एक्स्प्लोर

Samrudhhi Highway : समृद्धी महामार्गवरून प्रवास करणाऱ्या महिलांची सुरक्षा धोक्यात; पेट्रोल पंपावर कर्मचाऱ्याकडून छेड, गुन्हा दाखल

Samrudhhi Mahamarg : समृद्धी महामार्ग (Samruddhi Highway) पुन्हा एकदा एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे. समृद्धी महामार्गावर एक धक्कादायक घटना घडली आहे.

Samrudhhi Mahamarg बुलढाणा : समृद्धी महामार्ग (Samruddhi Highway) पुन्हा एकदा एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे. समृद्धी महामार्गावर एक धक्कादायक घटना घडली आहे. यात एका महिलेची समृद्धी महामार्गावरील पेट्रोल पंपावर कर्मचाऱ्याने छेड (Molestation) काढण्याची घटना घडली आहे. पुण्यातील (Pune) एका नामांकित कंपनीत कर्मचारी असलेल्या एका महिलेसोबत हा संतापजनक प्रकार घडला आहे.

Samrudhhi Mahamarg Crime Buldhana : विविध कलमानुसार गुन्हा दाख

मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला दिवाळीनिमित्त एका खाजगी टॅक्सीने पुण्याहून मध्यप्रदेशातील आपल्या गावाला जात होती. त्यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील बीबी गावाजवळ असलेल्या एका पेट्रोल पंपावर महिला रिफ्रेशमेंटसाठी थांबली असता रात्रीच्या वेळेस पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी या महिलेची छेड काढली. यांनतर महिलेने तात्काळ हेल्पलाइनवर संपर्क साधून मदत मागितली. त्यानुसार बीबी पोलीस स्टेशनचे कर्मचारी तात्काळ पेट्रोल पंपावर दाखल होत पेट्रोल पंपावरील छेड काढणाऱ्या आकाश इंगळे या कर्मचाऱ्याला ताब्यात घेतलं. या प्रकरणी त्याच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. यामुळे मात्र पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल आहे.

Chandrapur News : शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झालाय. गोंडपिपरी तालुक्यातील चेक पिपरी शेत शिवारातील ही घटना असून भाऊजी पाल असं 70 वर्षीय मृतक शेतकऱ्याचं नाव आहे. भाऊजी पाल हे शेतातील बैल आणण्यासाठी शेतात गेले होते. मात्र संध्याकाळी घरी परत न आल्याने सकाळी त्यांचा शोध घेण्यात आला. तेव्हा त्यांचा वाघाने खाल्लेला छिन्नविच्छिन्न मृतदेह शेतातच आढळून आला. वनविभागाने मृतदेह ताब्यात घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केलाय. वनविभागाने या भागातील शेतकऱ्यांना सतर्कता बाळगण्याचे देखील आवाहन केले आहे.

Bhandara : भंडाऱ्याच्या लाखांदुरात कोंबडा बाजारावर पोलिसांचा छापा, आठ जणांना घेतलं ताब्यात

कोंबड्यांच्या पायाला धारदार काती लावून त्यांची दोन वेगवेगळ्या ठिकाणी जीवघेणी झुंज लढवून त्यावर पैशाचा हारजितचा अवैध कोंबडा बाजार सुरू होता. या दोन्ही ठिकाणी भंडाऱ्याच्या लाखांदूर पोलिसांनी छापेमारी करून 7 दुचाकी, कोंबडे, रोख रक्कम असा 4 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून 8 जणांना ताब्यात घेतलं आहे. सर्वांविरोधात लाखांदूर पोलिसात मुंबई जुगार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा 

