एक्स्प्लोर

Satish Bhosale : खोक्याचं डोकं बर्फाच्या थंडगार पाण्यात बुडवलं; काही जणांची नावं घेण्यासाठी अधिकाऱ्यांकडून बळजबरी; वकिलाचा खळबळजनक आरोप

Satish Bhosale : घरात प्राण्यांचे मांस आणि शिकारीचे साहित्य सापडल्याप्रकरणी वन विभागाने सतीश उर्फ खोक्या भोसलेला ताब्यात घेतले होते.

Satish Bhosale : घरात प्राण्यांचे मांस आणि शिकारीचे साहित्य सापडल्याप्रकरणी काल वन विभागाने सतीश उर्फ खोक्या भोसलेला (Satish Bhosale) ताब्यात घेतले होते. मात्र या दरम्यान त्याला वनविभागाचे (Forest Department) अधिकाऱ्याने मारहाण केल्याचा आरोप खोक्याच्या वकिलाने केला होता. मारहाण झाल्यानंतर खोक्याचे फोटो देखील समाज माध्यमांवर वायरल झाले होते. आता खोक्याचे वकील शशिकांत सावंत यांनी मारहाणीबाबत सविस्तर माहिती दिली आहे. 

एका शेतकऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी खोक्या भोसले याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांकडून त्याला अटक करत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यादरम्यान, खोक्या भोसलेच्या घराच वन्य जीवाचं मांस आढळून आलं होतं. त्यामुळे त्याच्यावर वन्य जीवाची शिकार केल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणानंतर वनविभागाच्या पथकाकडून खोक्या भोसलेची चौकशी करण्यासाठी त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं. मात्र वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी खोक्या भोसलेला टॉर्चर केल्याचा आरोप त्याच्या वकिलांनी केला आहे. 

खोक्याच्या वकिलांचा खळबळजनक आरोप 

याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात तक्रार देखील दाखल करण्यात येणार असल्याचे त्याच्या वकिलाने सांगितले. खोक्याला मारहाण करून त्याचे डोके बर्फाच्या पाण्यात बुडवण्यात आले. यावेळी अधिकाऱ्यांनी त्याला काही जणांचे नाव घेण्याची बळजबरी देखील केली, असे खळबळजनक आरोप शशिकांत सावंत यांनी केला आहे. दरम्यान, मारहाणीचा प्रकार समोर आल्यानंतर खोक्याचे मेडिकल केल्यानंतर ही मारहाण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर न्यायालयाने खोक्याला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावणी आहे. 

कोण आहे सतीश भोसले उर्फ खोक्या? 

सतीश भोसले हा मागील पाच वर्षापासून राजकारणात सक्रिय असून तो शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडीचा रहिवासी आहे. त्याच्याकडे भाजपच्या महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचे पद आहे. सामाजिक कार्यातून ओळख निर्माण केली आहे. तसेच पारधी समाजासाठी सामाजिक कार्य केले. याआधीही सतीश भोसलेवर गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळत आहे. अलीकडच्या काळात सुरेश धस यांच्याशी संपर्क आल्याने जवळीक वाढली. सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याची ओळख निर्माण झाल्याने परिसरात दबदबा निर्माण झाला आहे. एका शेतकऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी खोक्या भोसले याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

पार्वती अन् सरस्वती सख्ख्या जावांचा मृत्यू, 2 अन् 4 वर्षांची लेकरं पोरकी; ट्रॅक्टर दुर्घटनेनं गावावर शोककळा, सरकारकडून 5 लाखांची मदत

