एक्स्प्लोर

सांगली सातारा विधानपरिषद निवडणूक! दोन्ही राजांना विचारात न घेताच निर्णय घेतले जात असावेत, जयंत पाटलांचा टोला

महायुतीमध्ये साताऱ्याच्या दोन्ही राजांना (खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले) विचारत न घेताच निर्णय घेतले जात असावेत असा माझा अंदाज जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

Jayant Patil :  सांगली सातारा विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये साताऱ्याच्या दोन्ही राजांना (खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले) विचारत न घेताच निर्णय घेतले जात असावेत असा माझा अंदाज असल्याचं वक्तव्य शरद पवार गटाचे नेते जंयत पाटील यांनी व्यक्त केला आहे. यामुळे दोन्ही राजेंचा स्वाभिमान दुखावला गेला असून, अशा गोष्टी खपवून घेणे हा उदयनराजेंचा स्वभाव नाही, असे पाटील म्हणाले. सातारकरांनी आपला स्वाभिमान काय आहे? हे या निवडणुकीत मतदानातून दाखवून द्यावे असे आवाहन  जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले.

आम्ही केवळ विकास आणि जनतेच्या मुद्द्यांवर आधारित मते मागतोय

साताऱ्याच्या दोन्ही राजेंचा स्वाभिमान दुखावला आहे. त्यामुळं सातारकरांनो आपली ताकद दाखवून द्यावी असे जयंत पाटील म्हणाले. शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी सांगली सातारा विधान परिषदेचा उमेदवार निवडताना महायुतीकडून दोन्ही राजेंना डावलल्याचा अंदाज केला व्यक्त केला. तसेच महाविकास आघाडी भक्कम असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. आम्ही केवळ विकास आणि जनतेच्या मुद्द्यांवर आधारित मते मागत आहोत. आमच्याकडे 'मसल पॉवर' किंवा 'मनी पॉवर' वापरण्याची पद्धत नाही आणि तशी आम्हाला सवयही नाही. जनताच पैशांच्या राजकारणाला उत्तर देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सातारा आणि सांगलीमध्ये महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्रितपणे आणि भक्कमपणे प्रचार करत आहेत. सांगलीची जनता लोकशाहीच्या बाजूने खंबीरपणे उभी असून तिथे चिंतेचे कारण नाही, असे सांगत काही ठिकाणी मतदारांच्या आणि नेत्यांच्या अंतर्गत गाठीभेटीही सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीच्या शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील आज सातारा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सातारा जिल्हा परिषदेत गेल्या काही दिवसांत जे राजकीय नाट्य घडले, त्याविरोधातील राग मतदानातून व्यक्त करण्याची हीच पहिली आणि शेवटची संधी आहे, असे सांगत कार्यकर्त्यांनी आपला रोष मतपेटीतून दाखवून द्यावा आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन केले.स्वर्गीय बाळासाहेब देसाई आणि स्वर्गीय लक्ष्मण तात्या (लक्ष्मणराव पाटील) या दोन्ही महान नेत्यांच्या वारसदारांनी जर त्यांच्या मूळ स्वभावानुसार आणि तत्त्वांना धरून राजकारण केले, तर या निवडणुकीचा निकाल अत्यंत सकारात्मक लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या वारसदारांचे ​दोन्ही बाजूंचे प्रमुख नेते सध्या सत्तेत आणि मंत्रिमंडळात असल्याने त्यांच्यावर अनेक राजकीय मर्यादा आहेत. ते उघडपणे कोणत्याही गोष्टीला विरोध करू शकत नाहीत किंवा आपल्या सदस्यांना थेट सूचना देऊ शकत नाहीत यामुळे जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या सदस्यांनी ही परिस्थिती ओळखली पाहिजे. आपले नेते अडचणीत असले तरी कार्यकर्त्यांनी आणि सदस्यांनी लक्ष्मण तात्या व बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा न करता आपला निर्णय घ्यावा, यावेळी जयंत पाटील यांनी सध्याचे नेते मंत्री असल्याने आम्ही त्यांना कोणत्याही अडचणीत आणू इच्छित नाही, त्यामुळे त्यांच्याशी थेट संपर्क साधण्याचा किंवा बोलण्याचा आमचा कोणताही प्रयत्न नाही. मात्र, त्यांचे जे फॉलोअर्स आहेत, त्यांनी सातारा जिल्हा परिषदेतील राजकीय नाट्याचा वचपा काढण्यासाठी ही निवडणूक अत्यंत गांभीर्याने घेऊन महाविकास आघाडीचे अभयसिंह जगताप यांना विजयी करावे" असे जाहीर आवाहन जयंत पाटील यांनी  केले.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या खात्याचा धसका की खरंच दूध खराब? साताऱ्यात शेतकऱ्याने रस्त्यावर ओतले शेकडो लिटर दूध; Video Viral
तुकाराम मुंढेंच्या खात्याचा धसका की खरंच दूध खराब? साताऱ्यात शेतकऱ्याने रस्त्यावर ओतले शेकडो लिटर दूध; Video Viral
Satara Crime News: दारूच्या नशेत घरात डोकावल्याचा संशय; पर्यटकाला चिखलात तुडवून संपवलं, साताऱ्यातील धक्कादायक घटना
दारूच्या नशेत घरात डोकावल्याचा संशय; पर्यटकाला चिखलात तुडवून संपवलं, साताऱ्यातील धक्कादायक घटना
Satara Crime: साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच चिकटले
साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच चिकटले
मुसळधार पावसामुळं साताऱ्यातील आलवडी गावात भूस्खलनाचा धोका,  नागरिकांना स्थलांतर करावं, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
मुसळधार पावसामुळं साताऱ्यातील आलवडी गावात भूस्खलनाचा धोका,  नागरिकांना स्थलांतर करावं, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?
Eknath Khadse on BJP : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून गुलाबराव पाटलांचा खोचक टोला
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Beed Crime News: दुचाकीवरून जाताना अडवलं, काही समजायच्या आतच हल्लेखोरांनी 23 वर्षीय तरुणाला भररस्त्यात संपवलं; घटनेनं बीडमध्ये खळबळ
दुचाकीवरून जाताना अडवलं, काही समजायच्या आतच हल्लेखोरांनी 23 वर्षीय तरुणाला भररस्त्यात संपवलं; घटनेनं बीडमध्ये खळबळ
नेपाळमध्ये पुन्हा तरुणाईच्या आंदोलनाचा भडका! तीन दिवसात तिघांचा आत्मदहनाचा प्रयत्न, नेमकं काय घडतंय? पंतप्रधानांवर जनविरोधी आणि हुकूमशाही पद्धतीने शासन केल्याचा आरोप
नेपाळमध्ये पुन्हा तरुणाईच्या आंदोलनाचा भडका! तीन दिवसात तिघांचा आत्मदहनाचा प्रयत्न, नेमकं काय घडतंय? पंतप्रधानांवर जनविरोधी आणि हुकूमशाही पद्धतीने शासन केल्याचा आरोप
Kolhapur Crime: कोल्हापुरात खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीने धडक दिल्याने हकनाक जीव गेला; मृतदेह खड्ड्यांमध्ये ठेवत नातेवाईक अन् नागरिकांचा आक्रोश
कोल्हापुरात खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीने धडक दिल्याने हकनाक जीव गेला; मृतदेह खड्ड्यांमध्ये ठेवत नातेवाईक अन् नागरिकांचा आक्रोश
Embed widget