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मराठी माझी आई आहे उत्तर भारत माझी मावशी, आई मेली तरी चालेल मात्र मावशी मारायला नाही पाहिजे; शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वेंची मुक्ताफळे
Video: मराठी माझी आई आहे उत्तर भारत माझी मावशी, आई मेली तरी चालेल मात्र मावशी मारायला नाही पाहिजे; शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वेंची मुक्ताफळे
घरखर्च देत नसल्याच्या रागातून पोटच्या पोरांनीच आईबापाचा काटा काढला, कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडले, रायगड हादरलं
घरखर्च देत नसल्याच्या रागातून पोटच्या पोरांनीच आईबापाचा काटा काढला, कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडले, रायगड हादरलं
Nashik Politics: दिंडोरीत पुढच्या वेळी भाजपचा आमदार द्या, चारोस्करांनी कमळ हाती घेताच गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य; नरहरी झिरवाळांना राजकीय शह?
दिंडोरीत पुढच्या वेळी भाजपचा आमदार द्या, चारोस्करांनी कमळ हाती घेताच गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य; नरहरी झिरवाळांना राजकीय शह?
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.46 पर्यंत राहण्याची शक्यता, पगार किती रुपयांनी वाढणार?
आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.46 पर्यंत राहण्याची शक्यता, पगार किती रुपयांनी वाढणार?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Asim Sarode License Suspended असीम सरोदेंना वादग्रस्त वक्तव्य भोवलं, वकिली सनद तीन महिन्यांसाठी रद्द
Voter List Row: 'ठाकरेंना फक्त हिंदू, मराठी मतदारच दुबार दिसतात का?'; Ashish Shelar यांचा थेट सवाल
Political Row: 'आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे', आमदार Prakash Surve यांचे वादग्रस्त विधान
Maharashtra : प्रल्हाद साळुंखेला हिसका दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही - Ramraje Naik Nimbalkar
Phaltan Doctor : 'SIT नेमल्याचं वृत्त खोटं, केवळ देखरेखीसाठी नियुक्ती', अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मराठी माझी आई आहे उत्तर भारत माझी मावशी, आई मेली तरी चालेल मात्र मावशी मारायला नाही पाहिजे; शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वेंची मुक्ताफळे
Video: मराठी माझी आई आहे उत्तर भारत माझी मावशी, आई मेली तरी चालेल मात्र मावशी मारायला नाही पाहिजे; शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वेंची मुक्ताफळे
घरखर्च देत नसल्याच्या रागातून पोटच्या पोरांनीच आईबापाचा काटा काढला, कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडले, रायगड हादरलं
घरखर्च देत नसल्याच्या रागातून पोटच्या पोरांनीच आईबापाचा काटा काढला, कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडले, रायगड हादरलं
Nashik Politics: दिंडोरीत पुढच्या वेळी भाजपचा आमदार द्या, चारोस्करांनी कमळ हाती घेताच गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य; नरहरी झिरवाळांना राजकीय शह?
दिंडोरीत पुढच्या वेळी भाजपचा आमदार द्या, चारोस्करांनी कमळ हाती घेताच गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य; नरहरी झिरवाळांना राजकीय शह?
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.46 पर्यंत राहण्याची शक्यता, पगार किती रुपयांनी वाढणार?
आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.46 पर्यंत राहण्याची शक्यता, पगार किती रुपयांनी वाढणार?
Bank Holiday : या आठवड्यात सलग चार दिवस बँका बंद राहणार, बँकेतील कामाचं नियोजन करण्यापूर्वी पाहा संपूर्ण यादी 
बँका या आठवड्यात सलग चार दिवस बंद राहणार, बँकेतील कामाचं नियोजन करण्यापूर्वी पाहा संपूर्ण यादी 
पाकिस्तानच्या भूमिगत अणवस्त्र चाचणीमुळं भूकंप येतात, आता अमेरिकेला देखील अणवस्त्र चाचणी करावी लागेल  : डोनाल्ड ट्रम्प
संपूर्ण जगाला 150 वेळा उडवून देता येईल इतकी अणवस्त्र आमच्याकडे, चाचण्या सुरु करणार: डोनाल्ड ट्रम्प
Palghar Farmer News: भात पिकाच्या नुकसानापोटी फक्त 2 रूपये 30 पैशांची भरपाई, सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर चोळले मीठ, पालघरमधील प्रकार
भात पिकाच्या नुकसानापोटी फक्त 2 रूपये 30 पैशांची भरपाई, सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर चोळले मीठ, पालघरमधील प्रकार
INDW vs SAW World Cup Final 2025 Harmanpreet Kaur: भारतीय महिला क्रिकेटच्या संघात सगळ्यात जास्त शिव्या कोण देतं?; हरमनप्रीत कौरने नाव जाहीर करुन टाकलं!
भारतीय महिला क्रिकेटच्या संघात सगळ्यात जास्त शिव्या कोण देतं?; हरमनप्रीत कौरने नाव जाहीर करुन टाकलं!
Embed widget