HSC Result 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (Maharashtra HSC Results 2024) इयत्ता बारावीचा निकाल नुकताच जाहीर केला. यंदाचा एकूण निकाल 91.88 टक्के लागला असून, मागील वर्षाच्या तुलनेत निकालात 1.49 टक्क्यांची घसरण झाली आहे. फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये हा निकाल 93.37 टक्के होता. राज्यात सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला असून, त्याची यशाची टक्केवारी 96.74 आहे. दुसरीकडे, सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा असून तो 89.46 टक्के आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात मुलांना मागे टाकले आहे. 94.58 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून, मुलांचा निकाल 89.51 टक्के आहे. मुलींच्या निकालात मुलांपेक्षा 5.07 टक्क्यांनी अधिक वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातील यशस्वी विद्यार्थ्यांचं कौतुक होत असताना सांगली जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याचा निकाल विशेष चर्चेचा विषय ठरला आहे.

आटपाडी तालुक्यातील कौठुळी गावातील हेमंत किरण सटाले या विद्यार्थ्याने बारावीच्या परीक्षेमध्ये सर्व विषयांमध्ये 35 गुण मिळवत एक वेगळीच चर्चा निर्माण केली आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमातील टेक्नॉलॉजी विभागामध्ये हेमंतचा विद्यार्थी आहे. त्याने दिघंची येथील इंद्रभाग्य पद्मिनी कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. हेमंतने ज्या विषयांमध्ये परीक्षा दिली त्यामध्ये इंग्रजी, मराठी, इंजिनिअरिंग ड्रॉइंग, वर्कशॉप सायन्स अँड कॅल्क्युलेशन, ट्रेड थिअरी आणि एम्प्लॉयबिलिटी स्किल्स यांचा समावेश होता. विशेष बाब म्हणजे, या सर्वच विषयांमध्ये त्याला केवळ पासिंग मार्क म्हणजेच 35 गुणच मिळाले आहेत. आता हेमंत सटालेच्या मार्क्सशी जोरदार चर्चा रंगली आहे.

पुन्हा एकदा मुलींनी मारली बाजी

यंदाच्या बारावीच्या परीक्षेत एकूण 7 लाख 56 हजार 226 मुले परीक्षा देण्यासाठी बसली होती. त्यापैकी 6 लाख 76 हजार 972 मुले उत्तीर्ण झाली असून, यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 89.51 टक्के इतके आहे. दुसरीकडे, 6 लाख 61 हजार 743 विद्यार्थिनी परीक्षेला बसल्या होत्या, यापैकी 94.58 टक्के विद्यार्थिनींनी यश मिळवले आहे. मुलींच्या तुलनेत मुलांचा निकाल तब्बल 5.07 टक्क्यांनी कमी आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी गुणवत्तेचा दबदबा कायम ठेवला आहे.

विभागनिहाय निकालाची टक्केवारी

विभाग - टक्केवारी

कोकण - 96.74कोल्हापूर - 93.64मुंबई - 92.93छत्रपती संभाजीनगर - 92.24अमरावती - 91.43पुणे - 91.32नाशिक - 91.31नागपूर - 90.62लातूर - 89.46

यंदाच्या निकालाची ठळक वैशिष्ट्ये

राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांतून विज्ञान, कला, वाणिज्य, व्यवसाय अभ्यासक्रम आणि आयटीआय या शाखांसाठी यंदा एकूण 14,27,085 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या पैकी 14,17,969 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यामधून एकूण 13,02,873 विद्यार्थी उत्तीर्ण ठरले असून, यंदाची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 91.88 इतकी आहे.

आणखी वाचा 

Sanjay Raut on India Pakistan War Mock Drill : युद्धसराव म्हणजे आम्हाला बंदुका देणार आहात का? एकदा काय ते आर या पार होऊन जाऊ द्या; संजय राऊत कडाडले


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI