बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Case) प्रकरणी महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम (Ujjwal Nikam) यांची विशेष सरकारी वकील म्हणून, तर अॅड. बाळासाहेब कोल्हे (Balasaheb Kolhe) यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भातील माहिती राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या बाबतची माहिती दिली आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी कुटुंबियांनी या संदर्भात केलेल्या अनेक मागण्यापैकी ही एक मुख्य मागणी मान्य झाल्याने देशमुखांच्या कुटुंबियांनी आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांनी समाधान समाधान व्यक्त केलं असले तरी इतर मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत अन्यत्याग आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.
बीडचे एसपी संतोष देशमुखांच्या कुटुंबाला भेटले, म्हणाले....
तर दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीसांनी उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीची घोषणा करताच बीडचे एसपी संतोष देशमुखांच्या कुटुंबाच्या भेटीसाठी दाखल झाले आहे. पोलीस निरीक्षक वैभव पाटील हे उज्वल निकम यांच्या नियुक्तीची माहिती धनंजय देशमुख यांना देत आहेत. यावेळी बीडचे जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी ग्रामस्थांना अन्न त्याग आंदोलन सोडण्याची विनंती केली आहे. तर आंदोलनाच्या संदर्भात केज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वैभव पाटील हे गावकऱ्यासोबत चर्चा करत असल्याची ही माहिती पुढे आली आहे. बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी वैभव पाटील यांना गावकऱ्यासोबत चर्चा करण्याचे सांगितले असून त्यांची समजूत सध्या काढली जात आहे. मात्र एकूण सात मागण्यापैकी केवळ एकच मागणी सध्या मान्य झाली आहे. उर्वरित मागण्या मान्य झाल्या शिवाय आम्ही माघार घेणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. त्यामुळे ग्रामस्थांची समजूत काढण्यात पोलीस प्रशासनाला यश येतं का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मस्साजोगकरांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील तपासाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले. आज(26 फेब्रुवारी) आंदोलनाचा दुसरा दिवस असून संतोष देशमुख यांच्या प्रतिमेला अभिवादन करत या दुसऱ्या दिवसाच्या आंदोलनाचा प्रारंभ करण्यात आला. जोपर्यंत मागण्याविषयी आश्वासन मिळत नाही. जबाबदार अधिकारी आंदोलन स्थळी भेट देऊन आश्वासन देत नाहीत. तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. वेळप्रसंगी पाणी न घेण्याचा इशारा देशमुख कुटुंबियांनी दिला. आता आज या ठिकाणी अधिकारी भेट देतात का? या आंदोलकाच्या मागण्या विषयी सकारात्मकता दाखवत त्या दिशेने पावले उचलतात का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हे ही वाचा