एक्स्प्लोर

Satara Crime News: चार सख्खी भावंडे; आई वडील शेतकरी, परिस्थिती बेताची, जिद्दीने वैद्यकीय शिक्षण पूर्ण, आठवड्यात सुट्टी घेऊन जाणार होती मूळ गावी; आधीच संपवलं जीवन

Satara Crime News: काकांच्या आरोपानुसार, पुतणीवर शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी दबाव आणला जात होता, ज्यामुळे ती मानसिक तणावाखाली होती.

Satara Crime: सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर तरूणीने गुरुवारी रात्री आपले जीवन संपवल्याची (Satara Crime News) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या डॉक्टर तरूणीने भाऊबीजेच्या दिवशी फलटणमधील एका नामांकित हॉटेलच्या बंद खोलीत रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास आत्महत्या केली. मात्र आता या आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण लागलं आहे. तरूणीवर पोलिसाने अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तर या प्रकरणी महिलेच्या काकांनी आणि आतेभावाने (Satara Crime News)गंभीर आरोप केले आहेत. काकांच्या आरोपानुसार, पुतणीवर शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी दबाव आणला जात होता, ज्यामुळे ती मानसिक तणावाखाली होती. डॉक्टरने आपल्या वरिष्ठांना आणि नातेवाईकांना वारंवार सांगितले होते की, “तणावामुळे माझे आयुष्य संपवावे लागेल,” असे त्यांनी म्हटले आहे. तर आतेभावाने तरूणीला फोन करणारे फलटण भागातील खासदारांचे पीए होते, असा आरोप केला आहे. त्या डॉक्टर तरूणीबाबत अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत.(Satara Crime News)

Satara Crime: आठवड्यात सुट्टी घेऊन मूळ गावी जाणार होती

मयत डॉक्टर तरूणी ही दोन वर्षांपासून मेडिकल ऑफिस सर म्हणून काम करत होती, मयत डॉक्टर तरूणी मूळची बीड जिल्ह्यातली आहे. दहावीपर्यंत शिक्षण बीड शहरातल्या शाळेत घेतलं. मृत डॉक्टर तरूणीला चार सख्खी भावंडे आहेत. आई वडील शेतकरी, परिस्थिती बेताची तरी तिने जिद्दीने वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं. जळगावच्या वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेतले. चुलत्यांची फॅमिली उच्चशिक्षित असल्याने शिक्षणाचे महत्व जाणले. महाबळेश्वरमध्ये पहिली पोस्टिंग मिळाली होती, ६ महिने कंत्राटी पद्धतीने काम केलं, दीड वर्षांपूर्वी फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू  झाली होती. पुढच्या आठवड्यात सुट्टी घेऊन मूळ गावी जाणार होती ही डॉक्टर तरूणी अविवाहित होती.

Satara doctor suicide case: राजकीय आणि पोलिसांचा मोठा दबाव 

फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणातील अनेक गुड रहस्य समोर येत आहेत. डॉक्टरच्या आतेभावाने धक्कादायक माहिती दिली आहे. दोन वर्षापासून मेडिकल ऑफिस सर म्हणून काम करत होती, मागच्या वर्षभरापासून तिच्यावर राजकीय आणि पोलिसांचा मोठा दबाव होता. राजकीय नेत्यांच्या आणि पोलिसांच्या सांगण्यावरून पोस्टमार्टम रिपोर्ट तयार करायचा, रुग्णालयात घेऊन न येता त्यांना फिटनेस, अनफिटनेस सर्टिफिकेट देण्याचा दबाव होत होता. तिने टोकाचे पाऊल उचलण्याआधी जी हातावर नावे लिहिली आहेत त्यांना कठोर शिक्षा व्हावी. दोन महिन्यापूर्वीच पोलिसांना तिने पत्र देखील दिले होतं. त्यामध्ये पोलिस आणि खासदारांचे दोन पीए त्यांच्याकडून राजकीय दबाव येत होता, असं तिने म्हटलं होतं, गोपाल मदने त्याचबरोबर पोलिस निरीक्षक महाडिक यांचे देखील त्या पत्रामध्ये उल्लेख असल्याचे कुटुंबियांचा आरोप आहे..

डॉक्टर महिलेने सर्व प्रयत्न तिला न्याय मिळवण्यासाठी केले असल्याचे देखील कुटुंबियांकडून सांगण्यात येत आहे मात्र तिला न्याय मिळाला नाही याची खंत कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. पीएच्या फोनवरून कोणत्या खासदाराने फोन करून दबाव आणला होता याचा खुलासा पोलिसांनी लवकर करावा अशी मागणी होत आहे. फलटणमध्ये राजकीय दबावामुळे आणि पोलिसांच्या दबावामुळे महिला डॉक्टरचा जीव गेल्याने संताप व्यक्त होत आहे.

