Ratnagiri News:रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील चिपळूण (Chiplun) तालुक्यातील वालोपे गणेशवाडी परिसरात वाशिष्ठी नदीकाठी (Vashishti River) मगरीच्या हल्ल्याची (Crocodile Attack) एक धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेल्या एका महिलेवर मगरीने अचानक हल्ला चढवला. मात्र, सोबत असलेल्या 10 वर्षांच्या चिमुकलीने दाखवलेल्या धाडसामुळे आणि प्रसंगावधानामुळे आईचा जीव वाचला आहे.

Continues below advertisement

Ratnagiri News: मगरीने थेट पाण्यात ओढण्याचा केला प्रयत्न

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नंदिनी पवार (Nandini Pawar) या नेहमीप्रमाणे वालोपे गणेशवाडी येथील वाशिष्ठी नदीच्या पात्रात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांची 10  वर्षांची मुलगी स्वर्णी ही देखील होती. कपडे धुण्यात व्यस्त असताना नदीच्या पात्रातून आलेल्या एका मगरीने अचानक नंदिनी पवार यांच्यावर झेप घेतली आणि त्यांना जबड्यात पकडून पाण्यात ओढण्याचा प्रयत्न केला.

Ratnagiri News: 10 वर्षांच्या स्वर्णीने वाचवला आईचा जीव

आईवर झालेल्या अचानक हल्ल्यामुळे आणि तिच्या किंचाळण्याने घाबरून न जाता, अवघ्या 10 वर्षांच्या स्वर्णीने अतुलनीय धैर्य दाखवले. मगरीने आईला पूर्णपणे पाण्यात खेचण्यापूर्वीच स्वर्णीने मोठ्या हिमतीने पुढे होऊन आईचा हात घट्ट पकडला आणि तिला संपूर्ण ताकदीने बाहेर खेचले. चिमुकलीच्या या अचानक प्रतिकारामुळे आणि प्रसंगावधानामुळे मगरीची पकड सुटली आणि नंदिनी पवार मगरीच्या तावडीतून सुखरूप बाहेर पडल्या.

Continues below advertisement

Ratnagiri News: आईवर उपचार सुरु

या मगरीच्या भीषण हल्ल्यात नंदिनी पवार यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने उपचारासाठी कामथे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वाशिष्ठी नदीच्या पात्रात मगरींचा वावर मोठा असल्याने स्थानिक नागरिकांनी, विशेषतः महिला व मुलांनी नदीकाठी जाताना आणि पाण्याचा वापर करताना विशेष खबरदारी बाळगावी, असे आवाहान वनविभागाकडून करण्यात आले आहे. तसेच 10 वर्षांच्या स्वर्णीने दाखवलेल्या या साहसाचे संपूर्ण चिपळूण तालुक्यातून कौतुक केले जात आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?

Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: 'दादा, आता राखीसाठी कोणाला कॉल करू रे?’; कुणालच्या आत्यांच्या आक्रोशाने सर्वांचेच डोळे पाणावले