एक्स्प्लोर

रिल्ससाठीचा स्टंट अंगलट आला, चारचाकी गाडीसह युवक 300 फूट दरीत कोसळला; व्हिडिओ व्हायरल

सडावाघापूर पठारावरील निसर्ग सौंदर्या बरोबर उलटा धबधबा, येथील परिसर पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते.

सातारा : सह्याद्रीच्या पर्वतरांगात वसलेला निसर्गाने नटलेला जिल्हा म्हणजे सातारा (Satara). महाबळेश्वर असेल किंवा प्रतापगड किल्ला असेल निसर्ग सौंदर्याचं वरदान लाभलेला हा प्रदेश. त्यामुळेच, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सातारा जिल्ह्यात पर्यटनासाठी पर्यटक येतात. येथील निसर्ग सौंदर्य आणि विविध स्थळांना भेटी देतात. प्रसिद्ध पर्यटनस्थळ (Tourist) असलेल्या अनेक स्थळांपैकीच एक असलेलं सडावाघापूर. येथील उलटा धबधबा पर्यंटकांच्या आकर्षणाचं ठिकाण. मात्र, येथे आल्यानंतर काही तरुणांकडून होणारी हुल्लडबाजी, फोटो आणि रिल्ससाठी (Reels) व्हिडिओ काढताना केले जाणारे स्टंट पाहता पोलिसांनी इथं सध्या विशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. कारण, आपल्या चारचाकी कारसह स्टंट करताना एक युवक तब्बल 300 फूट दरीत कोसळल्याची घटना समोर आली आहे. 

सडावाघापूर पठारावरील निसर्ग सौंदर्या बरोबर उलटा धबधबा, येथील परिसर पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. मात्र, येथे येणाऱ्या काही तरुण पर्यटकांची स्टंटबाजी, युवकांची हुल्लडबाजी इथं मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ना पोलीस, ना प्रशासनाने तरुणाईच्या या हुल्लडबाजीवर अंकुश ठेवल्याचे पाहायला मिळते. त्यामुळेच, येथे अपघाताच्या घटनाही घडताना चित्र आहे. रिलसाठी स्टंट करण्याच्या नादात तब्बल 300 फूट खोल दरीत पर्यंटकांची गाडी कोसळून भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघाच्या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, हा युवक कारचा रेस वाढवून गाडी एकाच जागी फिरवत असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे फिरता फिरता रिव्हर्स गेअरमध्ये गाडी दरीत कोसळल्याचंही दिसत आहे.  

सुदैवाने बचावला युवक

कराड येथील काही युवक सडावाघापूर येथील उलटा धबधबा पाहून चारचाकी गाडीने गुजरवाडीच्या टेबल पॉईंटवर आले होते. याठिकाणी गाडीतील काही युवक खाली उतरले, तर यावेळी साहिल जाधव या युवकाने मोबाईल रिलसाठी गाडीबरोबर स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केला. गाडीसोबत स्टंट करताना साहिलचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी थेट 300 फूट खोल दरीत कोसळली. या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने गुजरवाडी येथील स्टंटबाज अपघाताचे सत्य बाहेर आले. यावेळी म्हावशी येथील स्थानिक गुराखी मंगेश जाधव व किंगमेकर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी अपघातात जखमी झालेल्या साहिल जाधवला बाहेर काढल्याने त्याचा जीव वाचला. यावेळी पाटण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अविनाश कवठेकर हेही घटनास्थळी उपस्थित होते.

हेही वाचा

मुंबईतील गिरणी कामगारांच्या घरांसाठीची ती अट रद्द, बैठकीत निर्णय; उदय सामंतांचा उद्धव ठाकरेंना टोला

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई-नाशिक महामार्गावर कारचा भीषण अपघात, दोन जणांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी 
मुंबई-नाशिक महामार्गावर कारचा भीषण अपघात, दोन जणांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी 
IPL :राजस्थान रॉयल्स जयपूरला बाय बाय करणार? आयपीएलचे सामने पुण्यात होणार? RR मोठा निर्णय घेणार
राजस्थान रॉयल्स जयपूरला बाय बाय करणार? आयपीएलचे सामने पुण्यात होणार? RR मोठ्या निर्णयाच्या तयारीत
Satara Politics : सातारा जिल्ह्यात सातारा कराडसह नऊ नगरपरिषदा आणि मेढा नगरपंचायत नगराध्यक्षपदासाठी कोण रिंगणात? यादी पाहा
सातारा जिल्ह्यात सातारा कराडसह नऊ नगरपरिषदा आणि मेढा नगरपंचायत नगराध्यक्षपदासाठी कोण रिंगणात? यादी पाहा
Silver Rate : चांदीच्या दरात आठवड्यात 8000 रुपयांची घसरण, सोन्याचे दर देखील घसरले, जाणून घ्या नवे दर
चांदीच्या दरात आठवड्यात 8000 रुपयांची घसरण, सोन्याचे दर देखील घसरले, जाणून घ्या नवे दर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Iran : इराणमध्ये फाशीचं सत्र, दहा महिन्यात 1000 जण फासावर Special Report
Celebrity Marriage : अब्जाधीश वामसी गदिराजूंचा डोळे दीपवणारा लग्नसोहळा Special Report
Ayodhya Flag Ceremony : रामनगरी अयोध्येत धर्मध्वजारोहण सोहळ्याचा उत्साह
Nashik TET Exam: इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठीचा पेपर दिला,नाशिकमध्ये TETचा गलथान कारभार
Hasan Mushrif Speech : नेत्याने घेतलेला निर्णय पटो न पटो तो मान्य करायचा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई-नाशिक महामार्गावर कारचा भीषण अपघात, दोन जणांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी 
मुंबई-नाशिक महामार्गावर कारचा भीषण अपघात, दोन जणांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी 
IPL :राजस्थान रॉयल्स जयपूरला बाय बाय करणार? आयपीएलचे सामने पुण्यात होणार? RR मोठा निर्णय घेणार
राजस्थान रॉयल्स जयपूरला बाय बाय करणार? आयपीएलचे सामने पुण्यात होणार? RR मोठ्या निर्णयाच्या तयारीत
Satara Politics : सातारा जिल्ह्यात सातारा कराडसह नऊ नगरपरिषदा आणि मेढा नगरपंचायत नगराध्यक्षपदासाठी कोण रिंगणात? यादी पाहा
सातारा जिल्ह्यात सातारा कराडसह नऊ नगरपरिषदा आणि मेढा नगरपंचायत नगराध्यक्षपदासाठी कोण रिंगणात? यादी पाहा
Silver Rate : चांदीच्या दरात आठवड्यात 8000 रुपयांची घसरण, सोन्याचे दर देखील घसरले, जाणून घ्या नवे दर
चांदीच्या दरात आठवड्यात 8000 रुपयांची घसरण, सोन्याचे दर देखील घसरले, जाणून घ्या नवे दर
Photos: डोनाल्ड ट्रम्पचा मुलगा जोधपुरी सूटमध्ये शाही लग्नात पोहोचला; नवरदेवाचा हत्तीवर नाच, नोरा, जान्हवी, जॅकलीन अन् माधुरी दीक्षितने डान्सने चार चाँद!
Photos: डोनाल्ड ट्रम्पचा मुलगा जोधपुरी सूटमध्ये शाही लग्नात पोहोचला; नवरदेवाचा हत्तीवर नाच, नोरा, जान्हवी, जॅकलीन अन् माधुरी दीक्षितने डान्सने चार चाँद!
Team India :दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी ऋतुराज गायकवाडला लॉटरी, रिषभ पंत, रवींद्र जडेजाचं कमबॅक, अक्षर पटेलला वगळलं, निवड समितीकडून मोठे बदल
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, ऋतुराजला लॉटरी, रिषभचं कमबॅक, कोणाला वगळलं?
India vs South Africa, 2nd Test: गुवाहाटी कसोटीत DRS वरुन फुल्ल ड्रामा; तिसऱ्या पंचांनी निर्णय उलटवला, जडेजा स्तब्ध राहिला
Video: गुवाहाटी कसोटीत DRS वरुन फुल्ल ड्रामा; तिसऱ्या पंचांनी निर्णय उलटवला, जडेजा स्तब्ध राहिला
Share Market : रिलायन्सचे गुंतवणूकदार मालामाल, पाच दिवसात 36000 कोटी रुपयांची कमाई, सेन्सेक्सवरील 7 कंपन्यांचं बाजारमूल्य वाढलं
रिलायन्सचे गुंतवणूकदार मालामाल, पाच दिवसात 36000 कोटी रुपयांची कमाई, सेन्सेक्सवरील 7 कंपन्यांचं बाजारमूल्य वाढलं
Embed widget