Satara doctor suicide case:  पोस्टमार्टम राजकीय नेत्यांच्या म्हणण्यानुसार पाहिजे तसा रिपोर्ट बनवायचा

डॉक्टरच्या आतेभावाने एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, माझ्या बहिणीने तिचं स्वतःचं जीवन संपवलं, तीने घरी सांगितलं नाही. ती गेली दोन वर्ष मेडिकल ऑफिसर म्हणून काम करत होती. गेल्या वर्षभरापासून तिच्यावर राजकीय आणि पोलिसांचा फार मोठा दबाव होता. पोस्टमार्टम करताना त्यांच्या म्हणण्यानुसार किंवा राजकीय नेत्यांच्या म्हणण्यानुसार पाहिजे तसा पोस्टमार्टम रिपोर्ट बनवायचा किंवा बॉडी उपजिल्हा रुग्णालयात न आणता फिटनेस किंवा अनफिटनेसचे रिपोर्ट द्यायचा असा दबाव तिच्यावर होता.

Satara doctor suicide case: पत्रात खासदाराच्या नावाचा उल्लेख नाही मात्र 

तिनं घरी न सांगता हे टोकाचे पाऊल उचललं आहे. ज्यांच्याकडून त्रास झाला त्यांची नाव तिने हातावरती लिहिलेली आहेत. आमची फक्त एवढीच अपेक्षा आहे की, आमच्या बहिणीला न्याय मिळावा. तिने याबाबत जास्त कोणाला सांगितलं नव्हतं, तिची एक दुसरी बहीण मेडिकल ऑफिसर आहे. तिला तिने राजकीय दबाव आणि पोलिसांचाही दबाव असल्याचा सांगितला होता. पोस्टमार्टमची ड्युटी लागते आणि त्यावेळी त्यांच्या म्हणण्यानुसार रिपोर्ट द्यावे लागतात, दबाव येतो ते तिने सांगितलं होतं. दोन महिन्यापूर्वी तिने या संबंधीच्या पाठपुरावा करण्यासाठी पोलीस स्टेशनला पत्र लिहिलं होतं, त्यामध्ये तिने स्पष्ट उल्लेख केला होता. खासदारांच्या दोन पीएने फोन लावले होते, त्याचबरोबर पोलीस अधीक्षक याच्यावरती आरोप केलेले आहेत, त्याचबरोबर कोणीतरी महाडिक म्हणून आहेत त्यांची नाव तिने त्या पत्रामध्ये लिहिलेले आहेत, गुन्हा दाखल करण्यासाठी तिने अर्ज दिला होता, पण गुन्हा दाखल करून घेण्यात आलेला नव्हता. त्याचबरोबर त्यावर काय कारवाई झाली त्याबाबत आजपर्यंत तिला माहिती मिळालेली नाही. तिने मागच्या महिन्यात आरटीआयला अर्ज टाकला होता, त्याचंही उत्तर तिला मिळालेलं नाही. त्या पत्रात खासदाराच्या नावाचा उल्लेख नाही मात्र खासदाराच्या पीएचा दबाव होता इतकंच सांगितला आहे, बाकी डिटेल्स मला माहिती नाहीत असंही भावाने सांगितलं आहे.

Satara doctor suicide case: फलटण महिला डॉक्टर प्रकरणी CM फडणवीस अॅक्शन मोडवर

फलटण येथील घटनेची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा एसपी यांच्याकडून घेतली असून संबंधित पोलिसाला तत्काळ निलंबित करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

Satara doctor suicide case: गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू 

मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टर गेल्या काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या. वैद्यकीय तपासणीसंदर्भात पोलिसांशी झालेल्या वादानंतर त्यांच्या विरोधात अंतर्गत चौकशी सुरू होती. त्यांनी आपल्या वरिष्ठांना लेखी तक्रार देत, “माझ्यावर अन्याय होत आहे; मी आत्महत्या करीन,” असा इशाराही दिला होता. मात्र, त्यांच्या तक्रारीकडे वरिष्ठांकडून कोणतीही ठोस दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप सहकाऱ्यांकडून होत आहे.

Satara doctor suicide case: सुसाईड नोटमधील गंभीर मजकूर

 डॉक्टरच्या हातावर पेनाने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे की,  “पोलिस निरीक्षक गोपाल बदने याने माझ्यावर चार वेळा बलात्कार केला. प्रशांत बनकर याने मला मानसिक छळ दिला.”

Satara doctor suicide case: प्रकरणाची चौकशी सुरू

घटनेनंतर जिल्हा पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, मृत डॉक्टरच्या कुटुंबीयांनी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. ही घटना केवळ एका डॉक्टरच्या मृत्यूपुरती मर्यादित नाही, तर आरोग्य आणि पोलीस यंत्रणेतील दबावाच्या गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणारी आहे. सातारा जिल्ह्यात या प्रकरणामुळे संताप आणि दुःखाची लाट उसळली आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

