीन दिवसात तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या तीन अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येतेय. तसेच या अपघातांमध्ये आतापर्यंत सात जण जखमी झालेत. रविवार 4 फेब्रुवारी रोजी सकाळी चहाडे - गुंदले रस्त्यावर टायर फुटून कार उलटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली. चार जण गंभीर जखमी झालेत. जखमींना सध्या बेटेगाव येथील अधिकारी लाईफलाईन रुग्णालयात दाखल करण्यात आले. 


मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या या अपघातांच्या मालिकांमुळे नागरिकांमध्येही चिंतेचं वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच यामध्ये मृत्यू झालेल्या नातेवाईकांवर देखील सध्या दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून याबाबत काहीतरी उपाययोजना करावी अशी मागणी देखील स्थानिकांकडून करण्यात येतेय. त्यामुळे प्रशासन यावर कोणत्या उपाययोजना करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


चहाडे गुंदले-रस्त्यावर भीषण अपघात


सफाळे जवळील भादवे गावातील तरुणाच्या कारचा टायर फुटून भीषण अपघात झाल्याची घटना घडली.  चहाडे गुंदले-रस्त्यावरील गर्वाशेत येथे कार उलटून झालेल्या अपघातात चंद्रकांत पाटील आणि उत्कर्ष राऊत या दोन तरुणांचा मृत्यू झाला. तसेच मयूर वैद्य,धीरज पाटील,मीत राऊत आणि लोकेश वैद्य हे चार तरुण  जखमी झाले. सध्या त्यांना उपचारासाठी बेटेगाव येथील अधिकारी लाईफलाईन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नागझरी येथे आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी हे सर्व तरुण जात असताना हा अपघात घडला.


ही बातमी वाचा: