Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी (Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court) होणार आहे. ही सुनावणी सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमला बागची आणि व्ही मोहना यांच्या विशेष खंडपीठासमोर पार पडणार आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदेंच्या शिवसेनेला देण्याच्या निर्णयावरील आव्हान याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.
मागील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयासमोर कपील सिब्बल यांनी उद्धव ठाकरेंची बाजू मांडली होती. त्यानंतर न्यायालयाने हे प्रकरण 4 ऑगस्ट रोजी सुनावणीसाठी ठेवले होते. त्यानुसार आज सुनावणी होणार आहे. पक्षाचे मूळ चिन्ह धनुष्यबाण आपल्यालाच मिळेल. चिन्ह आपल्याला मिळालं नाही तर ते गोठवलं जाईल, असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी संपर्कप्रमुखांच्या बैठकीत केलं होतं. त्यामुळे आज कोर्टात नेमकं काय होणार याकडे लक्ष लागलं आहे. (Shivsena Name And Symbol Hearing Updates Marathi News)
मागच्या सुनावणीत काय घडलं? (Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court)
- शिवसेनेतील फुटीविरोधातील याचिकांवर अंतिम युक्तिवाद सुरु
- 'आमदार म्हणजे पक्ष नव्हे' असा ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद
- शिंदे गटाला शिवसेना मानून पक्ष आणि चिन्ह बहाल करण्याला विरोध
- आमदारांच्या फुटीला मान्यता दिल्यानं पक्षांतर बंदी कायद्यालाच हरताळ-सिब्बल
- 31 आमदारांचा ठराव म्हणजे पक्षाचा निर्णय नव्हे -सिब्बल
- निवडणूक आयोगाने विधिमंडळातलं बहुमत बघितलं,पक्षीय बहुमताकडे दुर्लक्ष केले-सिब्बल
- विधानसभा अध्यक्षांनी बंडखोर आमदारांना अपात्र न ठरवून चूक केली -सिब्बल
- आमदारांची फोडाफोड आणि पळापळ ही घटनात्मक हाराकिरी-सिब्बल
- आमची याचिका आधीच ऐकली असती तर शिंदे सरकार आलेच नसते -सिब्बल
- सध्या आमदार एका चिन्हावर निवडून येतात,नंतर दुसऱ्याच पक्षात जातात यामुळं लोकशाहीला धोका-सिब्बल
एकनाथ शिंदेंनी ऐतिहासिक बंड करत अखंड शिवसेनेतील 40 पेक्षा जास्त आमदार फोडले- (Eknath Shinde vs Uddhav Thackeray)
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 2022 मध्ये ऐतिहासिक बंड करत अखंड शिवसेनेतील 40 पेक्षा जास्त आमदार फोडले. यानंतर ठाकरे सेना आणि शिंदेंची शिवसेना यामध्ये पक्षाचं नाव आणि चिन्हावरुन जोरदार वाद (Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court) सुरु आहे. या प्रकरणी सुप्रीम कोर्टात 30 जुलैला पुन्हा सुनावणी पार पडली. ठाकरे सेनेच्या वतीनं ज्येष्ठ वकील कपील सिब्बल (Kapil Sibal) यांनी युक्तिवाद केला. 2018 मध्ये झालेल्या पक्षांतर्गत निवडणुकांचे पुरावे सादर करण्यात आल्याचं सिब्बल यांनी निदर्शनास आणलं. तसंच उद्धव ठाकरेंनीच (Uddhav Thackeray) 2018 मध्ये एकनाथ शिंदेंची गटनेतेपदी नियुक्ती केल्याचंही सिब्बल यांनी स्पष्ट केलं. याप्रकरणी आज पुढील सुनावणी होणार आहे.
