एक्स्प्लोर

धक्कादायक! ठाण्यातील अभियंत्याचा घातपातच, पत्नी आणि मेहुण्याने मिळून काढला काटा, घटनेचा CCTV समोर 

सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांला कराडमध्ये कारने उडवले आहे.

Karad Crime News :  सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांला कराडमध्ये कारने उडवले आहे. या अपघातात उपविभागीय अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात की घातपात? असा सवाल उपस्थित केला जात आहे. अशातच या घटनेबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूरच्या अभियंत्याचा घातपातच झाला आहे. पत्नी आणि मेहुण्याने मिळून काटा काढला आहे. या अपघाताचा सीसीटीव्ही समोर आला आहे. लक्ष्मण मंडले असे अभियंत्याचे नाव होतं. 

नेमकं प्रकरण काय?

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील येथे मृदू व जलसंधारण विभागात अभियंता असलेल्या लक्ष्मण मंडले यांना पहाटे साडेपाच वाजता कराड शहरातील यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल समोर  सुमारास एका भरधाव चारचाकी कारने उडवले होते. दोन वेळा त्याच्या अंगावरून कार घालवली त्यानंतर त्याच्याकडील बॅग घेतली आणि गाडी चालक पसार झाला. या घटनेचा सीसीटीव्ही आता समोर आला आहे. अत्यंत भयानक रित्या अभियंत्याच्या अंगावर गाडी घातली. या घटनेनंतर घटनास्थळावरून चालक चारचाकी कारसह फरार झाला होता. यामध्ये अभियंत्याचा जागीच मृत्यू झाला आहे. कार चालकाने पलायन केल्याने हा अपघात की घातपात असा संशय व्यक्त केला जात होता. अखेर 12 तासाच्या आत  कराड शहर पोलिसांनी या घटनेचा उलगडा केला असून हा अपघात नसून घातपात असल्याचे समोर आले आहे. 

या घातपातात पत्नी सुरेखा आणि मेहुणा संग्राम या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अभियंता लक्ष्मण मंडले हे कराड तालुक्यातील मनव गावचे असून त्यांनी महाबळेश्वर कराड येथे काम केले आहे.

परभणीच्या जिंतूर तालुक्यात भीषण अपघात, आजी, आजोबांसह नातवाचा जागीच मृत्यू

परभणीच्या जिंतूर तालुक्यात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात आजी, आजोबांसह नातवाचा जागीच मृत्यू झाला आहे. कोक–पिंपरी फाट्याजवळ एसटी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे शेवडी गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

