Sangli News:सांगली (Sangli) जिल्ह्याच्या आटपाडी तालुक्यातील दिघंची जिल्हा परिषद गटामध्ये शोककळा पसरली आहे. विठलापूर पंचायत समिती गणातून नुकतेच विजयी झालेले तृतीयपंथी पंचायत समिती सदस्य दिलीप अण्णा हेगडे (Dilip Anna Hegde) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) निधन झाले. पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आल्याचा आनंद साजरा होत असतानाच काही दिवसांतच त्यांचे निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Sangli News: विजयाचा आनंद ठरला क्षणिक

अलीकडेच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत दिलीप अण्णा हेगडे यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे गट) पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. विठलापूर पंचायत समिती गणातून त्यांनी तब्बल 2311 मताधिक्याने दणदणीत विजय मिळवला होता. तृतीयपंथी समाजातील उमेदवार म्हणून त्यांचा हा विजय केवळ राजकीय नव्हे, तर सामाजिक दृष्टीनेही महत्त्वाचा मानला जात होता. निकालानंतर त्यांनी व्यक्त केलेल्या भावना आजही अनेकांच्या स्मरणात आहेत. तृतीयपंथी म्हणून ज्या समाजाने आत्तापर्यंत आम्हाला लांब केलं, त्याच समाजाने या निवडणुकीत भरघोस मतदान करून विजयी केल्याचा भावना हेगडे यांनी व्यक्त केल्या होत्या.

Sangli News: शिक्षण आणि समाजकारणाची जिद्द

दिलीप अण्णा हेगडे हे बी.ए. पदवीधर होते. शिक्षणाच्या बळावर समाजासाठी ठोस काम करण्याची त्यांची तयारी होती. पंचायत समिती सदस्य म्हणून काम करताना शिक्षण, आरोग्य, महिला व वंचित घटकांच्या प्रश्नांवर विशेष लक्ष देण्याचा त्यांचा मानस होता. आपल्या शिक्षणाचा उपयोग आता राजकारणात होईल, असेही त्यांनी सांगितले होते. ते आवळाई गावचे विद्यमान उपसरपंच देखील होते.  त्यांच्या निधनाची वार्ता समजताच आटपाडी तालुक्यासह दिघंची जिल्हा परिषद गटात शोककळा पसरली. दिलीप अण्णा हेगडे यांच्या आकस्मिक निधनामुळे तृतीयपंथी समाजातील नेतृत्वाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Jalgaon Crime News: आई रागवल्याने अल्पवयीन मुलाने अन् दुसऱ्या घटनेत सावकाराच्या जाचाला कंटाळून युवकाचं टोकाचं पाऊल; धक्कादायक घटनांनी जळगाव हादरलं

Nagpur Accident News :  एका अपघातातून बचावले, पण काही तासात पुन्हा काळानं झडप घातली; नागपुरात एकाच जागीच, तर एकाचा उपचारदरम्यान दुर्दैवी अंत!