एक्स्प्लोर

Shaktipeeth Expressway: शक्तीपीठ महामार्ग विरोधात आंदोलनाला वेगळं वळण; आंदोलन करणाऱ्या राजू शेट्टी यांच्यासह 400 जणांवर गुन्हे दाखल

Shaktipeeth Expressway : शक्तीपीठ महामार्ग विरोधात आंदोलन केल्या प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी  यांच्यासह 400 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 

Shaktipeeth Expressway कोल्हापूर : राज्यातील महायुती सरकारचा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर ते गोवा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाच्या (Shaktipeeth Expressway) विरोधात मंगळवारी राज्यातील बारा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला. यात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी थेट रस्त्यावर उतरून या महामार्गाला कडाडून विरोध दर्शवला. अशातच  कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्या नेतृत्वाखाली पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग सुमारे दीड तास रोखून सरकारला सज्जड इशारा दिला. कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्याने आता सरकारची चांगलीच कोंडी होणार असल्याची चिन्ह असताना या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. शक्तीपीठ महामार्ग विरोधात आंदोलन केल्या प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी  यांच्यासह 400 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 

बंदीचे आदेश असताना जमाव एकत्र करून महामार्ग रोखल्याचा ठपका

पुढे आलेल्या माहितीनुसार, बंदीचे आदेश असताना जमाव एकत्र करून महामार्ग रोखल्याचा ठपका ठेवत राजू शेट्टी यांच्यासह 400 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यात राजू शेट्टी यांच्यासह माजी आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार राजू बाबा आवळे, शिवसेनेचे नेते विजय देवणे यांच्यासह 400 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोल्हापूरच्या शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, आंदोलनापूर्वी राजू शेट्टी यांच्या शिरोळ इथल्या घरी कोल्हापूर पोलीस पोहोचले होते. यावेळी शक्तीपीठ महामार्ग विरोधात चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना नोटीस देखील बजावण्यात आली होती. अशातच बंदीचे आदेश  असतानाही  जमाव एकत्र करून महामार्ग रोखल्याचा ठपका ठेवत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणारा नागपूर ते गोवा या शक्तिपीठ महामार्गाला सुरुवातीपासूनच विरोध होऊ लागलाय. बारा जिल्ह्यातून जाणाऱ्या या शक्तीपीठ महामार्गाच्यासाठी 86000 कोटीचा चूराडा होणार आहे. तर हजारो हेक्टर सुपीक जमीन ही या महामार्गामुळे बाधित होणारे. त्यातच शेतकऱ्यांना तुलनेत कमी मोबदला मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गाविरोधात कृती समितीच्या माध्यमातून राज्यातील बारा जिल्ह्यांमध्ये अक्षरशः रान पेटवले आहे.काल (1 जुलै) कोल्हापूरसह बारा जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन करत सरकारला पावसाळ्यातही शेतकऱ्यांनी चांगलाच  घाम फोडलाय. कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पंचगंगा नदी जवळ महामार्ग रोको आंदोलन केले. यावेळी शेकडो शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत शक्तिपीठ रद्द झालाच पाहिजे असा नारा दिला. 

....तर गोफनद्वारे ड्रोन फोडू- राजू शेट्टी

दरम्यान यावेळी राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंढरपूरला एकादशीला विठ्ठलाची पूजा करण्यासाठी येणार आहेत त्यांना विठ्ठलाने सुबुद्धी द्यावी आणि शक्तीपीठ रद्द करावा, असं साकडे घालण्यासाठी  जाणार आहे. सरकारने शक्तिपीठ महामार्ग हा प्रतिष्ठेचा विषय करू नये. शक्तीपीठ महामार्गाला विरोध म्हणजे विकासाला विरोध असे समजू नये. ड्रोनद्वारे शेत जमिनीची मोजणी करण्यास कोणी आले तर गोफनद्वारे ड्रोन फोडू" असेही शेट्टी यांनी बजावले.

हे ही वाचा 

महत्त्वाच्या बातम्या

Vidhan Parishad Election 2026: एकनाथ शिंदेंचा फोन अन् महायुतीच्या नंदकिशोर महाजनांच्या विजयाच्या मार्ग मोकळा, जळगाव विधान परिषद निवडणुकीत शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट
एकनाथ शिंदेंचा फोन अन् महायुतीच्या नंदकिशोर महाजनांच्या विजयाच्या मार्ग मोकळा, जळगाव विधान परिषद निवडणुकीत शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट
Shivsena Opration Tiger Eknath Shinde-Uddhav Thackeray: ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, पण एकनाथ शिंदेंची सावध खेळी; एका निर्णयाने पुन्हा सगळे चक्रावले, नेमकं काय घडलं?
ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, पण एकनाथ शिंदेंची सावध खेळी; एका निर्णयाने पुन्हा सगळे चक्रावले, नेमकं काय घडलं?
Ravikant Tupkar: शेतकरी नेते रविकांत तुपकरांचं अन्नत्याग आंदोलनाचा आजचा चौथा दिवस; तुपकरांची प्रकृती खालावली, किडनीवर ही परिणाम, बुलढाण्यासह विदर्भातील शेतकरी आक्रमक
शेतकरी नेते रविकांत तुपकरांचं अन्नत्याग आंदोलनाचा आजचा चौथा दिवस; तुपकरांची प्रकृती खालावली, किडनीवर ही परिणाम, बुलढाण्यासह विदर्भातील शेतकरी आक्रमक
Weekly Horoscope: जूनचा शेवटचा आठवडा पॉवरफुल, 6 राशींचं नशीब पालटणार! पौर्णिमेसह अद्भूत शुभ संयोग, भोलेनाथांचं पाठबळ, साप्ताहिक राशीभविष्य
जूनचा शेवटचा आठवडा पॉवरफुल, 6 राशींचं नशीब पालटणार! पौर्णिमेसह अद्भूत शुभ संयोग, भोलेनाथांचं पाठबळ, साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

BJP Grand Plan Operation Tiger : शिदेंना ताकदीची गोळी, भाजपची कोणती खेळी? Special Report
Opration Tiger : खासदार वाढले तरी ऑपरेशन टायगर सुरूच; शिंदेंचं अंतिम लक्ष्य काय? | Special Report
Operation Tiger Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : ऑपरेशन फत्ते की ठाकरेंकडे पत्ते? | Special Report
Arvind Sawant on Operation Tiger : ऑपरेशन टायगर फेल, सगळे खासदार ठाकरेंसोबत, सावंतांचा दावा
Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yes Bank Share Price : 'गोल्डन क्रॉसओव्हर'मुळे यस बँक शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी; 52 आठवड्यांचा नवा उच्चांक
'गोल्डन क्रॉसओव्हर'मुळे यस बँक शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी; 52 आठवड्यांचा नवा उच्चांक
HCC Share Price : 30 रुपायांपेक्षा कमी किमतीचा शेअर, मुकुल अग्रवाल यांनी एकाच दिवसात कमावले 7 कोटी, शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी
30 रुपायांपेक्षा कमी किमतीचा शेअर, मुकुल अग्रवाल यांनी एकाच दिवसात कमावले 7 कोटी, शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी
उद्धवजी, आदित्य आणि वहिनी हे तिघेच पक्षात राहणार, रामदास कदमांचा टोला, देखो आगे क्या होता है म्हणत दिला इशारा
उद्धवजी, आदित्य आणि वहिनी हे तिघेच पक्षात राहणार, रामदास कदमांचा टोला, देखो आगे क्या होता है म्हणत दिला इशारा
पंढरपुरातील तरुणाच्या मृत्यूचं गूढ वाढलं, आई म्हणते, माझ्या मुलाला संपवलं; पोलीस म्हणतात, रेल्वेसमोर उडी मारली
पंढरपुरातील तरुणाच्या मृत्यूचं गूढ वाढलं, आई म्हणते, माझ्या मुलाला संपवलं; पोलीस म्हणतात, रेल्वेसमोर उडी मारली
Shivsena : ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, तांत्रिक बाबींमुळे पुरावे दिले नाहीत, ठाकरेंचे डावपेच बघूनच पुढचे पाऊल; शिंदेंच्या शिवसेनेचा दावा, सूत्रांची माहिती
ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, तांत्रिक बाबींमुळे पुरावे दिले नाहीत, ठाकरेंचे डावपेच बघूनच पुढचे पाऊल; शिंदेंच्या शिवसेनेचा दावा, सूत्रांची माहिती
Prince Yadav: प्रिन्स यादव पदार्पणाच्या सामन्यातच दुर्दैवी ठरला, नको तेच घडलं; अशी चूक आयुष्यभर कधीच विसरणार नाही!
प्रिन्स यादव पदार्पणाच्या सामन्यातच दुर्दैवी ठरला, नको तेच घडलं; अशी चूक आयुष्यभर कधीच विसरणार नाही!
Weather Update: जूनच्या तिसऱ्या आठवड्यातही मान्सूनने देशाचा बराचसा भाग व्यापलाच नाही; 723 जिल्ह्यांपैकी केवळ 103 जिल्ह्यांमध्ये सामान्य पाऊस, गेल्या सात दिवसांपासून तेलंगणात अडकला
जूनच्या तिसऱ्या आठवड्यातही मान्सूनने देशाचा बराचसा भाग व्यापलाच नाही; 723 जिल्ह्यांपैकी केवळ 103 जिल्ह्यांमध्ये सामान्य पाऊस, गेल्या सात दिवसांपासून तेलंगणात अडकला
ऑपरेशन टायगर फेल, आमचे सर्वच्या सर्व 9 खासदार आमच्यासोबत; ओमराजे निंबाळकरांबद्दही बोलले अरविंद सावंत
ऑपरेशन टायगर फेल, आमचे सर्वच्या सर्व 9 खासदार आमच्यासोबत; ओमराजे निंबाळकरांबद्दही बोलले अरविंद सावंत
Embed widget