Anganewadi Jatra 2026 : कोकणातील (Konkan) प्रतिपंढरपूर अशी ख्याती असलेल्या तसेच लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि नवसाला पावणाऱ्या आई भराडी देवीच्या यात्रा आंगणेवाडीच्या जत्रेला आजपासून (9 फेब्रुवारी)पासून सुरुवात होत आहे. दीड दिवसांची ही यात्रा असते. मालवण तालुक्यातील मसुरे गावात 'आंगणेवाडी' नावाची वाडी (Anganewadi Jatra) आहे, या वाडीत आई भराडी देवीची ही यात्रा भरते. या जत्रेचं एक खास वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे ही जत्रा कोणत्याही तिथीवर अवलंबून नसते. देवीचा कौल घेऊनच यात्रेचा दिवस निश्चित केला जातो. या जत्रेबद्दल अधिक माहिती जाणून घ्या...
देवीचा कौल घेऊनच जत्रेची तारीख निश्चित होते...
कोकणातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि लाखो भाविकांच्या नवसाला पावणाऱ्या आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या जत्रेची तारीख निश्चित झाली आहे. त्यानुसार, नवीन वर्षात 9 फेब्रुवारीला ही जत्रा सुरु होत आहे. साधारण दीड दिवसांची ही यात्रा असते. देवीचा कौल घेऊन सदर तारीख निश्चित करण्यात येतो. आंगणेवाडीच्या जत्रेचं वैशिष्ट्य म्हणजे ही जत्रा कोणत्याही तिथीवर अवलंबून नसते. देवीचा कौल घेऊनच यात्रेचा दिवस निश्चित करण्यात येतो. यावेळी अनेक राजकीय नेत्यांसह लाखो भाविक यात्रेस उपस्थित असतात. लाखो भाविकां यात्रेला येतात तसंच अनेक राजकीय नेतेमंडळी यात्रेस उपस्थिती लावतात.
....म्हणून भराडी देवी हे नाव प्रसिद्ध झाले
भरडावर देवी प्रकट झाली म्हणून या देवीचं नाव 'भराडी देवी' असं आहे. मालवण तालुक्यातील मसुरे एक गाव आहे. या गावात आंगणेवाडी नावाची वाडी असून या वाडीत 'भराडी देवी' विराजमान आहे. भरडावर देवी प्रकट झाली म्हणून या देवीचं नाव 'भराडी देवी' असं ठेवण्यात आलं आहे. भराड म्हणजे माळरान. या देवीच्या आजूबाजूचा परिसर हा माळरान आहे म्हणूनच या देवीला 'भराडी देवी' असं नाव पडलं. आणि याच ठिकाणी ही यात्रा भरते...
नवसाला पावणारी देवी... दरवर्षी 5 ते 7 लाख भाविक दर्शनासाठी दाखल..
मसुरे गावच्या या आंगणेवाडीच्या या वाडीत केवळ आंगणे कुटुंबियांची ही देवी असल्याचं सांगण्यात येतं. तसा फलक आंगणे कुटुंबियांचं खाजगी मंदिर म्हणून फलक लावला आहे. मात्र, नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असल्याने देवीचं दर्शन सर्वांसाठी खुलं असतं. यावेळी गाऱ्हाणं आणि नवस बोलून अनेक भाविक आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी भराडीदेवीचं दर्शन घेतात. दरवर्षी सुमारे 5 ते 7 लाख भाविक भराडी देवीच्या दर्शनासाठी केवळ दीड दिवसांच्या जत्रेमध्ये सहभागी होतात. आंगणेवाडीच्या भराडी देवीचा नैवेद्य खास असतो. आंगणे कुटुंबियांच्या माहेरवाशिणी अबोल राहून नैवेद्य बनवतात.
सांस्कृतिक सोहळा देखील दिमाखदार...
धार्मिक महत्त्वासोबतच आंगणेवाडीच्या भराडीदेवी यात्रेमध्ये सांस्कृतिक सोहळा देखील रंगतो. आंगणे ग्रामस्थ एक नाटक करतात त्याला मांडावरचं नाटक म्हणतात. मिरजेहून गोंधळी येतात ते देवीसमोर गोंधळ मांडतात. दशावतार असतो. अनेक राजकारणी मंडळी भराडी देवीच्या दर्शनाला येतात.
भराडी देवीच्या यात्रेला कसं जाल?
तुम्हाला जर आंगणेवाडी जत्रेला जायचं असेल तर तुम्ही कणकवली, कुडाळ रेल्वे स्टेशनपासून डेपोपर्यंत जाण्यासाठी शेअर रिक्षाचा पर्याय उपलब्ध आहे. या दोन्ही बस डेपोतून आंगणेवाडीला जाण्यासाठी दर अर्ध्या तासाने बसेस असतात. आंगणेवाडीपर्यंत एसटीच्या तिकीटाचा दर अगदी माफक ठेवण्यात येतो. जर तुम्ही खासगी वाहनाने प्रवास करणार असाल तर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरुन कुडाळ, कसाल, कणकवली या मार्गे आंगणेवाडीपर्यंतचा पुढचा प्रवास करता येईल.
हेही वाचा>>
Weekly Horoscope: आजपासून फेब्रुवारीचा दुसरा आठवडा सुरू! 6 राशींचं भाग्य फळफळलं, कोणत्या राशी मालामाल? पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य
