Scorpio Horoscope Today 30th March 2023 : वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काही विशेष खास असणार नाही. मनःशांतीसाठी धार्मिक कार्यक्रमात थोडा वेळ घालवा. ध्यान केल्याने तुम्हाला शांतीही मिळेल. तुमचा पैसा कुठे खर्च होतोय यावर लक्ष ठेवा, अन्यथा तुम्हाला भविष्यात आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद संपवून तुम्ही तुमचा उद्देश सहज पूर्ण करू शकता. तुमचं मन व्यक्त केल्याने तुम्हाला खूप हलके वाटेल. आज तुमच्या वाईट सवयी उद्या तुम्हाला भारी पडू शकतात. प्रवासाला जाण्याची शक्यता आहे. प्रवासादरम्यान तुमचा नवीन लोकांशी संपर्क होईल. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढेल. बेरोजगारांना चांगली नोकरी मिळण्याची चिन्हे आहेत.
कुटुंबाचं सहकार्य मिळेल
वृश्चिक राशीच्या लोकांबद्दल बोलायचे झाल्यास तुमचं एखादं मोठं स्वप्न सत्यात बदलू शकतं, पण तुमचा उत्साह नियंत्रणात ठेवा कारण जास्त आनंदही संकटाचं कारण ठरु शकतं. कुटुंबाचं सहकार्य मिळेल. घरात अनपेक्षितपणे पाहुणे येऊ शकतात, पण या पाहुण्यांच्या येण्याने तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. नोकरदार वर्गाला नवीन कामाची सुरुवात करावी लागेल.
आज तुम्हाला प्रत्येक कामात उत्सुकता वाटेल. नोकरदार वर्गाच्या इच्छा पूर्ण होतील. आर्थिकदृष्ट्या लाभ होईल. राजकीय क्षेत्रात वर्चस्व वाढेल. सासरच्या मंडळींकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. आज तुम्ही तुमच्या जुन्या मित्राला भेटू शकता, त्यांच्याबरोबर बालपणीच्या आठवणी ताज्या करा. आवडत्या गोष्टींत मन रमवा. जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. समाजसेवा करताना वरिष्ठांना विश्वासात घ्या.
आज वृश्चिक राशीचे आरोग्य
जास्त कामामुळे तुम्हाला खूप थकवा जाणवू शकतो. वजन कमी करण्यावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. कमी प्रमाणात खा आणि जास्त फळांचं सेवन करा.
वृश्चिक राशीसाठी आजचे उपाय
पिवळे वस्त्र परिधान करून केळीच्या झाडाची पूजा करा आणि संध्याकाळी तुळशीच्या झाडावर तुपाचा दिवा लावा.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे. तर, वृश्चिक राशीसाठी आजचा लकी नंबर 8 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :