एक्स्प्लोर

Solapur Accident News: आजीसोबतचा 'तो' प्रवास अखेरचा ठरला! डोळ्यादेखत 6 वर्षीय नातवाला दुचाकीने उडवलं; सोलापुरात हळहळ

Solapur Accident News : आजीसोबत चालत जात असताना दुचाकीने धडक दिल्याने सोलापुरात एका 6 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झालाय. या प्रकरणी एका अज्ञात महिला दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Solapur Accident News: आजीसोबत चालत जात असताना दुचाकीने धडक दिल्याने सोलापुरात एका 6 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झालाय. शिवांशू ऊर्फ बंटू लक्ष्मीनारायण बोद्धूल असे या मृत चिमुकल्याचे नाव आहे. 31 मे रोजी दुपारी सोलापुरातल्या गेंट्याल चौक ते शास्त्री नगर रस्त्यावर हा अपघात (Accident News) झाला. जखमी अवस्थेत शिवांशू याला उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी एका अज्ञात महिला दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पुढे आलेल्या माहितीनुसार, शिवांशू हा आपल्या आजीसोबत रिक्षातून घराकडे जात होता. रिक्षा थांबल्यानंतर तो रस्ता क्रॉस करत होता, तेव्हा समोरून दोन मुली डबलशीट दुचाकीवर आल्या. त्यांनी शिवांशूला जोरात धडक दिली. यात त्यांच्या डोक्यात जबर मार लागला. नागरिकांनी लगेच त्याला रिक्षात घालून ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू होता. परिणामी त्या बाळाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झालाय. शिवांशूच्या मृत्यूच्या बातमीनंतर सोलापुरात हळहळ व्यक्त केली जातेय.

खामगाव - पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, 3 जण ठार, दोघे जखमी

दरम्यान,  असाच एक भीषण अपघात खामगाव - पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर झाला आहे. टेम्पो आणि ॲपे रिक्षाच्या धडकेत तीन जण ठार झाले असून दोन जण जखमी झाले आहे. खामगाव - पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर नित्रुड गावाजवळ मध्यरात्री टेम्पो आणि ॲपे रिक्षाची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात 3 जण ठार तर 2 जण गंभीर जखमी झालेत. मध्यरात्री 12 वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झालाय. अपघातातील जखमीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात मयत आणि जखमी हे सिरसाळा गावातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. गेल्या काही दिवसात या महामार्गावरील अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रविवारी दुपारी याच महामार्गावर ट्रकने एका दुचाकी स्वाराला चिरडले होते. त्यानंतर पुन्हा ही अपघाताची घटना घडली आहे. 

भरधाव ट्रकची कारला भीषण धडक, पती-पत्नी अन् मुलगी गंभीर जखमी

चारचाकी वाहनानं कुटुंबासह नागपूरकडं जाणाऱ्या परिवाराच्या वाहनाला समोरून आलेल्या भरधाव ट्रॅकनं जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात चारचाकी वाहनातील पती-पत्नी आणि मुलगी असे तीन जण गंभीर जखमी झालेत. ही घटना नागपूर-कलकत्ता राष्ट्रीय महामार्गावरील भंडाऱ्याच्या बायपासवर रात्री घडली. जखमींना तातडीनं उपचारासाठी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. अजय जयस्वाल (55), कविता अजय जयस्वाल (50) आणि सुहानी जयस्वाल (22) असं जखमींचं नावं आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

PBKS vs RCB LIVE Score : RCBचा कर्णधार बदलला, पंजाब किंग्जने जिंकला टॉस; बंगळुरूविरुद्ध धर्मशाला येथे प्रथम गोलंदाजीचा निर्णय
PBKS vs RCB LIVE Update : RCBचा कर्णधार बदलला, पंजाब किंग्जने जिंकला टॉस; बंगळुरूविरुद्ध धर्मशाला येथे प्रथम गोलंदाजीचा निर्णय
IPL मधील सर्वात शॉकिंग अपडेट, एमएस धोनी 18 मे ला सीएसकेसाठी शेवटचा सामना खेळणार? हर्षा भोगलेंच्या वक्तव्याने खळबळ
IPL मधील सर्वात शॉकिंग अपडेट, एमएस धोनी 18 मे ला सीएसकेसाठी शेवटचा सामना खेळणार? हर्षा भोगलेंच्या वक्तव्याने खळबळ
Maharashtra Live blog updates: मुंबईत मराठी पाट्या संदर्भात पालिकेची कडक मोहीम; दोन दिवसांत सहा हजारांवर दुकानांची झडती
Maharashtra Live blog updates: मुंबईत मराठी पाट्या संदर्भात पालिकेची कडक मोहीम; दोन दिवसांत सहा हजारांवर दुकानांची झडती, तर 205 आस्थापनांना पालिकेची नोटीस
Rajinikanth: 'मला खूप आश्चर्य वाटलं', विजय सीएम होताच चक्क सुपरस्टार रजनीकांतवर खुलासा करण्याची वेळ! स्टॅलिन भेटीवरूनही थेट भाष्य, नेमकं असं घडलं तरी काय?
'मला खूप आश्चर्य वाटलं', विजय सीएम होताच चक्क सुपरस्टार रजनीकांतवर खुलासा करण्याची वेळ! स्टॅलिन भेटीवरूनही थेट भाष्य, नेमकं असं घडलं तरी काय?

