Satara News: लहान भावाचा आणि बहिणीचा टीव्हीवरुन वाद, भांडणात लेक शिक्षक बापावर अरे तुरे करत बॅट घेऊन धावली, संतापलेल्या बापानं त्याच बॅटने लेकीला संपवलं, साताऱ्यातील थरकाप
Satara News: पोलिसांनी आर्याच्या आईकडे कसून चौकशी केली असता, पतीने रागाच्या भरात डोक्यात बॅट मारून मुलीचा खून केल्याची कबुली दिली. सातारा पोलिसांनी वडील पुरुषोत्तम कदम यांना अटक केली आहे.

Satara News: टीव्ही पाहण्यावरून बहिण आणि लहान भावाचा वाद झाल्यानंतर वडिलांच्या अंगावर धावून आलेल्या पोटच्या लेकीला डोक्यात बॅट घालून संपवल्याची भयावह घटना साताऱ्यात घडली. आर्या पुरुषोत्तम कदम (वय १७ वर्षे, रा. गोडोली, सातारा) असे या मुलीचे नाव आहे. आरोपी वडील पुरुषोत्तम संपत कदम असून ते व्यवसायाने शिक्षक आहेत. साताऱ्यातील गोडोलीत शनिवारी (3 ऑक्टोब) रात्री ही घटना घडली आणि रविवारी सायंकाळी उघडकीस आली.
मुलीच्या वागण्यामुळे वडिल त्रस्त
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार पुरुषोत्तम कदम हे गोडोली परिसरात पत्नी शीला (शिक्षिका), दोन मुली आणि एका लहान मुलासमवेत राहतात. आर्याच्या सतत टीव्ही बघणे, मोबाईल पाहत बसणे, उद्धट बोलणे आणि कुटुंबियांवर आक्रमक होणे या वर्तणुकीमुळे वडील त्रस्त होते. या वर्तणुकीमुळे तिच्यावर पुण्यातील मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचारही सुरू होते.
आर्या घरातच निपचित पडली
शनिवारी रात्री लहान भाऊ, बहीण आणि आर्या यांच्यामध्ये टीव्ही पाहण्यावरून वाद झाला. या वादात आर्याने लहान बहिणीच्या डोळ्यावर ठोसा मारल्याने बहिणीचा डोळा सुजला. हे पाहून वडिलांनी तिला रागवून शांत राहण्यास सांगितले. यानंतर आर्या अचानक आक्रमक होऊन वडिलांना आरेतुरे करत त्यांच्या अंगावर बॅट घेऊन धावली. हा राग सहन न झाल्याने वडिलांनी तीच बॅट आर्याच्या डोक्यात मारली. बॅटचा वर्मी घाव बसल्यामुळे आर्या घरातच निपचित पडली व तिचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी वडिलांनी पोलिसांना माहिती देताना मुलीने स्वतःच डोके आपटून घेतले असा भासकावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आर्याच्या आईकडे कसून चौकशी केली असता, पतीने रागाच्या भरात डोक्यात बॅट मारून मुलीचा खून केल्याची कबुली दिली. सातारा पोलिसांनी वडील पुरुषोत्तम कदम यांना अटक केली आहे.
लेकीला बापानं आणि चुलत्यानं तोंड आणि नाक दाबून संपवलं
दुसरीकडे, सात दिवसांपूर्वी साताऱ्यात कौटुंबिक वादातून 19 वर्षीय तरुणीचा नाक आणि तोंड दाबून खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती. मुलीच्या वागण्यामुळे कुटुंबाची आणि समाजातील प्रतिष्ठा धोक्यात येत असल्याच्या कारणातून वडील आणि चुलत्याने तिचा जीव घेतला. दोघांनी मिळून हर्षदाचे तोंड आणि नाक दाबल्याने तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले. या याप्रकरणी मुलीचे वडील आणि चुलते या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Before You Go
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली





















