कराड (जि. सातारा) : सातारा जिल्ह्यातील (Satara News) कराडमधील (Karad) हुतात्मा नायब सुभेदार शंकर बसाप्पा उकलीकर (वय 38) यांना आज शेकडोंच्या नागिरकांच्या उपस्थितीत अखेरचा निरोप दिला. वीर जवान तुझे सलाम, शहीद जवान अमर रहे अशा घोषणा देत त्यांच्या पार्थिवाचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी झाली होती. कराडपासून वसंतगडपर्यंत 10 किमी अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी शेकडो नागरिका सहभागी झाले होते. कराडच्या विजय दिवस चौकात त्यांच्या पार्थिवावर माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी वसंतगडला त्यांची अंत्ययात्रा काढून नेण्यात आले. 


मथुरा मिल्ट्री स्टेशनमधील बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपमधील 122 इंजिनिअर रेजिमेंटमध्ये कारगिलच्या लेह येथील बर्फाळ प्रदेशात सेवा बजावत होते. मात्र, त्याचठिकाणी झालेल्या दुर्घटनेत त्यांना वीरमरण आले. शुक्रवारी त्यांचे पार्थिव सैन्यदलाच्या वाहनातून कराडमध्ये आणण्यात आले. शहरात विजय दिवस चौकात त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. त्यानंतर त्यांचे पार्थिव मुळगावी वसंतगडला नेण्यात आले. या अंत्ययात्रेत हजारो नागरीक सहभागी झाले होते.


वसंतगडाच्या पायथ्याशी उकलीकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वसंतगड येथील शंकर उकलीकर हे भारतीय सैन्यदलात इंजिनीयर रेजिमेंटमध्ये नायब सुभेदार या पदावर देशसेवेत होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण वसंतगड येथील जिल्हा परिषद शाळेत तसेच माध्यमिक शिक्षण वि. ग. माने हायस्कुलमध्ये झाले. कऱ्हाडच्या गाडगे महाराज महाविद्यालयातून त्यांनी उच्च शिक्षण घेतले. 2001 मध्ये ते भारतीय सैन्य दलात भरती झाले. त्यांनी 22 वर्ष सेवा बजावली. त्यादरम्यान 2008 साली त्यांनी पुर्ण बर्फाच्छादीत शिखरावर चढण्याचा माऊंटिंग कोर्स पूर्ण केला होता. त्यामध्ये त्यांना अ श्रेणी प्राप्त झाली होती.


इतर महत्वाच्या बातम्या