Continues below advertisement

सांगली : शिवसेना (Shivsena) ठाकरे गटातून लोकसभा निवडणूक लढवलेल्या चंद्रहार पाटील यांनी काही महिन्यांपूर्वीच ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. आता, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चंद्रहार पाटलांनी (Chandrahar patil) पुन्हा एकदा धुरळा उडवून दिला आहे. कुस्तीचं जंगी मैदान गाजवणाऱ्या डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी बैलगाडा शर्यतीच्या स्पर्धेतून लक्ष वेधलं आहे. कारण, चंद्रहार पाटील यांच्या नेतृत्वात भरविण्यात आलेल्या भव्य बैलगाडी शर्यतीबक्षिसांचा धुरळा उडाला आहे. येत्या 9 नोव्हेंबर रोजी तासगावजवळ भव्य बैलगाडी शर्यतीचे आणि बैलगाडा शर्यत संघटनेचे पहिले अधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे. या बैलगाडा शर्यत स्पर्धेतील विजेत्या गाडामालकांसाठी 2 फॉर्च्यूनर, 2 थार, 7 ट्रॅक्टर आणि 150 दुचाकी अशी भुवया उंचावणारी बक्षिसे आहेत.

डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील पुन्हा एकदा भव्य बैलगाडी शर्यतीचा धुरळा उडवणार आहेत. येत्या 9 नोव्हेंबरला तासगावजवळ भव्य बैलगाडी शर्यतीचे आणि बैलगाडा शर्यत संघटनेचे पहिले अधिवेशन चंद्रहार पाटील यांच्या नेतृत्वात घेण्यात येत आहे. या बैलगाडी शर्यतीसाठी 2 फॉर्च्यूनर कार, 2 थार, 7 ट्रॅक्टर आणि 150 दुचाकी गाड्यांची बक्षसे स्वरूपात ठेवण्यात आल्याने ही स्पर्धा लक्षवेधी ठरत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्यावतीने महाराष्ट्रातील हे पहिल बैलगाडा शर्यत संघटनेचे अधिवेशन 9 नोव्हेंबर रोजी तासगावजवळ आयोजित करण्यात आलं आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यत स्पर्धा आणि श्वान शर्यतीचे आयोजन केले आहे. यात तीन फेऱ्यांची जनरल बैलगाड शर्यत आणि पट्टा पद्धतीची शर्यत घेतली जाणार असून या कार्यक्रमात राज्यभरातून 4 ते 5 लाख शेतकरी व गाडी मालक सहभागी होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. गोवंशपशुसंवर्धनाचा प्रसार करणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश असल्याचे चंद्रहार पाटील यांनी सांगितले.

Continues below advertisement

दरम्यान, या बैलगाडी शर्यतीत पहिल्या, दुसऱ्या क्रमांकासाठी चारचाकी वाहने तसेच 6 ते 7 ट्रॅक्टर्सचे बक्षीस आहे. तसेच, इतर उत्तेजनार्थ 150 दुचाकी बक्षीस स्वरूपात दिल्या जाणार आहे. ओपन जनरल स्पर्धेसाठीही चारचाकी गाड्या, ट्रॅक्टर आणि दुचाकी बक्षीसे दिले जाणार आहेत. त्यामुळे, राज्यात आत्तापर्यंतची सर्वाधिक बक्षीसे, सर्वात मोठे, महागडे बक्षीसे देणारी स्पर्धा म्हणून या स्पर्धेची चर्चा जोर धरत आहे.

हेही वाचा

मंत्रिमंडळ बैठकीत 21 महत्त्वाचे निर्णय; महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून गंभीर आजारासाठी 10 लाख मिळणार