एक्स्प्लोर

'तुम्हाला कुठं थांबायचं अन् कुठं जायचं हे स्पष्ट करा', ठाकरे गटाने बंडखोर विजय करंजकरांना सुनावले खडेबोल!

Nashik Lok Sabha Constituency : विजय करंजकर यांनी अखेर बंडखोरी केली आहे. त्यांनी आज अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय. यावरून ठाकरे गटाने विजय करंजकर यांना खडेबोल सुनावले आहेत. 

Nashik Lok Sabha Constituency : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले नाशिक लोकसभा संघटक विजय करंजकर (Vijay Karanjkar) यांनी अखेर बंडखोरी केली असून करंजकर यांनी आज अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय. 

करंजकर अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) हा मोठा झटका मानला जात आहे. करंजकर यांनी त्यांना नक्की  कोणत्या पक्षाकडे जायचे आणि कुठे थांबायचे हे आधी स्पष्ट करावं, उद्धव ठाकरेंवर निष्ठा आहे असं एकीकडे म्हणायचं आणि दुसरीकडे दुसऱ्या पक्षांच्या नेत्याला भेटायचं यामध्ये विसंगती भूमिका दिसून येत असून उमेदवारी न मिळाल्याने बंड करणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी दिली आहे.  

करंजकरांची विसंगती भूमिका

सुधाकर बडगुजर म्हणाले की, अनेक पक्षांच्या मुख्य नेत्यांना विजय करंजकर भेटले आहेत. आज त्यांनी स्वतः कबुली दिली की मातोश्रीवरून मला बोलवणे आले होते. त्यांनी राजकीय भूमिका प्रांजळपणे मांडली पाहिजे.  तुम्हाला कुठल्या पक्षाकडे जायचे आणि कुठे थांबायचे हे त्यांनी स्पष्ट करावं.  उद्धव ठाकरेंवर निष्ठा आहे असं म्हणायचं आणि दुसरीकडे दुसऱ्या पक्षांच्या नेत्याला भेटायचं यामध्ये विसंगती भूमिका दिसून येते आहे. त्यांच्या मनाची संभ्रमावस्था सांगून जाते की, काहीतरी वेगळे चाललं आहे, असे त्यांनी म्हटले आहे.   

राजकीय परिस्थितीमुळे काही बदल करावे लागलेत 

भगूर, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, नाशिकमधील 27 ते 30 नगरसेवक तसेच जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सदस्य आपल्यासोबत असल्याचा दावा विजय करंजकर यांनी केला. यावर सुधाकर बडगुजर म्हणाले की, भगूरचे काही पदाधिकारी आणि नगरसेवक त्यांच्यासोबत असू शकतात. मनातली भूमिका स्पष्ट न केल्याने आजही ते बांधावर आहे. इकडे जायचं का आता बाजूला झुकायचे यात त्यांची संभ्रमावस्था आहे.  त्यांना कुठे जायचंय ते कळत नाही.  त्यांनी चुकीचा निर्णय घेऊ नये योग्य तो सन्मान पक्षात आहे. राजकीय परिस्थितीमुळे काही बदल करावे लागले आहेत. 

उमेदवारी नाही म्हणून पक्षाशी बंद करणे चुकीचे 

विजय करंजकर यांनी मला उमेदवारी मिळू नये म्हणून खालच्या लोकांनी फिल्डिंग लावली, असा आरोप केला. यावर सुधाकर बडगुजर म्हणाले की, करंजकर पक्षाचे बारा वर्षे जिल्हाप्रमुख होते. या अगोदर हेमंत गोडसेंना दोन वेळेस उमेदवारी देण्यात आली. त्यावेळेस देखील त्यांची अपेक्षा होती. मग त्यावेळेस हे आरोप का? केले नाहीत. उद्धव ठाकरेंनी जो निर्णय घेतला तो शिवसैनिकांनी मान्य करायचा असतो. याच जागी त्यांचं नाव घेतलं असतं तर आम्ही सगळ्यांनी त्यांच्यासाठी काम केलं असतं. तुम्हाला उमेदवारी मिळाली नाही म्हणून पक्षाशी बंड करायचं हे चुकीचं आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 

आणखी वाचा 

'मी रोज व्यायाम करणारा माणूस, चांगल्या चांगल्यांची तब्येत बिघडवेल', ठाकरे गटाच्या नाराज विजय करंजकरांचा रोख कुणाकडे?

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
आपण बोललो म्हणजे देशद्रोही ठरत नाही, आता मी आवाज उठवणार, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा
आपण बोललो म्हणजे देशद्रोही ठरत नाही, आता मी आवाज उठवणार, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Maharashtra Dam Water Storage: राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
तू ऊसात चल... सुनेचा विनयभंग करणाऱ्याला जाब विचारला; 70 वर्षीय सासऱ्यालाच संपवलं, परप्रांतीय मजुराला अटक
तू ऊसात चल... सुनेचा विनयभंग करणाऱ्याला जाब विचारला; 70 वर्षीय सासऱ्यालाच संपवलं, परप्रांतीय मजुराला अटक
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; 'गेट मीटिंग' घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; 'गेट मीटिंग' घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
'तर मग तिसऱ्या भाषेची काय गरज? नववीच्या विद्यार्थ्यांवर तिसऱ्या भाषेचं ओझं टाकू नका, पाचवी किंवा सहावीपासून सुरुवात करा..' सुप्रीम कोर्टाची थेट फटकार
'तर मग तिसऱ्या भाषेची काय गरज? नववीच्या विद्यार्थ्यांवर तिसऱ्या भाषेचं ओझं टाकू नका, पाचवी किंवा सहावीपासून सुरुवात करा..' सुप्रीम कोर्टाची थेट फटकार
100 ISRO Scientists Quit Their Jobs: अवघ्या 10 महिन्यात इस्रोच्या तब्बल 100 शास्त्रज्ञांचा नोकरीला रामराम! महत्वाकांक्षी गगनयान आणि इतर मोहिमांमध्ये सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांचा सुद्धा समावेश
अवघ्या 10 महिन्यात इस्रोच्या तब्बल 100 शास्त्रज्ञांचा नोकरीला रामराम! महत्वाकांक्षी गगनयान आणि इतर मोहिमांमध्ये सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांचा सुद्धा समावेश
Embed widget