RSS on Aurangzeb Tomb : गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबच्या कबरीवरून (Aurangzeb Tomb) राज्यात वाद चिघळला आहे. राज्यभरात हिंदुत्ववादी संघटनांकडून खुलताबादेतील (Khultabad) कबर हटवण्याची मागणी जोर धारत असून त्यासाठी आंदोलने सुरू आहेत. नागपुरात औरंगजेब कबरीवरून सुरू असलेल्या वादामुळे दंगल देखील झाली. अशातच या वादावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मोठं वक्तव्य करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. औरंगजेबाच्या कबरीचा विषय अनावश्यक आहे. त्याचा मृत्यू इथे झाला, त्यामुळे त्याची कबर इथे बनली आहे. ज्याची श्रद्धा असेल तो तिथे जाईल, असे मोठं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाहक भय्याजी जोशी यांनी केलं आहे.  

छत्रपती शिवाजी महाराज आदर्श आहे, त्यांनी अफजल खानाची कबर बनवली होती. भारताच्या उदारतेच आणि सर्व समावेशकतेचे हे प्रतीक आहे. त्यामुळे औरंगजेबाची कबर आहे तिथे राहो आणि ज्याला जायचा आहे तो तिथे जाईल. असे मतही भय्याजी जोशी यांनी व्यक्त केलं आहे. 

संघाचा उत्तराधिकारीचा विषय नाही, ते परंपरेनुसार होईल

पंतप्रधानाचा कालचा(30 मार्च) कार्यक्रम चांगला झाला. सेवे संदर्भात त्यांची रुची कोरोना काळात पाहिली. त्यांनी कोरोना काळात ऊर्जा प्रदान करण्याच काम केलं. माधव नेत्रालयाच्या भूमिपूजन त्याच्या हस्ते झाले, लवकरच तो प्रकल्प पूर्ण होईल. दरम्यान, संघाचा उत्तराधिकारीचा विषय नाही, ते परंपरेनुसार होईल.असेही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाहक भय्याजी जोशी यांनी स्पष्ट केलं आहे.

औरंगजेबाच्या कबरीबाबत अनेक लोक तर्क लावत आहेत, पण.. 

औरंगजेबाच्या कबरीबाबत अनेक लोक तर्क लावत आहेत, औरंगजेब नगरला मेला, त्याची इच्छा होती इथं पुरावे म्हणून त्याला इथं आणले. त्यांना कुणी गाडलं वगैरे नाही, तो चुकीचा इतिहास आहे. आणि कबर नसावी याचे कारण म्हणजे त्यांनी शंभु राजांचे हाल केले म्हणून आहे. तो इतिहास आम्हाला पुसायचा आहे त्यात राजकारण नाही. असे मत शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केले आहे. 

लाडकी बहीण योजना बंद होणार नाही- संजय शिरसाट

हे राज्य मराठी भाषिकांचे आहे , आमची हीच भूमिका आहे. कुणी काहीही बोलले तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. प्रश्न 2100चा तर आर्थिक घडी विस्कटलेली आहे, थोडा कालावधी लागेल. शेतकऱ्यांना काही सुविधा द्यायचा आहेत. अर्थमंत्री ते करता त्याला कालावधी लागेल. 1 रूपया योजना बंद केली तर त्याला पर्याय होईल. महसूल उत्पन्न वाढण्यासाठी काम सुरु आहे. मात्र  लाडकी बहीण बंद होणार नाही, असेही मंत्री संजय शिरसाट म्हणाले.