सातारा : जिल्हा परिषदेच्या निकालानंतर आता साताऱ्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. सातारा जिल्ह्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट एकत्र येण्यासाठी हालचाली सुरू आहेत. शिवसेनेचे मंत्री शंभुराज देसााई आणि राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, संजीव राजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली.

Continues below advertisement

सातारा जिल्ह्यामध्ये 27 जागा जिंकत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्या खालोखाल राष्ट्रवादीने 20 तर शिंदेंच्या शिवसेनेने 15 जागा जिंकल्या आहेत. बहुमतासाठी 33 जागांची आवश्यकता असून राष्ट्ववादी आणि शिवसेना एकत्र आले तर बहुमताची संख्या पार होते. त्यामुळे भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये हालचाली सुरू आहेत.

साताऱ्यातल्या हॉटेल फर्नमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांची, खासदार यांची औपचारिक बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेनेचे मंत्री शंभूराजे देसाई, मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, संजीव राजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण हे उपस्थित होते. 

Continues below advertisement

ही बैठक जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापनेसाठी होती, त्यावर प्राथमिक चर्चा झाल्याचं राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील यांनी स्पष्ट केलं. तर शंभुराज देसाई यांनीही त्याला दुजोरा दिल्याचं दिसून आलं. 

Satara ZP Election Election : सातारा जिल्हा परिषद पक्षीय बलाबल 

भाजप : 27

राष्ट्रवादी काँग्रेस : 20

शिवसेना : 15

शिवसेना (ठाकरे) :00

काँग्रेस : 01

इतर: 02

सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण अंतिम आकडेवारी

सातारा 16

भाजप - 10 राष्ट्रवादी - 5शिवसेना - 1

जावली 6

भाजप - 3राष्ट्रवादी - 1शिवसेना-2

वाई 08

भाजप - 3राष्ट्रवादी -5

महाबळेश्वर 4

राष्ट्रवादी -2शिवसेना-2

खंडाळा 6

भाजप - 1राष्ट्रवादी -5

फलटण - 16

भाजप - 5राष्ट्रवादी-3शिवसेना-8

माण -10

भाजप - 5राष्ट्रवादी -5

खटाव -14 

भाजप - 8राष्ट्रवादी-6

कोरेगाव 12

भाजप - 1राष्ट्रवादी- 9शिवसेना- 2

कराड - 24

भाजप - 16काँग्रेस -2राष्ट्रवादी - 4राष्ट्रवादी शरद पवार-1शिवसेना-1

पाटण-14

भाजप - 1शिवसेना-13

पंचायत समिती एकूण गण 130

भाजप- 53 राष्ट्रवादी-45शिवसेना-29काँग्रेस-   02श.प. गट 01

ही बातमी वाचा: