पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदारांच्या पदकांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये सातारा जिल्ह्याच्या कन्या आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी IPS स्मार्तना पाटील यांना ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर करण्यात आले आहे. 15 ऑगस्ट 2026 रोजी मानाच्या पदकाने त्यांचा सन्मान होणार आहे. स्मार्तना पाटील सध्या खंडाळा येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या (PTS) प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी पुणे शहर पोलीस दलातील परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्तपदाची (DCP) जबाबदारी सांभाळली आहे.
महाराष्ट्र पोलीस दलात महिला पोलीस अधिकाऱ्यांनी देखील आपल्या कर्तव्याची चुणूक दाखवली आहे. यात प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपण बोलत आहोत आयपीएस स्मार्तना पाटील यांच्या विषयी.त्यांनी इच्छाशक्तीच्या जोरावर आई वडीलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आयपीएस पदापर्यंत मजल मारली आहे.
स्मार्तना पाटील यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील बनवडी या गावी
आयपीएस स्मार्तना पाटील यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील बनवडी या गावी झाला. वडील श्री.शांताराम पाटील आई सौ.सुनीता शांताराम पाटील या दाम्पत्याच्या पोटी स्मार्तना यांचा जन्म झाला, त्यांचे प्राथमिक शिक्षण जीवन विद्या मंदिर बनवडी येथे झाले. माध्यमिक शिक्षण फार्मसी गव्हर्मेंट कॉलेज कराड येथे झाले लहान पणापासून खाकी वर्दीची आवड निर्माण झाली होती व शिक्षण पुर्ण झाल्यानंतर स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय पाटील यांनी घेतला त्याला यश देखील मिळाले
स्पर्धा परीक्षेचा प्रवास
एमपीएससीला सुरुवात केल्यानंतर सन 1998 साली तहसिलदार म्हणून नियुक्ती झाली परंतु त्यांना खाकीची आवड कायम होती. तरी पण चंद्रपूर येथे तहसिलदार म्हणून 1 वर्षे प्रोबेशन केले. खाकी वर्दीची आवड असल्याने पोलीस दलात जाण्याची आस कायम लागली होती.पाटील यांनी स्पर्धा परीक्षेची पुन्हा परिक्षा दिली सन 2000 साली दुसर्या प्रयत्नात पोलीस उपअधीक्षक म्हणून निवड झाली.निवड होताच 1 वर्षे ट्रेनिंगसाठी नाशिक येथे रवाना व्हावे लागले.या मिळालेल्या पोस्टचा आनंद खूप काही सांगून जात होता..
मनमिळावू हळवा स्वभाव
लहानपणापासून चांगल्याशी चांगले व वाईटाशी वाईट हा त्यांचा गुण आत्मसात करण्यासारखा आहे. सात्विक विचार हे मनुष्याला प्रगतीच्या मार्गावर नेत आहोत. माणुसकी जपणे हा गुणधर्म असणे गरजेचे आहे. अशातच एक महिला पोलीस अधिकारी म्हणून उदयास येत आहे श्रीमती स्मार्तना पाटील त्यांच्या स्वभावात खाकीतील माणुसकी दिसून येते.. पदाचा कधीही अविर्भाव न दाखवता स्मार्तना पाटील आपले कर्तव्य बजावत असतात.
वेगवेगळ्या ठिकाणी आपले कर्तव्य निभावले
स्मार्तना पाटील यांनी आज अखेर नाशिक, भोर, नागपूर, पिंपरी चिंचवड व पोलीस अधीक्षक बिनतारी संदेश पूणे,व सध्या पुणे शहर पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 येथे कार्यरत असताना पाटील या महिला वर्गाला नेहमी सांगत असतात.महिलांनी नेहमीच सजग राहिले पाहिजे. कोणी त्रास देत असेल, अन्याय करत असेल, तर शांत बसून सहन करू नका. त्याबाबत पोलिसांकडे तक्रार करा..
पुणे शहर परिमंडळ 2 येथे कारवाईचा धडाका
पुणे शहर पोलीस दलात परिमंडळ दोनचा पदभार घेतल्यापासून आयपीएस स्मार्तना पाटील यांनी कायदा सुव्यवस्था अबाधित राखत क्राईम कंट्रोल करून अनेक गुन्ह्यांची उकल केली आहे. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे पोलिसांचं ब्रीदवाक्य प्रत्यक्षात आणून, सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचा कर्दनकाळ म्हणून परिचित झालेल्यापुणे शहर झोन दोनच्या हद्दीत स्मार्तना पाटील यांनी पोलीस खाक्या दाखवत गुन्हेगारांना अगदी सुतासारखं सरळ केलं आहे. आणि खाकी वर्दीची काय दहशत असते हे दाखवून दिले आहे. प्रतिबंधात्मक कारवाईमुळे विभागातील गुन्हेगारी कमी होण्यास मदत झाली आहे. परिमंडळ दोनच्या विभागात एकूण ०६ पोलीस स्टेशन येतात. यामध्ये वारंवार गुन्हे करणा-या गुन्हेगारांवर वचक ठेवून त्यांच्यावर योग्य त्या प्रतिबंधक कारवाया करून पोलीस खात्याचा दबदबा निर्माण केला आहे स्मार्तना पाटील यांनी आपल्या कर्तव्याचा बागुलबुवा कधी ही केला नाही प्रसिद्ध होण्यापेक्षा आपण सिद्ध होण्याला जास्त प्राधान्य दिले.क्लिष्ट गुन्हृयांचा चिवट शोध घेणे.संवेदनशील काळात कायदा सुव्यवस्था अबाधित राखणे हे त्यांचे प्रथम कर्तव्य आहे.
आई वडिल हेच खरे गुरु
पोलिस दलातील त खडतर वाटचालीबद्दल व यशाबद्दल आई व वडील हेच खरे गुरु असुन त्यांच्यामुळेच पोलिस खात्यात चांगल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविण्यात आला .आई वडीलांचा आशिर्वाद सोबत असल्याचे पाटील नेहमी सांगतात. शिक्षण व जिद्दीने ध्येय गाठले असले तरी त्यांचे पाय कायम जमिनीवर राहिले आहेत. पोलिस खात्यात जाऊ इच्छिणाऱ्या अनेक तरुणांना ते खऱ्या अर्थाने आज प्रेरणादायी ठरत आहेत हे नक्की.