Sangli IPS Praveen Kolpe: आपण अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कारणांसाठी हत्तीवरून मिरवणुका निघाल्याचे पहिले असेल. पण सांगली जिल्ह्यातल्या (Sangli District) आटपाडी तालुक्यातील पहिल्या आयपीएस बनलेल्या सुपुत्राची मिरवणूक हत्तीवरून काढत गावकऱ्यांनी अनोखा जल्लोष केल्याचे आज पाहायला मिळाले. घरी अठराविश्व दारिद्र्य, वडिलांचे छत्र हरपले असतानाही परिस्थितीला दोष न देता  मिटकी गावचा सुपुत्र प्रवीण उत्तम कोळपे याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (UPSC Exam) 584 वी रँक मिळवत ऐतिहासिक यश मिळवले. त्याच्या या यशाचा अनोखा कौतुक सोहळा आज आटपाडीमध्ये पार पडला. (Maharashtra inspirational stores)

प्रवीण कोळपेची आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत हत्तीवरून आटपाडी शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. आटपाडी बस स्थानक ते पोलिस स्टेशन चौकापर्यंत बाजारपेठेतून ही मिरवणूक काढली. आटपाडीच्या बाजार पेठूंतून हत्तीवरून मिरवणूक सुरू असताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्वतः हातात बादली घेत प्रवीण कोळपे यांनी मिळवलेल्या यशाबद्दल पेठेतील नागरिक, व्यापार्यांना साखर वाटप केले. जे तरुण आपल्या आई-वडिलांना दोष देत आमच्यासाठी काहीच केले नाही असे म्हणतात त्यांनी प्रवीण कोळपे यांनी परिस्थितीवर मात देत मिळवलेल्या जिद्दीकडे पहावे आणि त्याचा आदर्श घ्यावा. बहुजन समाजातल्या तरुणांनी मिळवलेले हे यश नक्कीच वाखाजण्याजोगे आहे. त्यामुळे त्याची आम्ही हत्तीवरून मिरवणूक काढली. यामुळे तरुणांनी देखील आयएएस आयपीएस बनावे याचे प्रोत्साहन मिळेल असे मत आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केले.

आणखी वाचा

शाब्बास रं पठ्ठ्या! तीन सख्ख्या भावांची स्पर्धा परीक्षेत यशाला गवसणी! प्रतिकूल परिस्थिती MPSC उत्तीर्ण; उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश

भाजप नेत्याचा मुलगा UPSC परीक्षेत देशात तिसरा, आठ वर्षांच्या मेहनतीला फळ


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI