Shahapur News : देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरापासून 73 किलोमीटर अंतरावर शहापूर तालुका आहे. मात्र या तालुक्यात अद्यापही अनेक मुलभूत सो़ईसुविधांपासून हजारो गावकरी वंचित आहेत. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील उंबरमाळी गावासह अनेक गावात आजही मूलभूत सुविधांचा अभाव जाणवतोय. देशाला स्वातंत्र्य मिळून तब्बल 78 वर्षे पूर्ण झाली असली तरी या गावातील कातकरी आदिवासी समाजाला मरणानंतरदेखील सन्मानाने अंत्यसंस्कार करता येत नाहीत, ही वस्तुस्थिती अतिशय वेदनादायी असल्याचे चित्र समोर आलंय. मरणानंतरही मरण यातनाच या अधिवासी बांधवाच्या नशिबी आल्याचं दिसून येत आहे.
चिखलातून, ओढे-नाल्यांमधून मृतदेह नेणे म्हणजे कुटुंबियांच्या दुःखात भरच
शहापूर तालुक्यातील शिरोळ ग्रामपंचायत हद्दीतील उबंरमाळी गावात राहणारे मुकूंद लक्ष्मण वाघ ( वय 74) यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पार्थिवारव अंत्यसंस्कर करायचे नातेवाईकांनी ठरवले. मात्र गावात समशानभूमीच नाही, शिवाय मृतदेह जाळण्यासाठी ठराविक जागा उपलब्ध नाही. कुठेही मोकळ्या जागेवर अंत्यसंस्कार करावे लागतात. एवढेच नव्हे तर जेथे जाळण्याची सोय आहे, त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे मृतदेह खांद्यावरून उचलून नेण्याची वेळ येत आहे. पावसाळ्यात तर ही परिस्थिती आणखी गंभीर होते. चिखलातून, ओढे-नाल्यांमधून मृतदेह नेणे म्हणजे कुटुंबियांच्या दुःखात भरच पडत असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली.
देशाच्या स्वातंत्र्यानंतरही मुलभूत सो़ईसुविधांपासून हजारो गावकरी वंचित
आजही कातकरी समाज हा अत्यंत मागासलेला असून शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि निवारा या मुलभूत गरजांपासून ते वंचित आहेत. शासनाकडून विविध योजना राबवल्या जात असल्या तरी त्याचा प्रत्यक्ष लाभ या समाजापर्यंत पोहोचत नाही. देशाच्या स्वातंत्र्यानंतर विकासाच्या अनेक घोषणा झाल्या, परंतु उंबरमळीतील वास्तव त्याच्या अगदी उलट आहे. मृत व्यक्तीसाठी अंतिम संस्काराची सोय आणि त्यासाठी रस्त्याची सुविधा हा मनुष्यधर्माचा प्रश्न आहे. शासन व प्रशासनाने तातडीने लक्ष घालून या गावाला मासनभूमी व रस्त्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी ग्रामस्थांसह श्रमजीवी संघटनेचे तालुका सचिव खोडका यांनी मागणी केली आहे.
देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरापासून 73 किलोमीटर अंतरावर शहापूर
देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरापासून 73 किलोमीटर अंतरावर शहापूर तालुका आहे. मात्र या तालुक्यात अद्यापही अनेक मुलभूत सो़ईसुविधांपासून हजारो गावकरी वंचित आहेत. खळबळजनक बाब म्हणजे तालुक्यात 110 ग्रामपंचायती तर 227 महसुली गावे आणि 414 गावपाडे अशी संख्या असून काही गाव वाड्या, पाड्यांना रस्ते नसल्याने पावसाळ्यात जीवधोक्यात घालून गावकऱ्यांना नाले ओलांडून, चिखल तुडवत, पायपीट करावी लागत आहे. शिवाय उन्हाळ्यात भिषण पाणी टंचाई तर पावसाळा सुरू झाला की, अनेक गाव पाड्यात उघड्यावर मृतांवर अंत्यविधी करावा लागत आहे.
आणखी वाचा