जिंतूरच्या शेवडी गावातील भगवान बळीराम काळे, सुशिलाबाई भगवान काळे आणि त्यांचा नातू शिवम काळे हे कवडगाव येथे एका कौटुंबिक कार्यक्रमाला उपस्थित राहून दुचाकीवरून घरी परतत होते. यावेळी कोक–पिंपरी फाट्याजवळ जिंतूरहून परभणीकडे जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगरपरभणी एसटी बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की तिघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर भगवान काळे हे दुचाकीसह एसटी बसखाली अडकल्याने घटनास्थळी अत्यंत विदारक परिस्थिती निर्माण झाली होती. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. अपघातानंतर एसटी बस चालकाने थेट बोरी पोलीस ठाण्यात हजर होत घटनेची माहिती दिली. पोलिसांनी चालकाची चौकशी सुरू केली असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.एकाच कुटुंबातील आजी, आजोबा आणि नातवाचा मृत्यू झाल्याने शेवडी गावावर शोककळा पसरली असून काळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satara Crime: साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच चिकटले
साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच चिकटले
मुसळधार पावसामुळं साताऱ्यातील आलवडी गावात भूस्खलनाचा धोका,  नागरिकांना स्थलांतर करावं, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
मुसळधार पावसामुळं साताऱ्यातील आलवडी गावात भूस्खलनाचा धोका,  नागरिकांना स्थलांतर करावं, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
महाबळेश्वरमध्ये 100 वर्षांतील विक्रमी पाऊस; 24 तासांत 513 मिमिची नोंद, अतिट गावात ढगफुटी
महाबळेश्वरमध्ये 100 वर्षांतील विक्रमी पाऊस; 24 तासांत 513 मिमिची नोंद, अतिट गावात ढगफुटी
Maharashtra Rain Alert : महाराष्ट्राभरात पावसाचं थैमान! कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार; मुंबईसह अनेक जिल्ह्यांना अलर्ट; वाचा चांदा ते बांदा पावसाची खबरबात
महाराष्ट्राभरात पावसाचं थैमान! कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार; रायगड, नाशिक, मुंबईसह अनेक जिल्ह्यांना अलर्ट; वाचा चांदा ते बांदा पावसाची खबरबात
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prithviraj Chavan: संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
Share Market : कालच्या धक्क्यानंतर आज शेअर बाजार सावरला, एका दिवसात गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई,कोणत्या शेअरमध्ये तेजी?
शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक,एका दिवसात गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई, कोणत्या शेअरमध्ये तेजी?
Shashikant Shinde : शरद पवार आणि एकनाथ शिंदेंची भेट राजकीय नव्हती, शशिकांत शिंदेंचे स्पष्टीकरण; एनडीएत जाण्याच्या चर्चा फेटाळल्या
शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये, शशिकांत शिंदेंचं मविआच्या नेत्यांना आवाहन
शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत संतापले, गद्दार म्हणाले; आता, एकनाथ शिंदेंचा पलटवार, राष्ट्रवादीचेही उत्तर
शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत संतापले, गद्दार म्हणाले; आता, एकनाथ शिंदेंचा पलटवार, राष्ट्रवादीचेही उत्तर
Ali Khamenei Home Video: ना राजेशाही थाट, ना टोलेजंग वाडा! इराणने अयातुल्ला खामेनींच्या अंत्यविधीपूर्वी उद्ध्वस्त निवासस्थानाचा व्हिडिओ दाखवला, अमेरिका- इस्रायलने तिथंच तब्बल 35 क्षेपणास्त्रे डागली
Video: ना राजेशाही थाट, ना टोलेजंग वाडा! इराणने अयातुल्ला खामेनींच्या अंत्यविधीपूर्वी उद्ध्वस्त निवासस्थानाचा व्हिडिओ दाखवला, अमेरिका- इस्रायलने तिथंच तब्बल 35 क्षेपणास्त्रे डागली
रक्षकच बनले भक्षक, महिलेवर अत्याचार; पोलीस भरतीत अधिक गुण देण्याचे आमिष, PSI सह कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल
रक्षकच बनले भक्षक, महिलेवर अत्याचार; पोलीस भरतीत अधिक गुण देण्याचे आमिष, PSI सह कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल
Omraje Nimbalkar: धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकरांच्या राजकारणाला 'उजवं' वळण, संघाच्या नेत्यांच्या भेटीगाठी पण राणा जगजितसिंहांना विरोधच
धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकरांच्या राजकारणाला 'उजवं' वळण, संघाच्या नेत्यांच्या भेटीगाठी पण राणा जगजितसिंहांना विरोधच
राम मंदिराच्या चोरीबद्दल बोललो तर तो धर्माचा अपमान कसा? चोरीचा आणि धर्माचा काय संबंध?? केंद्राने नेमलेल्या 15 पैकी 12 ट्रस्टी RSS, विश्व हिंदू परिषद आणि भाजपशी संबंधित, बाकी कोणीच नाही; राज ठाकरेंचा हल्लाबोल
राम मंदिराच्या चोरीबद्दल बोललो तर तो धर्माचा अपमान कसा? चोरीचा आणि धर्माचा काय संबंध?? केंद्राने नेमलेल्या 15 पैकी 12 ट्रस्टी RSS, विश्व हिंदू परिषद आणि भाजपशी संबंधित, बाकी कोणीच नाही; राज ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget