चिपळूनमध्ये अवैध वाळू उपसाविरोधात उपोषण, थेट नदीत उडी घेत तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न
अवैध वाळू उपसा (Illegal sand) विरोधात चिपळूणमध्ये उपोषणाला बसलेल्या श्रीकांत कांबळी यांनी नदीत उडी घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.

Ratnagiri : अवैध वाळू उपसा (Illegal sand) विरोधात चिपळूणमध्ये उपोषणाला बसलेल्या श्रीकांत कांबळी यांनी नदीत उडी घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. यावेळी चिपळूण पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी उपोषणकर्त्याचे प्राण वाचवले आहेत. गोवळकोट आणि दाभोळखाडीमध्ये सुरु असलेल्या अवैध वाळू उत्खननाच्या विरोधात श्रीकांत कांबळी यांचे उपोषण सुरु होते.
प्रशासनाकडून दखल न घेतली गेल्यामुळे संतप्त झालेल्या श्रीकांत कांबळी यांनी नदीपत्रात उडी टाकून केला आत्मदहनाचा प्रयत्न केला. नाका तोंडात पाणी गेल्यामुळे श्रीकांत यांची प्रकृती खालावली आहे. श्रीकांत यांना कामथे येथील जिल्हा उपकेंद्रात उपचारासाठी दाखल केलं आहे.
राज्यातील विविध भागात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरु आहे. या विरोधात प्रशासन कारवाई करत असल्याचं चित्र दिसत आहे. पण मोठ्या प्रमाणात रात्रीच्या वेळेस अवैध वाळू उपसा केल्याच्या घटना घडत आहेत. दरम्यान, ज्या भागात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा होतो असे काही मार्ग देखील प्रशासनाने शोधले आहेत. प्रत्येक मार्गावर स्थिर पथके नेमण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पोलिस आणि महसूल प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांची निवड प्रक्रिया देखील हाती घेण्यात आली आहे. लवकरच याची अंमलबजावणी होणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, अवैध वाळू उपसा करणाऱ्या विरोधात कारवाई केल्यानं अनेकांचे हितसंबंध दुखावले जात असल्याचे बोलले जात आहे.
महत्वाच्या बातम्या:























