Sandeep Kshirsagar on Dhananjay Munde : बीडच्या एका खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये 'नीट' ची तयारी करणाऱ्या एका 17 वर्षीय मुलीची छेडछाड आणि लैंगिक छळ प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झालेला आरोपी विजय पवार हा आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांचा निकटवर्तीय आहे. त्यामुळेच विजय पवारला आमदार क्षीरसागर यांनी बीडच्या शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष केले होते. विजय पवारविरुद्ध गुन्हा दाखल झाला, त्याच रात्री तो आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासोबत होता. पुढच्या दोन दिवसात पीडितेच्या वडिलांना 20 फोन करण्यात आले, असा थेट आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केला. आता धनंजय मुंडे यांच्या आरोपावर संदीप क्षीरसागर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
संदीप क्षीरसागर म्हणाले की, त्यांची मागणी एसआयटीची आहे, त्याला मी सहमत आहे. जो प्रकार घडला तो चुकीचा घडला आहे. गुन्हा दाखल झाला त्याच्या दुसऱ्या दिवशीच त्या शिक्षकांना अटक झाली आहे. प्रशासनासोबत आम्ही चर्चा करतोय, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. ते माझ्या जवळचे असले तरी ॲक्शन घ्यायला मागे पुढे बघू नका, असं मी सांगितलं आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करायला 10 दिवस लागले नाही. माझ्या जवळचे असले तरी पीडिताने तक्रार देताच गुन्हा दाखल झाला आहे. मी काही त्यांच्यासारखं 150 दिवस पळून गेलो नाही. त्यांचे मंत्रीपद गेल्याने त्यांना दुःख आहे. ते या प्रकरणात बोलताय तसेच मस्साजोग प्रकरणी त्यांनी आक्रमक भूमिका घ्यायला हवी होती. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा आहेत. त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा होता, असे त्यांनी म्हटले आहे.
त्यामुळे त्यांना दुःख
संदीप क्षीरसागर पुढे म्हणाले की, या प्रकरणात पोलीस देखील तत्परतेने कारवाई करत आहेत. मी आता बोलण्यापेक्षा सत्तेत मुंडे साहेब आहेत, त्यांनी जोर लावला पाहिजे. मस्साजोग प्रकरणी मुंडे बोलले की, 150 दिवस बाहेर राहावं लागलं, त्यांचे मंत्रीपद गेलंय, त्यामुळे त्यांना दुःख आहे. मात्र, लोकप्रतिनिधी रोज रस्त्यावर काम करतो. चहाच्या टपरीवर मी जातो, तिथे लोकं येतात, भेटतात. संबंधित लोक माझ्या ओळखीचे आहेत. पीडितेकडे मी जाणार होतो. मात्र, आताच जाणं योग्य नाही, त्यामुळे तिथे गेलो नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.
आणखी वाचा