बीड: विधानसभा निवडणुकीआधी धनंजय मुंडेंचे (Dhananjay Munde) विरोधक बबन गित्ते यांना कसं गुंतवता येईल? याचं परफेक्ट प्लॅनिंग करून परळीतील सरपंच बापू आंधळेचा बळी घेण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते महबूब शेख (Mehboob Sheikh) यांनी केलाय. गीते यांच्या वकिलांकडून आंधळे यांचा खून झाला. त्यावेळी ते तिथे नव्हते, हे सिद्ध करण्यात आलं. मात्र फरार आरोपी गोट्या गित्तेचा पुरवणी जबाब घेऊन वेळ बदलण्यात आल्याचंहि शेख यांनी म्हटलं.

Continues below advertisement


पोलीस यंत्रणा 'त्यावेळी' घरगडी असल्यासारखं काम करत होती


पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत पदभार घेण्यापूर्वी सर्व पोलीस यंत्रणा तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड याचे घरगडी असल्यासारखं काम करत होती. आणि त्याचा त्रास आम्हा सर्वांनी भोगला असल्याची खंत मेहबूब शेख यांनी बोलून दाखवली.


दरम्यान, राज्य सरकारकडून नियुक्त करण्यात आलेल्या एस.आय.टी.चे (SIT) प्रमुख पंकज कुमावत सोमवारी परळी येथे दाखल झाले. त्यांनी तहसील समोरील मैदानात असलेल्या घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत एस.आय.टी. मधील सदस्य आणि परळी शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी देखील होते. दुपारी साडेचारच्या दरम्यान घटनास्थळी पोहचलेले पथक रात्री आठ वाजेपर्यंत घटनास्थळीच होते. यावेळी कुमावत यांनी संपूर्ण घटनाक्रम समजून घेतला, आता यानंतर तपासाला सुरुवात होणार आहे. मात्र महादेव मुंडे यांचे मारेकरी 21 महिन्यापासून मोकाटच आहेत. याच मुद्यावर बोट ठेवत महबूब शेख यांनी भाष्य केलंय.


धनंजय मुंडे यांचा शासकीय बंगल्यात जीव गुंतला, त्यांना वाटतं मी पुन्हा येईल


तर धनंजय मुंडे यांचा शासकीय बंगल्यात जीव गुंतला आहे. त्यांना वाटत असेल मी पुन्हा येईल.. माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा होण्यासाठी देव पाण्यात ठेवून कार्यकर्ते बसले होते. मुख्यमंत्री अथवा अजित दादांनी त्यांना बंगला सोडू नये. असं सांगितले असेल अशी प्रतिक्रिया मेहबूब शेख यांनी दिली.


धाराशिवमध्ये शरद पवारांना धक्का, राहुल मोटे अजितदादांच्या राष्ट्रवादीत


धाराशिवमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवारांनी धक्का दिला आहे. परंड्याचे माजी आमदार राहुल मोटे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. राहुल मोटे यांनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवारांचा घड्याळा हाती बांधण्याचा निर्णय घेतला. परंडा मतदारसंघातून पाच वेळा निवडणूक लढवलेले आणि सलग तीन वेळा आमदार राहिलेले राहुल मोटे मागील निवडणुकीत शिवसेनेच्या तानाजी सावंत यांच्याकडून दीड हजार मतांनी पराभूत झाले होते. राहुल मोटेंच्या पक्षप्रवेशामुळे धाराशिवमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बळ वाढणार आहे. मात्र, यामुळे धाराशिवमध्ये महायुतीत पेच निर्माण होणार आहे. शिंदेच्या शिवसेनेचे तानाजी सावंत आणि राहुल मोटे हे कडवे राजकीय प्रतिस्पर्धी आहेत. विधानसभेला त्यांच्यात कडवी झुंज झाली होती, ज्यात सावंतांचा अवघ्या दीड हजार मतांनी विजय झाला होता. राहुल मोटे अजित पवारांसोबत आल्याने मतदारसंघामध्ये परस्पर पेच निर्माण होणार आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या