(Source: Poll of Polls)
Shiv Sena Minister Meeting : महायुतीत निधीवाटपावरुन खडाजंगी; शिवसेना मंत्र्यांमध्ये महत्वाची बैठक; समसमान निधीचा फाॅर्म्युलाही ठरला!
Shiv Sena Minister Meeting : शिवसेना पक्षातील मंत्र्यांच्या झालेल्या बैठकित तीनही पक्षातील आमदारांना समसमान निधी देण्यावर एकमत झाले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

Shiv Sena Minister Meeting : महायुतीमध्ये निधीवाटपाच्या मुद्यावरून अधून मधून खडाजंगी होत असल्याची चर्चा असताना हा वाद तिन्ही पक्षातील आमदार आणि मंत्र्यांनी वेळो वेळी पक्षश्रेष्ठींकडे बोलून दाखवला आहे. अशातच आता शिवसेना मंत्र्यांची निधीवाटपावरून महत्वाची बैठक झाली आहे. शिवसेना पक्षातील मंत्र्यांच्या झालेल्या बैठकित तीनही पक्षातील आमदारांना समसमान निधी देण्यावर एकमत झाले आहे. निधीवाटपवरून तीनही पक्षातील नाराजी टाळणासाठी शिवसेना मंत्र्यांमध्ये समसमान निधीचा फाॅर्म्युला ठरल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, लवकरच याबाबत तीनही पक्षातील प्रमुख नेते किंवा समन्वय समितीच्या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, निधीवरून नेकतच भाजप आमदार विनोद अग्रवाल आणि संजय पूरम यांनी मंत्री भरत गोगावलेंची वाट अडवत जाब विचारला. निधीवरून मंत्री आणि आमदारांमध्ये होणारी ही खडाजंगी रोखण्यासाठी महायुतीतील समन्वय समितीत किंवा तीनही प्रमुख पक्षांच्या नेत्यांमध्ये अधिवेशन काळात महत्वाची बैठक होणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या पंढरपूरच्या दौऱ्यावर
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या(2 जुलै) पंढरपूरचा दौरा करणार आहे. वारी आधी पंढरपूर येथे जाऊन सर्व सेवा सुविधा यांचा आढावा घेण्याची पद्धत त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत सुरु केली होती. यावेळी देखील शिंदे पंढरपूर येथे जाऊन वारकऱ्यांना मिळणाऱ्या सोई सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याची माहिती शिवसेना अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी दिली आहे.
सिरोंचा नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षसह नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
गडचिरोलीच्या सिरोंचा येथील नगराध्यक्ष शेख फरजाना, उपनगराध्यक्ष शेख अब्दुल रऊफ अब्दुल गफार यांच्यासह सभापती नरेश कुमार अलोणे, नगरसेवक राजेश बंदेला, दुग्याला साईलू, अकुदरी पोचम, भवानी गणपुरवार यांनी आदिवासी विद्यार्थी संघाशी फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या उपस्थितीत मुंबई येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. सिरोंचा नगरपंचायतीवर आदिवासी विद्यार्थी संघाचे वर्चस्व होते. मात्र आता आदिवासी विद्यार्थी संघाचे शिलेदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आल्याने अविसंला मोठा धक्का बसला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या



















