Satara News: माझ्यावर अन्याय होतोय, मी...; वरिष्ठांकडे तक्रार करत महिला डॉक्टरनं आयुष्य संपवलं, साताऱ्यात खळबळ
Satara News: साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने टोकाचे पाऊल उचलल्याने वैद्यकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Satara News: साताऱ्यातील (Satara) फलटण उपजिल्हा रुग्णालयात (Phaltan Hospital) एक हृदयद्रावक घटना घडली आहे. येथील महिला डॉक्टरने आत्महत्या केली असून, या घटनेने संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात आणि फलटण तालुक्यात शोककळा पसरली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, महिला डॉक्टर या गेल्या काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या. एका वैद्यकीय तपासणीच्या प्रकरणात पोलिसांशी त्यांचा वाद झाला होता, त्यानंतर त्यांच्यावर अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली होती.
Satara News: माझ्यावर अन्याय होत आहे
चौकशीदरम्यान त्यांनी आपल्या वरिष्ठांना लेखी स्वरूपात तक्रार देत म्हटले होते की, “माझ्यावर अन्याय होत आहे. मी आत्महत्या करीन.” तथापि, त्यांच्या या तक्रारीकडे दुर्लक्ष झाल्याचे सहकार्यांकडून सांगण्यात येत आहे. अखेर काल रात्री महिला डॉक्टरने टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवले.
Satara News: पोलीस तपास सुरू
या प्रकरणाची नोंद फलटण पोलीस ठाण्यात झाली असून, त्यांच्या आत्महत्येमागे नेमके कारण काय होते, याचा तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. कामाचा वाढता ताण, प्रशासकीय अडचणी आणि सततचा दबाव यामुळे आरोग्य कर्मचारी अनेकदा गंभीर मानसिक तणावाखाली कार्यरत असतात. प्रशासनाने अशा घटनांकडे गंभीरतेने पाहून, जबाबदारांवर कठोर कारवाई करावी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वैद्यकीय संघटनांकडून करण्यात येत आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या, पाहा Video
इतर महत्त्वाच्या बातम्या


















