Satara News सातारा: सातारा जिल्ह्यातील पावसाने उघडीप न दिल्याने खरीपाच्या पेरण्या होऊच शकल्या नाहीत. मे महिन्यापासून पावसाचा जोर कायम राहिल्याने पेरण्यासाठी लागणारा वाफसा मिळाला नसल्याने शेतकर्यांना शेतात पिकच घेता आलेले नाही. यामुळे सातारा जिल्ह्यातील अनेक भागातील शेतकरी हवालदिल झाला असून काय करावं हे शेतकर्यांना समजेनासे झालं आहे. खरीपामधे भुईमुग,सोयाबीन, मका, कडधान्य आणि घेवडा पीक घेतलं जाते. मात्र ही पिके घेता न आल्याने त्याचा भविष्यात भावावर देखील परिणाम होणार असल्याचे शेतकऱ्याचे सांगणे आहे.
सातारा जिल्ह्यातील खरीप पेरणी हंगाम 2025-26 आकडेवारी लक्षात घेतली तर जिल्ह्यात 40% हेक्टर क्षेत्रात खरीप हंगाम पेरणी झाली आहे. तर मागील वर्षी जुलै महिन्यातील 87% जिल्ह्यात खरीप पेरणी झाली होती. मात्र मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी 47% पेरणी कमी झाली आहे..
तालुका निहाय खरीप हंगाम पेरणीची आकडेवारी
सातारा तालुका -सर्वसाधारण लागवड हेक्टर पीक क्षेत्र 52 हजार 288 आहे तर सध्या पेरणी क्षेत्र 10 हजार 185 एकर झाली आहे..
जावली तालुका -सर्वसाधारण लागवड हेक्टर पीक क्षेत्र 18 हजार 914 आहे तर सध्या पेरणी क्षेत्र 1 हजार 483 एकर झाली आहे..
पाटण तालुका- सर्वसाधारण लागवड हेक्टर पीक क्षेत्र60 हजार 410आहे तर सध्या पेरणी क्षेत्र 16 हजार 361 एकर झाली आहे..
कराड तालुका- सर्वसाधारण लागवड हेक्टर पीक क्षेत्र 58 हजार 629 आहे तर सध्या पेरणी क्षेत्र 31 हजार 178 एकर झाली आहे..
कोरेगाव तालुका -सर्वसाधारण लागवड हेक्टर पीक क्षेत्र 39 हजार 776 आहे तर सध्या पेरणी क्षेत्र 9 हजार 453 एकर झाली आहे..
खटाव तालुका -सर्वसाधारण लागवड हेक्टर पीक क्षेत्र 49 हजार 124 आहे तर सध्या पेरणी क्षेत्र 28 हजार 818 एकर झाली आहे..
माण तालुका -सर्वसाधारण लागवड हेक्टर पीक क्षेत्र 40हजार 245 आहे तर सध्या पेरणी क्षेत्र 26 हजार 609 एकर झाली आहे..
फलटण तालुका -सर्वसाधारण लागवड हेक्टर पीक क्षेत्र 32 हजार 453 आहे तर सध्या पेरणी क्षेत्र 15हजार 592 एकर झाली आहे..
खंडाळा तालुका -सर्वसाधारण लागवड हेक्टर पीक क्षेत्र 19 हजार 714 आहे तर सध्या पेरणी क्षेत्र 8 हजार 901 एकर झाली आहे..
वाई तालुका -सर्वसाधारण लागवड हेक्टर पीक क्षेत्र 20 हजार 373आहे तर सध्या पेरणी क्षेत्र 8 हजार 194 एकर झाली आहे..
माबळेश्वर तालुका -सर्वसाधारण लागवड हेक्टर पीक क्षेत्र 4 हजार 466 आहे तर सध्या पेरणी क्षेत्र 1हजार 820 एकर झाली आहे..
एकूण जिल्ह्यातील खरीप हंगाम पेरणी 3 लाख 96 हजार 392 हेक्टर क्षेत्रावर होणे अपेक्षित होते मात्र सलग पावसामुळे 1 लाख 58 हजार 595 हेक्टर वर पेरणी झाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या