Sharad Pawar पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षार्थ्यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली होती. एमपीएससी परीक्षेसंदर्भातील विविध मागण्यांसाठी या विद्यार्थ्यांनी पुण्यातील मोदी बागेतील कार्यालयात भेट घेतली होती. या भेटी अंती विद्यार्थ्यांच्या मागण्या समजावून घेत आज (15 एप्रिल) शरद पवार यांनी एमपीएससी (MPSC) आयोगाचे अध्यक्ष रजनीश सेठ (Rajanish Sheth) यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. एमपीएससी मधील इडब्ल्यूस, एसइबीसी आरक्षणाच्या संदर्भात येणाऱ्या तांत्रिक अडचणी यावर तत्काळ शासनाने तोडगा काढावा, आशा सूचना शरद पवारांनी यावेळी दिल्या आहेत. तसेच रजनीश शेठ यांच्याशी फोनवर संवाद साधत असताना विद्यार्थ्यांच्या इतर मागण्यांबाबतही फोनवर संवाद साधत पवारांनी चर्चा केली असल्याची माहिती पुढे आली आहे. 

Continues below advertisement


मुख्यमंत्र्यांना देखील फोन करणार असल्याचे आश्वासन


एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज (15 एप्रिल)पुन्हा शरद पवार यांची वाय बी चव्हाण सेंटर येथे भेट घेतली आणि आपल्या विविध मागण्या मांडल्या. विद्यार्थ्यांकडून जागा वाढी संदर्भात सरकारने निर्णय करावा, अशी देखील शरद पवारांकडे मागणी केली. विद्यार्थ्यांच्या भेटीनंतर शरद पवारांकडून मुख्यमंत्र्यांना देखील फोन करणार असल्याचे आश्वासन देण्यात आलंय. तर एमपीएससी मधील इडब्ल्यूस, एसइबीसी आरक्षणाच्या संदर्भात येणाऱ्या तांत्रिक अडचणी यावर तत्काळ शासनाने तोडगा काढावा, आशा सूचना  MPSC आयोगाचे अध्यक्ष रजनीश शेठ यांना शरद पवारांनी दिल्या आहेत. 


आमच्या प्रामुख्याने दोन मागण्या आहेत-  MPSC विद्यार्थी


दरम्यान, आमच्या प्रामुख्याने दोन मागण्या आहेत. संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जागा वाढवाव्या आणि राज्य सेवा मुख्य परीक्षेत तांत्रिक अडचणी आहेत, त्या दूर कराव्यात. अशी आमची मागणी असल्याची माहिती  MPSC विद्यार्थी सोमनाथ चव्हाण याने दिली आहे. PSI च्या 3 हजार जागा असताना 200 जागांसाठी जाहिरात काढलीय, याबाबत पवार साहेबांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. फोनवर देखील बोलतो, असं पवार साहेबांनी सांगितलंय. सोबतच  MPSC आयुक्तांसोबत उद्या बैठक असल्याची माहितीही या विद्यार्थाने दिली आहे. त्यामुळे आता या प्रकरणावर नेमका काय तोडगा निघतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI