Chandrashekhar Bawankule मुंबई: भाजप प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी तहसीलदाराला चांगलाच दम दिला आहे. मंत्री बावनकुळेंचा दम देतानाचा हा व्हिडिओ सध्या प्रसार माध्यमांवर व्हायरल होतोय. जनता दरबारात 10 पैकी 8 तक्रारी एकट्या चांदवडच्या तहसीलदार विरोधात आल्याने महसूलमंत्री बावनकुळे यांनी फोनवरुन तहसीलदाराला धारेवर धरत जाब विचारला आहे. एका ठराविक काल मर्यादेत काम करण्याचे अधिकाऱ्यांना बंधन घाला, अशी मागणी नागरिकांनी जनता दरबारात मंत्री बावनकुळेंकडे केली आहे.
नुकतेच, मुंबई येथील प्रदेश कार्यालयात विविध मागण्या व निवेदने घेऊन आलेल्या नागरिकांशी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संवाद साधला. प्रत्येकाचे निवेदन स्वीकारत मागण्या समजून घेतल्या. तसेच, त्यासंबंधी कार्यवाही करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. याच वेळी चांदवड येथील काही नागरिक आपल्या तक्रार घेऊन आले असता त्यावर तत्काळ अॅक्शन घेत मंत्री बावनकुळेंनी फोनवरुन तहसीलदाराला तंबी दिली आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असून अनेक प्रतिक्रियाही उमटत आहे.
नेमकं काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
जनता दरबारात 10 पैकी 8 तक्रारी या एकट्या चांदवडच्या तहसीलदाराविरोधात येत आहे. या संदर्भात कलेक्टरशी बोला आणि माझ्या सहीनिशी जेवढे निवेदन पाठवले आहेत त्यावर मला पूर्ण काम करून पाठवा. अशा शब्दात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी तहसीलदाराला तंबी दिली आहे. तर एका ठराविक काल मर्यादेत काम करण्याचे अधिकाऱ्यांना बंधन घाला. अधिकारी मुद्दाम वेळकाढूपणा करतात आणि नंतर काम करण्यासंदर्भात पैशांची अपेक्षा करतात. पैसे दिल्यास लगेच काम करतात. मात्र काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना जाब विचारला तर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करणाच्या धमक्या देतात. असा आरोप करत नागरिकांनी जनता दरबारात तक्रारींचा पाढा वाचला आहे.
जळगाव जिल्ह्यात भजापची ताकद वाढणार- चंद्रशेखर बावनकुळे
जळगावच्या पाचोरा – भडगाव मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. कारण या मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप वाघ यांच्यासमवेत शरद पवार गटाचे माजी खासदार वसंतराव मोरे यांचे सुपुत्र पराग मोरे, रोहन मोरे, नाना महाजन, पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष अशोक वाणी, पारोळा बाजार समितीचे संचालक नागराज पाटील, उबाठा गटाचे शहर प्रमुख सोमनाथ देशमुख यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केलाय. भाजपच्या प्रदेश कार्यालयात हा पक्ष प्रवेश झाला आहे. राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश झाला. या प्रवेशामुळे जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीची ताकद आणखी वाढली आहे. असे मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलताना व्यक्त केलंय.
इतर महत्वाच्या बातम्या