Satara News: गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता अन् सातारा जिल्हा पोलिस दलातील वाहतूक पोलिसाचा थेट लाॅजवर सापडला मृतदेह, चिट्टीतून धक्कादायक खुलासा
Satara News: ही घटना रायगड जिल्ह्यातील पोलादपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत, मुंबई-गोवा महामार्गावरील काळकाई हॉटेलच्या मागे असलेल्या जोगळे लॉजमध्ये घडली.

Satara News: सातारा जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले वाहतूक पोलीस संतोष रामचंद्र ननावरे (वय ३६, रा. ओझर्डे, ता. वाई, जि. सातारा) यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना रायगड जिल्ह्यातील पोलादपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत, मुंबई-गोवा महामार्गावरील काळकाई हॉटेलच्या मागे असलेल्या जोगळे लॉजमध्ये घडली. कौटुंबिक कलह आणि पत्नी नांदायला येत नसल्याच्या नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सुसाईड नोटवरून स्पष्ट झाले.
गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता
संतोष ननावरे चार दिवसांपूर्वी घरातून निघून गेले होते. शुक्रवारी सकाळी लॉजचा कर्मचारी त्यांना आंघोळीचे पाणी देण्यासाठी गेला असता आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. खिडकीच्या काचेतून डोकावून पाहिले असता त्यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच पोलादपूर पोलिसांचे उपनिरीक्षक सतीश पवार, महाडचे डीवायएसपी प्रदीप काळे आणि पोलादपूरचे सहायक पोलीस निरीक्षक विजय सुर्वे यांनी घटनास्थळी धाव घेतली. नातेवाइकांच्या उपस्थितीत खोलीचा दरवाजा तोडून मृतदेह खाली उतरवण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. वाई तालुक्यातील ओझर्डे या मूळ गावी त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
लेकीला बापानं आणि चुलत्यानं तोंड आणि नाक दाबून संपवलं
दुसरीकडे, दोन दिवसांपूर्वी साताऱ्यात कौटुंबिक वादातून 19 वर्षीय तरुणीचा नाक आणि तोंड दाबून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. मुलीच्या वागण्यामुळे कुटुंबाची आणि समाजातील प्रतिष्ठा धोक्यात येत असल्याच्या कारणातून वडील आणि चुलत्याने तिचा जीव घेतला. दोघांनी मिळून हर्षदाचे तोंड आणि नाक दाबल्याने तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले. या याप्रकरणी मुलीचे वडील आणि चुलते या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार मृत तरुणीचे नाव हर्षदा आहे. लहानपणापासून हर्षदाला मित्र-मैत्रिणींच्या संगतीची आवड होती. मात्र, तिच्या वागण्यावरून घरात वारंवार वाद होत होते. हर्षदा पुण्यात शिक्षण घेत होती. ती रोज सकाळी आठ वाजता घराबाहेर पडून रात्री आठ वाजता घरी येत होती. तिच्या या दिनक्रमावरून वडील आणि मुलीमध्ये अनेकदा वाद होत होते. वडिलांनी पैसे देण्यास नकार दिल्यास ती घरातून बाहेर जाण्याची धमकी देत होती, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे सततच्या वादातून हर्षदाच्या वडिलांनी आणि चुलत्याने तिचे वागणे कायमचे थांबवण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Before You Go
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha






