Suresh Dhas Beed Crime: खोक्या प्रकरणात मला व्हिलन ठरवून माझ्या खुनाचा कट आखला होता, राजस्थानातून मारेकरी आले होते; सुरेश धस यांचा खळबळजनक दावा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 18 April 2026: आज शनिवारचा दिवस 7 राशींचं नशीब पालटणारा! शनिदेवांच्या कृपेने लवकरच संकटातून मुक्ती, आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस 7 राशींचं नशीब पालटणारा! शनिदेवांच्या कृपेने लवकरच संकटातून मुक्ती, आजचे राशीभविष्य
एका बाजूला वाढला तापमानाचा पारा, तर दुसऱ्या बाजूला अवकाळीचा मारा, राज्यातील शेतकरी चिंतेत
एका बाजूला वाढला तापमानाचा पारा, तर दुसऱ्या बाजूला अवकाळीचा मारा, राज्यातील शेतकरी चिंतेत
GT vs KKR IPL 2026 : ग्रीनची झुंज फिकी, गिलचा कहर! विजयासाठी आसुसलेल्या कोलकाताच्या नशिबी पुन्हा पराभव, गुजरातची टॉप-4 मध्ये दिमाखात एन्ट्री
ग्रीनची झुंज फिकी, गिलचा कहर! विजयासाठी आसुसलेल्या कोलकाताच्या नशिबी पुन्हा पराभव, गुजरातची टॉप-4 मध्ये दिमाखात एन्ट्री
GT vs KKR Live Update : अहमदाबादमध्ये गिलचं 'चक्रीवादळ'; केकेआरचा पालापाचोळा, गुजरातचा धमाका
GT vs KKR Score IPL 2026 : अहमदाबादमध्ये गिलचं 'चक्रीवादळ'; केकेआरचा पालापाचोळा, गुजरातचा धमाका

व्हिडीओ

Nashik TCS Case Special Report : कॉर्पोरेट जिहाद प्रकरण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कनेक्शन?
Navneet Rana Vs Pyare Khan Special Report : अमरावती परतवाडा प्रकरण, राणा विरुद्ध खान वाद पेटला
Amravati Crime Special Report : विकृतीची परिसीमा गाठणारी पैज, परतवाडा प्रकरणात धक्कादायक खुलासे
Walmik Karad : देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Ashok Kharat : खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन, समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर; CM फडणवीस म्हणाले, उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू, एकनाथ शिंदेंचाही हल्लाबोल
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर; CM फडणवीस म्हणाले, उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू, एकनाथ शिंदेंचाही हल्लाबोल
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांनी लोकसभेत मांडली भूमिका
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांची लोकसभेत मांडली भूमिका
Amit Shah : महिला आरक्षण विधेयक नामंजूर होताच अमित शाहांची पोस्ट, 2029 चा उल्लेख करत विरोधकांना इशारा, पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया
महिला आरक्षण विधेयक नामंजूर होताच अमित शाहांची पोस्ट, 2029 चा उल्लेख करत विरोधकांना इशारा
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
Rahul Gandhi : संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर होताच राहुल गांधी यांची प्रतिक्रिया
संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, राहुल गांधींची प्रतिक्रिया ; प्रियांका गांधी काय म्हणाल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2026 | शुक्रवार
भाजप गेली 10 वर्ष पक्ष फोडत होता, आता देशात दोन गट पाडण्यापर्यंत मजल, महिला आरक्षणातून स्वतःकडे सत्तेचा अमरपट्टा ते हिंदीकरण करण्याचा प्रयत्न ते आंदोलन उभारणार; राज ठाकरे काय काय म्हणाले? 12 मोठे मुद्दे
भाजप गेली 10 वर्ष पक्ष फोडत होता, आता देशात दोन गट पाडण्यापर्यंत मजल, महिला आरक्षणातून स्वतःकडे सत्तेचा अमरपट्टा ते हिंदीकरण करण्याचा प्रयत्न ते आंदोलन उभारणार; राज ठाकरे काय काय म्हणाले? 12 मोठे मुद्दे
Video: पोक्सो दाखल करा म्हणताच नवनीत राणांचा संताप; म्हणाल्या, प्यारे खान आधी स्वतःचं पाहा, संविधान पुढे ठेवाल की कुराण?
Video: पोक्सो दाखल करा म्हणताच नवनीत राणांचा संताप; म्हणाल्या, प्यारे खान आधी स्वतःचं पाहा, संविधान पुढे ठेवाल की कुराण?
Embed widget