एक्स्प्लोर

बिहार निवडणक एक्झिट पोल 2025

(Source:  Poll of Polls)

Satara Crime Phaltan Doctor Death: अंबादास दानवेंनी डॉक्टर तरुणीच्या पत्रातील 'ती' दोन नावं समोर आणली, रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं कनेक्शन सांगितलं

Phaltan Doctor Suicide news: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीवर लैंगिक अत्याचार. खासदाराच्या नावाची चर्चा. अंबादास दानवेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं कनेक्शन समोर आणलं

Phaltan Doctor Suicide news: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येसाठी भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsingh Naik Nimbalkar) यांचा राजकीय दबाव कारणीभूत असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला. मृत डॉक्टर तरुणीने डॉ. धुमाळ यांना लिहलेल्या पत्रात स्पष्टपणे त्याचा उल्लेख केला आहे. पोस्टमार्टेम रिपोर्ट आणि फिटनेस सर्टिफिकेट बदलण्यासाठी पोलिसांकडून येथील डॉक्टरांवर दबाव आणला जायचा. अशाच एका प्रकरणात फलटणमधील भाजपच्या माजी खासदाराचे दोन स्वीय सहाय्यक (PA) रुग्णालयात गेले होते. या दोघांनी डॉक्टर तरुणीचे माजी खासदाराशी बोलणे करुन दिले. यावेळी खासदारांच्या पीएने आणि पोलीस अधिकारी गोपाळ बदने याने संबंधित तरुणीला ती बीडची असल्यावरुन हिणवले, असा आरोप अंबादास दानवे यांनी केला. ते शनिवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. (Satara Crime news)

यावेळी अंबादास दानवे यांनी भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येशी संबंध असल्याचा आरोप केला. तरुणीच्या पत्रात माजी खासदारांच्या दोन स्वीय सहाय्यकांचा उल्लेख आहे. मात्र, त्यांची नावे दिलेली नाहीत. ही नावं मी तुम्हाला सांगतो. राजेंद्र शिंदे आणि नाग टिळक हे दोघे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे पीए होते. त्यांनीच डॉक्टर तरुणीचे माजी खासदारांशी फोनवरुन बोलणं करुन दिलं. याच दबावातून तरुणीने आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये तसा स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे या सगळ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे. 

हा सगळा प्रकार पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यांच्याकडे गृहखात्याचा कारभार आहे, त्यांचे खात्याचे लोक कशाप्रकारे डॉक्टरांशी वागतात, हे दिसून आले आहे. त्यांच्यामध्ये सत्तेचा माज दिसतो. आत्महत्या केलेली डॉक्टर तरुणी प्रामाणिकपणे आपले काम करत होती. डॉक्टर आत्महत्या प्रकरणात सातारा जिल्ह्यातील अधिकारी चौकशीसाठी नको. महिला अधिकारी चौकशीसाठी नेमा. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना देखील या प्रकरणात सहआरोपी करा.  तसेच महाडिक नावाच्या पोलीस अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल करा. काही दिवसांपूर्वी महाडिक हा अधिकारी प्रमोशन होऊन डीवायएसपी म्हणून नंदूरबारला गेला. महाडिक हा अधिकारी माजी खासदारांचा दलाल होता, असे अंबादास दानवे यांनी सांगितले.

 Satara news: पोस्टमार्टेम रिपोर्ट बदलण्यासाठी भाजपच्या नेत्यांकडून डॉक्टरांवर दबाव: अंबादास दानवे

हे एक प्रकरण समोर आले आहे. पण अन्य प्रकरणांमध्ये पोस्टमार्टेम रिपोर्ट बदलण्यास सांगितले जायचे. अनेकदा कैद्यांना फिट करा किंवा अनफिट प्रमाणपत्र देण्यासाठी डॉक्टरांवर पोलिसांकडून दबाव आणला जायचा. राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि नेत्यांनी हा प्रकार करणे चूक आहे. ही भाजपची सत्तेची मस्ती आहे. माजी खासदार रणजिसिंह नाईक निंबाळकर यांचे भाऊ अभिजीत नाईक निंबाळकर हे 24 तास तहसीलदार, प्रांत आणि पोलीस अधिकाऱ्यांसोबत असतात. याने शेतकऱ्यांच्या खात्यावर गैर उत्खनन केलं म्हणून याने 1 कोटी रुपये पर्यंत बोजा चढवला आहे. वाठार निंबाळकर आणि वाखरी या गावातील शेतकरी आहेत यांच्यावर 1 कोटी रुपयांचा गैर उत्खनन प्रकरणी बोजा चढवला आहे. अभिजीत निंबाळकर याने हा खोटा प्रकार केला आहे. सत्तेचा माज दाखवून विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना अशाप्रकारे नामोहरम केले जात आहे. 

आणखी वाचा

बीडच्या लेकीचा साताऱ्यात करुण अंत, सुरेश धस मैदानात उतरले, म्हणाले, 'तो' खासदार आणि त्यांच्या पीएला... 

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Arshdeep Singh : अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
Bihar Exit Poll : बिहार विधानसभेचा एक्झिट पोल, प्रशांत किशोर यांच्या जन-सुराज पक्षाला जनतेनं नाकारलं; किती जागा जिंकणार?
Bihar Exit Poll : बिहार विधानसभेचा एक्झिट पोल, प्रशांत किशोर यांच्या जन-सुराज पक्षाला जनतेनं नाकारलं; किती जागा जिंकणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
Palitana : गुजरातमधील पालितानामध्ये नॉन व्हेज बंदी, फक्त शाकाहारी असणारे जगातले पहिले शहर; जैन साधूंच्या दीर्घ लढ्याला यश
गुजरातमधील पालितानामध्ये नॉन व्हेज बंदी, फक्त शाकाहारी असणारे जगातले पहिले शहर; जैन साधूंच्या दीर्घ लढ्याला यश
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde Call Sanjay Raut: संजय राऊतांच्या प्रकृतीसाठी शिंदेंचा फोन, राजकीय वर्तुळात चर्चा
Devendra Fadnavis On Mahapalika : राज्यात भाजप एक नंबरच पक्ष राहिला पाहिजे, फडणवीसांचा आदेश
Pune Land Scam : अंजली दमानिया पत्रकार परिषदेत मुंडवा जमीन प्रकरणासंदर्भात खुलासे करणार
Maharashtra Politics : MNS सोबत युतीचा प्रस्ताव नाही, निर्णय INDIA आघाडी घेईल - हर्षवर्धन सकपाळ.
Mahayuti Formula: महायुतीचा स्थानिक निवडणुकीचा फॉर्म्युला काय? तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arshdeep Singh : अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
Bihar Exit Poll : बिहार विधानसभेचा एक्झिट पोल, प्रशांत किशोर यांच्या जन-सुराज पक्षाला जनतेनं नाकारलं; किती जागा जिंकणार?
Bihar Exit Poll : बिहार विधानसभेचा एक्झिट पोल, प्रशांत किशोर यांच्या जन-सुराज पक्षाला जनतेनं नाकारलं; किती जागा जिंकणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
Palitana : गुजरातमधील पालितानामध्ये नॉन व्हेज बंदी, फक्त शाकाहारी असणारे जगातले पहिले शहर; जैन साधूंच्या दीर्घ लढ्याला यश
गुजरातमधील पालितानामध्ये नॉन व्हेज बंदी, फक्त शाकाहारी असणारे जगातले पहिले शहर; जैन साधूंच्या दीर्घ लढ्याला यश
Arun Gujrati: 40 वर्षांची साथ सोडली! शरद पवारांचे शिलेदार अजितदादांच्या गोटात; अरुण गुजरातींच्या 'घड्याळ' हाती घेणार
40 वर्षांची साथ सोडली! शरद पवारांचे शिलेदार अजितदादांच्या गोटात; अरुण गुजरातींच्या 'घड्याळ' हाती घेणार
अकोला दंगलप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून स्वत:च्याच आदेशावर स्थगिती; हरकतीनंतर SIT संदर्भातील 'तो' निर्णय रद्द
अकोला दंगलप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून स्वत:च्याच आदेशावर स्थगिती; हरकतीनंतर SIT संदर्भातील 'तो' निर्णय रद्द
Nashik Ward Reservation: नाशिक महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर; दिग्गज नेत्यांचं टेन्शन मिटलं, पण शिंदे गटात गेलेल्यांना दणका, कुणाकुणाला फटका?
नाशिक महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर; दिग्गज नेत्यांचं टेन्शन मिटलं, पण शिंदे गटात गेलेल्यांना दणका, कुणाकुणाला फटका?
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 5 मोठे निर्णय, 5 व्या वित्त आयोगाच्या अंमलबजावणीचा कालावधी वाढवला
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 5 मोठे निर्णय, 5 व्या वित्त आयोगाच्या अंमलबजावणीचा कालावधी वाढवला
Embed widget