Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसच्या बाभूळगाव येथून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. आदल्या दिवशी मोठ्या हर्षउल्हासात पार पडलेल्या लग्नसोहळ्याच्या दुसर्याच दिवशी काळानं घात केला आणि नववधूला हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने प्राण सोडावा लागलाय. ही दुर्दैवी घटना बाभूळगावच्या पराडे-गळगुंडे या परिवारात घडली असून कुटुंबियासह परिसरात सर्वत्र शोककळा पसरली आहे. जीवनातील महत्त्वाचा मानला जाणारा लग्न सोहळा पार पडला आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच नववधूचे असे अकाली निधनाच्या वृत्तानं संबंध तालुका हळहळला आहे.
लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधूने घेतला जगाचा निरोप, घोटी गाव हळहळलं
पुढे आलेल्या माहितीनुसार, समीर हरिदास पराडे यांचे 13 मे रोजी घोटी (ता. माढा) येथील जानकी बाळासाहेब गळगुंडे यांच्याशी मोठ्या दिमाखात विवाह सोहळा संपन्न झाला. नीरा नरसिंहपूर येथील मंगल कार्यालयात हा दिमाखदार सोहळा पार पडला. लग्नानंतर नववधू सासरी आली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अचानक छातीत कळा येऊ लागल्याचं जाणवलं. त्यानंतर कुटुंबियांनी क्षणाचाही विलंब न करता तत्काळ जानकी यांना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं अन् अकलूज येथील खासगी हॉस्पिटलकडे घेऊन जात असताना प्रवासादरम्यान नववधूवर काळाने झडप घातली. वाटेतच जानकी यांना मृत्यूनं गाठलं. सासरच्या सुनेचा आणि माहेरच्या लेकीचा अचानक झालेल्या मृत्यूने दोन्ही कुटुंबाने यावेळी एकच टाहो फोडला. यानंतर मृत्यू झालेल्या जानकी हिच्यावर बाभूळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी संपूर्ण गाव हळहळला.
मुलीला वाचवण्यासाठी आलेल्या आईसह अन्य दोन बहिणींनाही केली मारहाण
गावाबाहेर असलेल्या खातकुड्यावर शेणपुंजनं फेकण्यास गेलेल्या तरुणीला गावातीलचं एका मद्यपी इसमानं गावातून तिच्या घरापर्यंत मारहाण करीत धिंड काढली. हा धक्कादायक प्रकार भंडारा तालुक्यातील कोथुर्णा गावात घडला. दिनेश शिवशंकर बोंद्रे (35) रा. कोथुर्णा, असं मारहाण करणाऱ्या इसमाचं नावं आहे. सदर प्रकरणात वरठी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात 324, 354 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मुलगी मारहाणीत,' वाचवा-वाचवा', अशी ओरडत असतांना घरी असलेली आई आणि दोन बहिणी वाचविण्यासाठी रस्त्यावर आल्या. या इसमानं या चौघींनाही अश्लील शिवीगाळ करीत मारहाण केली. पीडित 20 वर्षीय तरुणीला जबर मारहाण करण्यात आल्यानं तिच्यावर सध्या भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.
इतर महत्वाच्या बातम्या