व्हिडीओ

Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये गेल्या ८ वर्षापासून अभिनव उपक्रम; उद्योजक, विद्यार्थी करतात स्वच्छता
Pune MNS Morcha Against Fuel Price Hike : इंधन दरवाढीविरोधात मनसे आक्रमक, आंदोलनाचा इशारा | ABP Majha
Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajinikanth: 'मला खूप आश्चर्य वाटलं', विजय सीएम होताच चक्क सुपरस्टार रजनीकांतवर खुलासा करण्याची वेळ! स्टॅलिन भेटीवरूनही थेट भाष्य, नेमकं असं घडलं तरी काय?
'मला खूप आश्चर्य वाटलं', विजय सीएम होताच चक्क सुपरस्टार रजनीकांतवर खुलासा करण्याची वेळ! स्टॅलिन भेटीवरूनही थेट भाष्य, नेमकं असं घडलं तरी काय?
दादा कोंडकेंसोबत काळ गाजवला, अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या; व्ही. शांताराम पुरस्कार शासनाला परत, आनंदाश्रमात ठेवला
दादा कोंडकेंसोबत काळ गाजवला, अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या; व्ही. शांताराम पुरस्कार शासनाला परत, आनंदाश्रमात ठेवला
पुण्यातील धक्कादायक घटना; वडिलांनीच मुलाच्या अंगावर ॲसिडसदृश्य द्रव्य फेकलं; गुन्हा दाखल होताच फरार
पुण्यातील धक्कादायक घटना; वडिलांनीच मुलाच्या अंगावर ॲसिडसदृश्य द्रव्य फेकलं; गुन्हा दाखल होताच फरार
आता ऑस्ट्रेलियातही भारतीय वंशाचा थेरपिस्ट 'अशोक खरात' निघाला; मसाज पार्लरमध्ये मसाज करताना तब्बल 61 महिलांसोबत गुप्त व्हिडिओ करत नको नको ते कारनामे
आता ऑस्ट्रेलियातही भारतीय वंशाचा थेरपिस्ट 'अशोक खरात' निघाला; मसाज पार्लरमध्ये मसाज करताना तब्बल 61 महिलांसोबत गुप्त व्हिडिओ करत नको नको ते कारनामे
शक्तिपीठ महामार्गाविरोधात पुणे-सोलापूर महामार्गावर रणरणत्या उन्हात आंदोलन; 75 वर्षीय वृद्ध महिला शेतकरी सुद्धा रस्त्यावर, राजू शेट्टी आणि पोलिसांची शाब्दिक चकमक
शक्तिपीठ महामार्गाविरोधात पुणे-सोलापूर महामार्गावर रणरणत्या उन्हात आंदोलन; 75 वर्षीय वृद्ध महिला शेतकरी सुद्धा रस्त्यावर, राजू शेट्टी आणि पोलिसांची शाब्दिक चकमक
Bacchu Kadu on Eknath Shinde CM Post: महाराष्ट्रात सर्व्हे केला तर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रि‍पदासाठी जास्त पसंती, बच्चू कडूंच्या विधानानंतर भाजपचा पहिला पलटवार
महाराष्ट्रात सर्व्हे केला तर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रि‍पदासाठी जास्त पसंती, बच्चू कडूंच्या विधानानंतर भाजपचा पहिला पलटवार
श्रेयस अय्यर मैदानावर पाऊल ठेवताच इतिहास रचणार, धोनी आणि कोहलीनंतर असा करणारा पाचवाच कॅप्टन होणार
श्रेयस अय्यर मैदानावर पाऊल ठेवताच इतिहास रचणार, धोनी आणि कोहलीनंतर असा करणारा पाचवाच कॅप्टन होणार
'मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या समितीत न्यायमूर्तींची गरज नाही' केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका
'मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या समितीत न्यायमूर्तींची गरज नाही' केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका
Embed widget