Sangli Crime : 7 जन्म नव्हे, लग्नाच्या 17 दिवसात बिनसलं, वटपौर्णिमेच्या रात्री नवऱ्याच्या डोक्यात कुऱ्हाड घालून संपवलं!
Sangli Crime : सांगली जिल्ह्यातील कुपवाडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. बायकोनं पतीवर केलेल्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला.

सांगली : सांगली जिल्ह्यातील कुपवाडमधील प्रकाशनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. अनिल लोखंडे या व्यक्तीला त्याच्या पत्नीनं संपवलं आहे. रात्री साडेबाराच्या सुमारास कौटुंबिक कारणावरुन वाद झाल्यानं पत्नी राधिका हिनं पतीच्या डोक्यात कुऱ्हाडीनं वार केला. यामध्ये अनिल लोखंडे याचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतलं असून या घटनेचं नेमकं कारणं अद्याप समोर आलं नाही. कुपवाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी या घटनेची माहिती दिली
वटपौर्णिमेच्या रात्री बायकोने घेतला नवऱ्याचा जीव
सांगलीच्या कुपवाड मधील प्रकाशनगर मध्ये एकता कॉलनीत राहणाऱ्या अनिल तानाजी लोखंडे ( वय -४५) आणि पत्नी राधिका या दोघांमध्ये वाद झाला. राधिका हिने वटपौर्णिमेच्या रात्री साडेअकरा ते साडेबाराच्या दरम्यान नवऱ्याचा जीव घेतला. अनिल लोखंडे आणि राधिका यांचं लग्न 17 दिवसांपूर्वी झालं होतं. राधिका ही अनिल लोखंडेची दुसरी बायको होती. डोक्यावर कुऱ्हाडीने वार झल्यानं त्यामुळे अनिल लोखंडे हा जागीच ठार झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
मृत अनिल लोखंडे याच्या पहिल्या बायकोचा मृत्यू कर्करोगानं झाला होता. अनिल लोखंडे याला दोन मुली होत्या. दोन्ही मुलींची लग्न झाल्याने अनिल हा एकटाच घरी राहत होता. त्यामुळे पोटाचे हाल होत असल्याने अनिल यांच्या नातेवाईकांनी सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वडी गावातील राधिका बाळकृष्ण इंगळे या 27 वर्षीय तरुणी सोबत लग्न लावून दिले होते. लग्न 17 मे 2025 झाल्यावर अवघ्या 17 दिवसांनी वटपौर्णिमेच्या रात्री साडेअकरा ते साडेबाराच्या दरम्यान राधिका हिने अनिल याच्या वर कुराडीने डोक्यावर व हातावर वार केला. त्यात अनिल याचा जागीच मृत्यू झाला. कुपवाड औद्योगिक वसाहत पोलिसांनी राधिका हिला ताब्यात घेतले आहे. मात्र खुनाचे नेमके कारण समजले नाही.
कुपवाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मुकेश लोखंडे यांनी फिर्याद दिली. अनिल तानाजी लोखंडे यांचा मृत्यू झाला. अनिल लोखंडे आणि त्यांची पत्नी राधिका लोखंडे यांच्यात रात्री साडे बारा वाजताच्या दरम्यान कौंटुबिक कारणातून वाद झाला. या वादातून राधिका हिनं पतीच्या डोक्यात कुऱ्हाडीनं वार केले. यात अनिल लोखंडे यांचा मृत्यू झाला. पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.




