प्रलंबित खटल्याचा निकाल बाजूने देण्यासाठी 15 लाख मागितले, सत्र न्यायाधीशावर गुन्हा दाखल, मुंबई ACB ची कारवाई
प्रलंबित खटल्याचा निकाल बाजूने देण्यासाठी 15 लाख मागितले, सत्र न्यायाधीशावर गुन्हा दाखल, मुंबई ACB ची कारवाई
Govinda Discharged : 'हिरो नंबर वन'ला रुग्णालयातून डिस्चार्ज, कमी काम आणि जास्त योग हे सूत्र पाळण्याचा गोविंदाचा संकल्प
'हिरो नंबर वन'ला रुग्णालयातून डिस्चार्ज, कमी काम आणि जास्त योग हे सूत्र पाळण्याचा गोविंदाचा संकल्प
मुंबई इंडियन्स अर्जुन तेंडुलकरला सोडणार, लखनौचा हा खेळाडू मुंबईत येणार? IPL लिलावापूर्वीच डील
मुंबई इंडियन्स अर्जुन तेंडुलकरला सोडणार, लखनौचा हा खेळाडू मुंबईत येणार? IPL लिलावापूर्वीच डील
दिल्लीतील भीषण स्फोटाचा निषेध, केंद्रीय कॅबिनेटमध्ये ठराव संमत; कट रचणाऱ्यांना शोधण्याचा निर्धार
दिल्लीतील भीषण स्फोटाचा निषेध, केंद्रीय कॅबिनेटमध्ये ठराव संमत; कट रचणाऱ्यांना शोधण्याचा निर्धार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Exercise Trishul: आम्ही युद्धासाठी सदैव तत्पर, Pakistan सीमेजवळ Army, Navy, Air Force चा युद्धाभ्यास
MCA Elections 2025: Jitendra Awhad उपाध्यक्षपदी, Ajinkya Naik बिनविरोध अध्यक्ष, ही आहे नवी टीम
Jai Shri Ram Row: 'जय श्रीराम' म्हटल्याने विद्यार्थ्याला मारहाण, Pen मधील शिक्षक Momin पोलिसांच्या ताब्यात
Human-Leopard Conflict: Nashik च्या Devgaon मध्ये बिबट्या जेरबंद, ठार मारण्यासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन.
Amravati Wedding Attack: बडनेरामध्ये लग्न सुरु असताना नवरदेव Sujalram Samudre वर चाकू हल्ला, ड्रोन व्हिडिओ समोर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रलंबित खटल्याचा निकाल बाजूने देण्यासाठी 15 लाख मागितले, सत्र न्यायाधीशावर गुन्हा दाखल, मुंबई ACB ची कारवाई
प्रलंबित खटल्याचा निकाल बाजूने देण्यासाठी 15 लाख मागितले, सत्र न्यायाधीशावर गुन्हा दाखल, मुंबई ACB ची कारवाई
Govinda Discharged : 'हिरो नंबर वन'ला रुग्णालयातून डिस्चार्ज, कमी काम आणि जास्त योग हे सूत्र पाळण्याचा गोविंदाचा संकल्प
'हिरो नंबर वन'ला रुग्णालयातून डिस्चार्ज, कमी काम आणि जास्त योग हे सूत्र पाळण्याचा गोविंदाचा संकल्प
मुंबई इंडियन्स अर्जुन तेंडुलकरला सोडणार, लखनौचा हा खेळाडू मुंबईत येणार? IPL लिलावापूर्वीच डील
मुंबई इंडियन्स अर्जुन तेंडुलकरला सोडणार, लखनौचा हा खेळाडू मुंबईत येणार? IPL लिलावापूर्वीच डील
दिल्लीतील भीषण स्फोटाचा निषेध, केंद्रीय कॅबिनेटमध्ये ठराव संमत; कट रचणाऱ्यांना शोधण्याचा निर्धार
दिल्लीतील भीषण स्फोटाचा निषेध, केंद्रीय कॅबिनेटमध्ये ठराव संमत; कट रचणाऱ्यांना शोधण्याचा निर्धार
Rashid Khan 2nd Marriage राशिद खानसोबतची 'ती' गोरी गोरी पान सुंदरी कोण? व्हायरल फोटो कुठला, क्रिकेटरने लग्नाचंही स्पष्टच सांगितलं
राशिद खानसोबतची 'ती' गोरी गोरी पान सुंदरी कोण? व्हायरल फोटो कुठला, क्रिकेटरने लग्नाचंही स्पष्टच सांगितलं
लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये बदल; 'त्या' महिलांसाठी बदल केल्याची मंत्री आदिती तटकरेंची माहिती
लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये बदल; 'त्या' महिलांसाठी बदल केल्याची मंत्री आदिती तटकरेंची माहिती
व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूल; एक डझन अटकेत अन् त्यामधील अर्धा डझन पेशाने चाळीशीच्या उंबरठ्यावरील डॉक्टर निघाले! 37 दिवसांपूर्वी लग्नात प्रोफेसर शाहीन भेटली अन्..
व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूल; एक डझन अटकेत अन् त्यामधील अर्धा डझन पेशाने चाळीशीच्या उंबरठ्यावरील डॉक्टर निघाले! 37 दिवसांपूर्वी लग्नात प्रोफेसर शाहीन भेटली अन्..
HDFC Life : संयत गळती : निवृत्त व्यक्तींच्या बचतीमध्ये हळूहळू होणारी घट आणि ती रोखण्याचे उपाय
संयत गळती : निवृत्त व्यक्तींच्या बचतीमध्ये हळूहळू होणारी घट आणि ती रोखण्याचे उपाय
Embed widget