Nitesh Rane : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे वरिष्ठ नेते जयंत पाटील यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासमवेत एकाच विमानाने मुंबई ते कोल्हापूर असा प्रवास केला. त्यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. अशातच मंत्री नितेश राणे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या गाडीमध्ये बसण्याची इच्छा सगळ्यांची असते. देवाभाऊचा संवाद लाभणं म्हणजे आपलं भविष्य घडवणं आहे. विभानामध्ये बसल्यानंतर निश्चित पद्धतीने जयंत पाटलांच्या मनामध्ये योग्य विचार येतील असे राणे म्हणाले.
अत्यंत वादग्रत ठरत चाललेलं मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा एकदा लोकसभेमध्ये मांडण्यासाठी एनडीएकडून देशव्यापी फोडाफोडीचं सत्र सुरू असतानाच राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षांचे खासदार सुद्धा एनडीएला साथ देणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे. ही चर्चा रंगली असतानाच त्यांच्याच पक्षाचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीमध्ये उद्या (10 ऑगस्ट) भेट घेणार आहेत. या भेटींवरून राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू असतानाच, आज (9 ऑगस्ट) राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित मुंबई ते कोल्हापूर असा प्रवास केल्याने राजकीय वर्तुळामध्ये पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.
जयंत पाटील यांच्या अर्थमंत्रिपदाची सुद्धा चर्चा
आता शरद पवार पक्षाचे खासदार सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी जाणार असल्याने एक प्रकारे हे कोणते राजकीय संकेत तर नाहीत ना? असा सुद्धा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या राजकारणामध्ये जयंत पाटील यांच्या अर्थमंत्रिपदाची सुद्धा चर्चा रंगली आहे. इतकेच नव्हे तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित केल्यानंतर जयंत पाटील यांच्याकडे राष्ट्रवादीकडील अर्थमंत्रिपद दिलं जाईल असंही बोललं जात आहे.
अंबादास दानवे हिंदुत्वाच्या आणि संघाच्या बाजूने येत असतील तर त्यांचे स्वागत
मोहन भागवत यांच्या कार्यक्रमाला आंबदास दानवेंनी हजेरी लावली. यावर मंत्री नितेश राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे. अंबादास दानवे हे मुळात स्वयंसेवक होते. सघाच्या शाखेत पण जायचे. हिंदुत्व विचारांचे आहेत. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाच्या विरुद्ध भूमिका घेतली. त्यांना किती वेदना व्हायच्या त्यांनी मला एकट्यामध्ये सांगीतलंय. अंबादास दानवे हिंदुत्वाच्या आणि संघाच्या बाजूने येत असतील तर त्यांचे स्वागत असल्याचे नितेष राणे म्हणाले.
मराठा तरुण तरुणीवर अन्याय होतं असेल तर मीही पेटून उठणार
मनोज जरागे पाटील मराठा समाजाच्या प्रमाणपत्राबाबत काही विषय मांडतायेत ते चूक नाही. मी ही मराठा समाजाचा आहे. तरुण तरुणीवर अन्याय होतं असेल तर मीही पेटून उठणार. त्या प्रक्रियेमधील अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे आमच्या मराठा समाजाच्या मुलांमुलींचं नुकसान होतं असेल तर मनोज जरगेंच्या आधी मीच त्यां लोकांचा कार्यक्रम करेन असा इशारा नितेश राणेंनी दिला. मनोज जरागे भांडतायत, भूमिका घेतायेत, समाज हिताच आहे. समाज बांधव म्हणून मी त्यांना एक विनंती करणार किंवा आवाहनन करेन की, ज्या पद्धतीने भाजपच्या प्रमुख नेत्याच्या संदर्भात जी भाषा वापरतायत ती चुकीची आहे. काही सडके आंबे असतील त्यांना आम्हीही सोडणार नाही. त्यांनी बावनकुळे बद्धल विरोधात बोलणे. अन्य नेत्याबदल विरोधात बोलण योग्य नाही. मराठा समाजाच्या अन्याय मुलांमुलीवर झाला असेल तुमच्या खांद्याला खांदा लावून नितेश राणे त्या अधिकाऱ्यांच्या विरोधात भूमिका घेईन किंवा त्याचा कार्यक्रम करायला मी तयार आहे. मात्र भाषेबद्धल त्यांनी विचार करावा असे नितेश राणे यांनी सांगितले.
शरद पवारांचे 8 खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार
शरद पवारांचे 8 खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली. पंतप्रधानांना भेटणं यांच्यामध्ये चूक नाही. आदित्य ठाकरे पण विधानसभेच्या काळात देवेंद्र फडणवीस यांना येऊन भेटतात. कामं घेऊन येतात. देशाचे पंतप्रधान आहेत. खासदार म्हणून कुठले प्रश्न सोडवायचे असतील पंतप्रधान यांच्याकडेच जावं लागेल. आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही असे राणे म्हणाले.
राज ठाकरेंना सिंधुदुर्गमध्ये येण्याचं आवाहन
राज ठाकरे मुंबई गोवा महामार्ग पाहणी दौरा केला, यावर बोलताना राणे म्हणाले की, राज ठाकरेंना चुकून खड्डे दिसले असतील. त्यांनी नक्की मार्गदर्शन करावं. आम्ही चुका सुधारण्यासाठी तयार आहोत. आमच्या सिंधुदुर्गमध्ये येण्याचं आमंत्रण देतो, आमच्या येथे ना खड्डा भेटणार ना तक्रार भेटणार. ते नेहमी पाहणी दौरे करतात असे राणे म्हणाले.