Nitesh Rane : मनोज जरागे पाटील मराठा समाजाच्या प्रमाणपत्राबाबत काही विषय मांडतायेत ते चूक नाही. मी ही मराठा समाजाचा आहे. तरुण तरुणीवर अन्याय होतं असेल तर मीही पेटून उठणार असल्याचं वक्तव्य मंत्री नितेश राणे यांनी केलं. त्या प्रक्रियेमधील अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे आमच्या मराठा समाजाच्या मुलांमुलींचं नुकसान होतं असेल तर मनोज जरगेंच्या आधी मीच त्यां लोकांचा कार्यक्रम करेन असा इशारा नितेश राणेंनी दिला आहे.

Continues below advertisement

मराठा समाजाच्या मुलांमुलीवर अन्याय  झाला जरांगेंच्या खांद्याला खांदा लावून भूमिका घेणार

मनोज जरागे भांडतायत, भूमिका घेतायेत, समाज हिताच आहे. समाज बांधव म्हणून मी त्यांना एक विनंती करणार किंवा आवाहनन करेन की, ज्या पद्धतीने भाजपच्या प्रमुख नेत्याच्या संदर्भात जी भाषा वापरतायत ती चुकीची आहे. काही सडके आंबे असतील त्यांना आम्हीही सोडणार नाही. त्यांनी बावनकुळे बद्दल विरोधात बोलणे. अन्य नेत्याबदल विरोधात बोलण योग्य नाही. मराठा समाजाच्या मुलांमुलीवर अन्याय  झाला असेल तुमच्या खांद्याला खांदा लावून नितेश राणे त्या अधिकाऱ्यांच्या विरोधात भूमिका घेईन किंवा त्याचा कार्यक्रम करायला मी तयार आहे. मात्र भाषेबद्धल त्यांनी विचार करावा असे नितेश राणे यांनी सांगितले. 

मनोज जरांगे पाटील पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

मराठा आरक्षणाचे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील हे सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. मराठा आरक्षण आणि जात प्रमाणपत्र रद्द संदर्भाने त्यांचा दौरा आहे.  कालपासून म्हणजे दिनांक 8ऑगस्टपासून त्यांच्या दौऱ्यावा लुरुवात झाली आहे. काल ते सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या या दौऱ्याला लोकांचा अभूतपूर्व प्रतिसाद असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आज मनोज जरांगे पाटील यांचा पंढरपुर आणि सांगोला तालुक्यात दौरा होता. हा दौरा आटपून ते सांगली जिल्ह्यात दाखल झाले आहेत. दरम्यान, या कुणबी प्रमाणपत्र रद्द केल्याच्या मुद्यावरुन मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील सत्ताधारी नेत्यांवर हल्लाबोल केला आहे. यावेळी, भाजप नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही टोकाची टीका केली. बावनकुळे हे नाव कधी ऐकलंच नाही, मुळव्याध ऐकलं आहे. आमचं कुळ तर 96 कुळ आहे, हे बावनकुळ कुठनं काढलं. बावनकुळे प्राणी असा विचित्र दिसतो. पूर्वीच्या हडप्पा संस्कृतीमधील मोहानजोदाडो प्रमाणे व अजंठातील लेणीप्रमाणे हा माणूस दिसतो, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा चंद्रशेखर बावनकुळे यांच्या व्यंगावर लक्ष केले. 

Continues below advertisement