Vidhan Parishad Election Sangli Satara सांगली : सांगली सातारा विधान परिषद मतदार संघामध्ये धैर्यशील कदम आणि अभयसिंह जगताप आणि किशोर धुमाळ यांच्यात लढत होईल. अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर या तीन जणांचे अर्ज कायम राहिले. धैर्यशील कदम भाजपचे उमेदवार आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अभयसिंह जगताप रिंगणात आहेत. किशोर धुमाळ यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे, तो देखील कायम आहे. त्यामुळं सांगली साताऱ्याच्या जागेवर तीन उमेदावारंमध्ये लढत होईल.  

Continues below advertisement

सांगली-साताऱ्यात कोणाची माघार?

शिवसेनेचे अपक्ष उमेदवार तानाजी पाटील यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतल्यानंतर काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांनी सुद्धा अर्ज माघारी घेतलेला आहे.. काँग्रेसचे सांगली महापालिकेचे नगरसेवक संजय मेंढे तसेच काँग्रेसचे नगरसेवक मयूर पाटील या दोघांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे. तसेच अपक्ष उमेदवार बाळासाहेब पाटील यांनीही आपला अपक्ष उमेदवारी अर्ज माघारी घेतलेला आहे.. त्यामुळे आता महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप आणि किशोर धुमाळ अशी लढत सांगली सातारा विधान परिषदेत पाहायला मिळणार आहे. 

शिवसेनेच्या तानाजी पाटील यांची माघार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून महाराष्ट्रात महायुतीचा धर्म पाळण्यासाठी आम्ही तानाजी पाटील यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. पुढील काळात तानाजी पाटील यांचा आम्ही योग्य सन्मान करू असा शब्द देखील त्यांना दिला असल्याचे मंत्री शंभूराजे देसाई यांनी सांगितले. तर तानाजी पाटील यांनी आपल्या अपक्ष उमेदवारीमुळे राज्यातील महायुती मध्ये कुठे बिघाड होऊ नये म्हणून आपण पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या शब्दांनुसार अर्ज मागे घेत असल्याचा तानाजी पाटील यांनी सांगितला आहे.

Continues below advertisement

सांगली सातारा मतदारसंघातून अर्ज माघारी घेतलेले उमेदवार

1. तानाजी भगवान पाटील2. पाटील प्रताप धोंडीराम3. पाटील मयुर बाबासो4. मेंढे संजय नायकू

निवडणूक लढवत असलेले उमेदवार

1) धैर्यशील ज्ञानदेव कदम, मु. पो. गोरेगाव (वांगी), ता. खटाव, जि. सातारा — भारतीय जनता पक्ष

2) अभयसिंह खाशेराव जगताप, मु.पो. वरकुटे मलवडी, ता. माण, जि. सातारा — नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)

3) किशोर हनमंत धुमाळ, 123 बागडवाडा, शिवाजीनगर, गोडोली, सातारा — अपक्ष

सांगलीसातारा मतदारसंघाच्या गेल्या निवडणुकीत काँग्रेसच मोहनराव कदम विजयी झाले होते. यावेळी या मतदारसंघात कोण बाजी मारणार हे पाहावं लागेल.